Gor-Gra

Gordian गॉर्डियन् a.--- अवघड, कठीण (पहा: Gordian knot).
Gordian knot गॉर्डियन् नॉट् n.--- गॉर्डियस् या ग्रीक राजाने बांधलेली गांठ जी सोडू शकणारा आशियाचा सत्ताधॆश होईल अशी भविष्यवाणी होती. (अलेक्झांडरने ती मोडली). अवघड समस्या.
Gore गोअर् v.t.--- भोसकणे, शिंग मारणे. n.--- रक्त.
Gorge गॉर्ज् v.t.--- आकंठ जेवणे, अधाशीपणाने खाणे, गच्च भरणे, तुडुंब भाराने, तृप्त करणे. n.--- गळा, कंठ, खिंडवाट, उंचपर्वतकड्यांमधील खोल दरी. (on, upon) v.i.--- वर ताव मारणे.
Gorgeous गॉ(र्)जस् a.--- झळकफळक, भपकेदार. अत्यंत आकर्षक. भव्य-दिव्य, देदीप्यमान, आनंद-/आल्हाद-/सुख-दायक.
Gory गोरि a.--- रक्तबंबाळ, रक्ताने भरलेला.
Gospel गॉस्पेल् n.--- शुभवर्तमान, सुवार्ता, शुभवार्ता, तत्वज्ञान, दर्शन.
Gossamer गॉसमर् n.--- कोळिष्टक (कोळ्याचे जाळे). क्षुल्लक / पोकळ / तकलादू वस्तू.
Gossip गॉसिप् v.i.--- बाता मारणे. n.--- खबरबात, गप्पीदास, चावट बायको, सनसनाटी किंव्हा तिखटमीठ लावून सांगितलेली हकीकत.
Gotcha
Gouge गाऊज् / गूज् n.--- एक प्रकारची छिन्नी, कापून / उचकटून काढण्याचे हत्यार. v.--- उचकटून / कापून बाहेर काढणे, डोळा काढणे.
Gourd गोअ(र्)ड् / गूअ(र्)ड् / गूर्ड् n.--- भोपळा, गोलाकार / लांबट मोठ्या आकाराचे, वेलावर लागणारे, गार-युक्त, खाद्य फळ. वेलावर धरणारे भोपळ्याच्या कोणत्याही जातीचे फळ. ‘gourd’-फळ -धारण करणारा वेल. वाळवून पोकळ केलेले, विविधोपयोगी ‘gourd’-फळ.
Guard
Gourmand गू(गॉ)मंड् n.--- खादाड, खादाडखाऊ.
Gourmet गूमे n.--- चोखंदळ खाणारा.
Gout गॉउट् n.--- वातरोग, वायु, संधिवायु. रक्तदोषमूलक संधिशूल (विशेषतः पायाच्या बोटात प्रकटणारा).
Govern गव्हर्न् v.t. and v.i.--- अंमल करणे, अधिकार चालवणे, हुकमात ठेवणे, आवरणे, बंदोबस्त राखणे.
Governance गव्हर्नन्स् n.--- (प्र-)शासन, राज्यकारभार, राज्यशासन, शासनाधिकार.
Governess गव्हर्नेस् n.--- स्वामीण, शिकवणारी, मालकीण.
Government गव्हमेण्ट् n.--- सरकार, राज्य, अंमल, देखरेख, कारक (व्याकरणात), आटोप.
Governor गव्हर्नर् n.--- अंमल करणारा सुभेदार.
Gown गाउन् n.--- झगा, जामा, मेषवाडा.
Grab ग्रॅब् v.t.--- एकदम हिसकावून घेणे, लुबाडून घेणे, बळकावणे, प्रभावीपणे लक्ष वेधून घेणे.
Grabber n.--- हिसकावून घेणारा, बळकावणारा. प्रभावीपणे लक्ष वेधून घेणारी प्रस्तावना, चित्तवेधक प्रस्तावना / प्रारंभ. (Construct your outline but leave the introduction or grabber, as it is sometimes called, for later.)
