neb-neu

neb नेब् n.--- चोंच, चंचू, बाकी, टोक.
nebbish नेबिश् a.--- कुचकामी, नीच (व्यक्ती, विशेषतः पुरुष).
nebula नेब्यूला n.--- (pl. Nebulae नेब्यूली) (डोळ्याच्या भिंगावरील) धूसर डाग / ठिपका, पटल, पडदा, भूर, भुरी, अवकाशातील अत्यंत विरळ, वायु / धूलिकिरण यांच्या असंख्य व प्रचंड आकारांच्या अगणित समुदायांपैकी एक. ढगाळ / अंधुक रूप. पहा: Galaxy.
nebular नेब्यूलर् a.--- ‘Nebula’ चा / शी संबंधित.
nebulous नेब्यूलस् a.--- अस्पष्ट, अंधुक. ‘Nebula’ सारखा. = Nebular.
necessarily नेसेसरिलि ad.--- अगत्यपूर्वक, अवश्य, अगत्य.
necessary नेसेसरि n.--- आवश्यक गोष्ट, शेतखाना. a.--- आवश्यक, दैवावीन, अनिवार्य, दैवपर.
necessitate नेसेसिटेट् v.t.--- भाग पाडणे, जरूरीचे करणे.
necessitous नेसेसिटस् a.--- कंगाल, दरिद्री.
necessity नेसेसिटि n.--- आवश्यकता, दारिद्र्य, टंचाई, साहित्य, दैवाधीनता, जरूर, गरज, जरूरी.
neck नेक् n.--- मान, भांड्याचा गळा, गार्डन
neckcloth नेक्क्लॉथ् n.---
neckerchief नेक(र्)चीफ् n.--- गळ्याचा रुमाल (pl. Neck-kerchieves / neck-kerchiefs)
necklace नेक्लेस् n.--- कंठा, हार, माळ, माला. कंठसूत्र, कंठाभरण.
necktie नेक्टाय् n.--- गळपट्टा, गळेबंद.
necrology नेक्रॉलजि n.--- मृतयूची नोंद.
necromancer नेक्रोमॅन्सर् n.--- चेटक्या, मांत्रिक.
necromancy नेक्रोमॅन्सि n.--- भूतविद्या, कुविद्या.
necropolis नेक्रो-/क्रॉ- पोलिस् n.--- स्मशानभूमि.
nectar नेक्टर् n.--- अमृत, सुधा, फुलांतील गोड रस / मध.
nectarean नेक्टेरिअन् a.--- अमृततुल्य.
nectary नेक्टरी n.--- फुलातील मकरंदाची जागा.
nee ने--- विवाहित स्त्रीच्या नवीन नावासह पूर्वाश्रमीचे नाव सांगताना दुसर्या (पूर्वीच्या) नावाआधी लावण्याचे उपपद. ‘पूर्वाश्रमी-ची/-च्या’.
need नीड् n.--- गरज, दुःख, संकट, प्रयोजन, कारण, जरूरी. v.i.--- गरज असणे / लागणे.
needful नीड्फुल् a.--- गरजवंत, आवश्यक, अपेक्षित.
needle नीडल् n.--- सुई, होकायंत्राचा कांटा. v.t.--- सुईने टोचणे.
needlework नीडल्वर्क् n.--- शिवणकाम, कशिदा.
needy नीडि a.--- कंगाल, भिकारी, भुकेबंगाल.
neem नीम् n.--- नीम, कडुलिंब , कडुनिंब (झाड). = Margosa.
negation नेगेशन् n.- -- निषेध, नकार, अभाव.
negative निगेटिव्ह् a.--- अभावाचा, नकाराचा.
negatory नेगेटरि a.--- नकारात्मक्, नकाराचाा. n.--- निषेध, नकार.
neglect निग्लेक्ट् v.t.--- हयगय करणे. n.--- हयगय.
negligent निग्लिजन्ट् a.--- हयगयीचा, गाफील.
negligence निग्लिजन्स् n.--- गाफीलपणा, विसराळूपणा.
negotiate निगोशिएट् v.t. and v.i.--- बोलचाली करून जमवणे, तहाचे बोलणे लावणे, काम चालवणे.
negotiation निगोशिएशन् n.--- घटना, तहाचे बोलणे, बोलाबोली, घडवाघडवी.
negotiator निगोशिएटर् n.--- दलाल, वकील.
negro निग्रो n.--- सिद्दी. Negress n.--- सिद्दीण.
neigh ने v.i.--- खिंकाळणे, हिंसणे.
neighbour नेबर् n.--- शेजारी. a.--- जवळचा, शेजारचा.
neighbourhood नेबर्हुड् n.--- शेजार.
neither नायदर् pron.--- एकही नाही. conj.--- आणि ही नाही.
nemesis नेमसिस् n.--- अपराधाचा दंड देणारी (ग्रीक) देवता, जिंकायला अवघड अशी एखादी वस्तू किंवा व्यक्ती, प्रतिद्वंदी, विरोधक, कट्टर शत्रु. दुष्कृत्याबद्दल मिळालेली योग्य शिक्षा व त्यामुळे झालेले पतन.
neolithic निओलिथिक् a./n.--- नव- / उत्तर- अश्मयुगीन. = neolithic age. (पहा: paleolithic age).
neology निआॉलजि n.--- नवीन शब्दरचना, नवे मत, युक्तिवाद.
neon निआॅन् n.--- वातावरणातील एक वायुविशेष.
neophyte नीअफाइट् n.--- (धर्म, पंथ, इ. मधील) नवागत, नवप्रविष्ट; प्रारंभिक व्यक्ति.
neoteric निओटेरिक् a.--- आधुनिक, अर्वाचीन.
nephew नेफ्यू / नेव्ह्यू n.--- पुतण्या, भाचा.
nephro नेफ्रो--- ‘मूत्रपिंड’ या अर्थाचे ग्रीक भाषेतून आलेले उपपद.
nephrology नेफ्रोलॉजी n.--- मूत्रपिंडाचे (रचना-कार्य-रोग-विषयक) शास्त्र.
nepotism नेपटिझम् n.--- आप्तांचा ओढा. (नातलगांचे बाबतीतील) वशिलेबाजी / अनुचित पक्षपात.
neptunium नेप्ट्यूनियअम् n.--- युरेनियम वॉर न्यूट्रॉनांचा मारा करून काढण्यात येणारे एक किरणोत्सर्गशील मूलद्रव्य.
nerd नSर्ड् n.--- खुळा, करंटा, पात्र, नाग, चक्रम / भंपक व्यक्ति. वल्ली.
nereid नीरिइड् n.--- जलदेवता.
nerve नर्व्ह् v.t.--- बळ आणणे. n.--- ज्ञानतंतु, बळकटी, रंग, जोर, मज्जातंतु, जोम, सामर्थ्य, धिमेपणा. (हिंदी: तंत्रिका).
nerveless नर्व्ह्लेस् a.--- निर्बळ, कमजोर, दुर्बळ.
nervine नर्व्हाइन् a.--- मज्जातंतुविषयक. मज्जातंतूंवर परिणाम करणारा.
nervous नर्व्हस् a.--- भित्रा, घाबरणारा, जोमदार. गलितधैर्य, अस्वस्थचित्त, चलितमानस, अस्थिर, उत्तेजित, संवेदन-/ना-/-ग्रस्त. ‘Nerve’ संबंधीचा.
nervy नर्वी a.--- फाजील धीट, फाजील उद्दाम, आगाऊ धीट/धाडसी.
nescience ने / नी शियन्स् n.--- अज्ञान.
nescient ने / नी शियण्ट् n.--- अज्ञानी (जीव), अज्ञेयवादी (agnostic).
nest नेस्ट् v.i.--- घरटे करून राहणे. n.--- घरटे, अड्डा, घर.
net नेट् n.--- जाळे, सापळा, पाश. v.t.--- जाळे तयार करणे, निवळ नफा मिळविणे. a.--- निवळ, ठाम.
nether नीदर् a.--- खालचा.
nethermost नीदर्मोस्ट् ad.--- सर्वांखालचा.
netizen नेटिझन् n.--- संगणकीय सूचनामहाजंजालाशी व्यवहार ठेवणारा माणूस.
nettle n.--- कुत्र्याचे गावात, खाजरी, खाजकुइली.
nettle-rash n.--- अंगावर फुलणाऱ्या पुटकुळ्या. To grasp the nettle-rash = अडचणीस / संकटास धैर्याने तोंड देणे / हाताळणे.
network नेट्वर्क् n.--- जाळीचे काम, जाळीदार काम, जाळी.
neurological न्यूरॉलॉजिकल् a.--- ज्ञानतंतुविज्ञानविषयक.
neurologist न्यूरॉलॉजिस्ट् n.--- मज्जातंतुशास्त्रज्ञ.
neurology न्यूरॉलॉजी n.--- ज्ञानतंतूचे / मज्जातंतूचे शास्त्र. मज्जातंतुसंस्थेचे शास्त्र.
neuron / Neurone न्यूरॉन् n.--- ज्ञान(तंतु)पेशी, मज्जा(तंतु)पेशी.
neurosis न्यूरॉसिस् n.--- ज्ञानतंतुसंस्थेची विकृति, (तदुद्भव) मानसिकविकृति.
neurotic न्यूरॉटिक् a.--- मनोविकृतीचा/-च्या स्वरूपाचा. n.--- Neurosis ची बाधा झालेला, डोके बिघडलेला.
neuter न्यूटर् n.--- नपुंसक, हिजडा, तिऱ्हाइत, षंढ.
neutral न्यूट्रल् a.--- तिऱ्हाइत, तटस्थ, दोहोपेक्षा वेगळा.
neutrality न्यूट्रॅलिटि a.--- तिऱ्हाईतपणा, औदासीन्य.
neutralize न्यूट्रलाइझ् v.i.--- निरवीर्य / निर्बल करणे.