Grace ग्रेस् v.t.--- शोभिवंत करणे. n.--- शोभा, दया, कृपा, भाषण.
Graceful ग्रेस्फुल् a.--- गोजिरवाणा, सुंदर, साजरा.
Gracious ग्रेशस् n.--- दयाळू, उपकारी, आवडता.
Gradation ग्रेडेशन् n.--- क्रम, पायरी, अनुक्रम.
Grade ग्रेड् n.--- पायरी, दर्जा, वर्ग.
Gradient ग्रेडिअण्ट् n.--- (रस्ता इ. च्या) चढ / उतार यांचे मान / प्रमाण. चढ / उतार, चढण / उतरण, चधाचा / उताराचा रस्ता.
Gradual ग्रॅज्युअल् a.--- अनुक्रमाचा, क्रमाक्रमाचा.
Gradually ग्रॅज्युअली ad.--- क्रमाक्रमाने, क्रमशः.
Graduate ग्रॅज्युएट् v.t.--- पदवी देणे, हळू हळू तयार करणे, सिद्ध / साध्य करणे, हळू हळू बदल करणे, अनेक अवस्थांमधून जाणे. N.--- पदवी मिळविणारा, पदवीधर, (प्रथम) स्नातक.
Graffito ग्रफीटो n.--- कोरीव लेख / चित्र. (pl. Graffiti ग्रफीटी).
Graft ग्राफ्ट् v.t.--- कलम लावणे / करणे. n.--- कलम, भूमीत नीट रुजलेल्या खोडावर आरोपित / कलम केलेला अंकुर / कोंभ / प्ररोह. असे आरोपण / कलम (करण्याची प्रक्रिया). शस्त्रक्रियेने आरोपित केलेला शारीरावयव / इंद्रिय इ. अशा तऱ्हेचे अवयवारोपण. लाचखोरी, आपल्यालाभासाठी आपल्या अधिकाराचा अनुचित / अनैतिक वापर = bribery. v.t./v.i.--- -ला आरोपित / कलम करणे, आरोपण (क्रिया) करणे. v.i.--- लाचलुचपत करून फायदा उकळणे.
Grain ग्रेन् n.--- धान्य, दाणा, कण. अत्यंत अल्प अंश. पौंडाचा १/७००० भाग म्हणजे 0.0648 ग्राम. पोट, वीण, रचना, स्वभाव. मौलिक स्वरूप. v.t.--- रवाळ होणे.
Gram ग्रॅम् n.--- चणा, हरभरा.
Graminary ग्रॅमिनरि n.--- मोहनी विद्या, चेटूक.
Graminivorous ग्रॅमिनिव्होरस् a.--- गवत खाणारा.
Grammatical ग्रॅमॅटिकल् a.--- व्याकरणशुद्ध. a.--- कणखर, कट्टर.
Grammatically ग्रॅमॅटिकलि ad.--- व्याकरणानुसार.
Granary ग्रॅनरि n.--- धान्याचे कोठार/कोठी.
Grand ग्रॅन्ड् a.--- मोठा, थाटामाटाचा, थोर.
Grand-child ग्रॅन्ड्चाइल्ड् n.--- नातवंड, दौहित्र.
Grand-daughter ग्रॅन्ड्डॉटर् n.--- नात, पौत्री, दौहित्री.
Grandee ग्रॅन्डी n.--- सरदार, अमीर, उमराव.
Grandiose ग्रँडिओस् a.--- भव्य, विशाल; (केवळ आपाततः) प्रचंड, दिखाऊ, अवडंबरपूर्ण, अगडबंब.
Grandure ग्रॅन्जर् n.--- मोठेपणा, थोरवी, बडेजाव.
Grand-father ग्रॅन्ड्फादर् n.--- आजा, आजोबा, पितामह, मातामह.
Grand-mother ग्रॅन्ड्मदर् n.--- आजी.
Grandson ग्रॅन्ड्सन् n.--- नातू.
Granite ग्रॅनिट् n.--- क्वार्ट्झ, अभ्रक, फेल्ड्स्पार इ. चा बनलेला कठिण हलका राखी, पांढरा वा तांबुस दगड.
Granivorous ग्रॅनिव्होरस् a.--- अन्न खाणारा.
Grant ग्रॅन्ट् v.t.--- बक्षीस देणे, बहाल करणे, मान्य करणे. n.--- इनाम, बक्षीस, दान दिलेली वस्तू.
Grantor ग्रॅन्टर् n.--- इनाम देणारा, दाता.
Granular ग्रॅन्यूलर् a.--- = Granulous.
Granulate ग्रॅन्यूलेट् v.t.--- -ला कणांचे रूप देणे. -ला कणयुक्त करणे, -ला खरखरीत पृष्ठभाग देणे.
Granule ग्रॅन्यूल् n.--- कण, रवा.
Granulous ग्रॅन्यूलस् a.--- कणीदार, रवाळ, रवेदार.
Grape ग्रेप् n.--- द्राक्ष.
Grapevine = Canard
Graph ग्रॅफ् n.--- गणितांतील रकमांची किंमत रेघांनी मोजून दाखविणारी आकृति, आलेख, चोकोनी घरांची चौकट.
Graphic ग्रॅफिक् a.--- स्वरूपबोधक, हुबेहूब.
Grapple ग्रॅपल् n.--- पकड, मिठी. v.t. and v.i.--- पकडणे. ‘Grapple with’ v.i.--- = (शत्रु, समस्या, काम इ. ना नियंत्रणात आणण्यास) झटणे / झगडणे.
Grasp ग्रास्प् v.t.--- मुठीत धरणे/पकडणे. n.--- डांब, आव.
Grasping ग्रास्पिंग् a.--- आधाशी, लोभी, कृपण.
Grass ग्रास् n.--- गवत, तृण, घांस.
Grass-hopper ग्रास्हॉपर् n.--- टोळ, नाकतोडा.
Grate ग्रेट् n.--- गजांची जाळी, लोखंडी शेगडी.
Grateful ग्रेट्फुल् a.--- कृतज्ञ, गोड, सुखावह.
Grater ग्रेटर् n.--- किसणी.
Grating ग्रेटिंग् a.--- कर्कश, कर्णकटु. n.---
Gratis ग्रॅटिस् ad.--- फुकट, मोफत, फुकटावारी.
Gratitude ग्रॅटिट्यूड् n.--- कृतज्ञता, उपकारस्मरण.
Gratuitous ग्रॅट्यूइटस् a.--- न मागता दिलेला, फुकट; अकारण, उगाचच, निष्कारण अनावश्यक.
Gratulation ग्रॅट्युलेशन् n.--- अभिनंदन, आनंदाची अभिव्यक्ति.
Gratulatory ग्रॅट्युलेटरी a.--- अभिनंदनात्मक, शुभेच्छादर्शक.
Gratuity ग्रॅचुइटि n.--- बक्षीस, इनाम, देणगी.
Grave ग्रेव्ह् n.--- प्रेत पुरण्यासाठी केलेला खड्डा, थडगे, कबर. समाधि, छत्री. v.t.--- कोरणे, खोदणे. a.--- गंभीर, मोठा.
Gravel ग्रॅव्हल् n.--- रेव, कंकर, खडी, मूतखडा, वाळू. खडी, वाळू, इ. चा थर / पृष्ठभाग. मूत्रपिंड / मूत्राशय यांतील खडे / वालुकाकण.
Gravelly ग्रॅव्हली a.--- ‘gravel’ चा / ने बना(वि)लेला. कठीण, खडबडीत. कठोर.
Graveness ग्रेव्ह्नेस् n.--- गांभीर्य, गंभीरपणा.
Gravestone ग्रेव्ह्स्टोन् n.--- थडगे वा समाधि यांवर बसविलेली (मृतव्यक्तिविषयक लेख इ. असलेली) शिला.
Graveyard ग्रेव्ह्यार्ड् n.--- प्रेते पुरण्याची जागा, दफनभूमि. (या अर्थी:) श्मशान. (पहा: ‘Cremation ground’, Crematorium’)
Graveyard shift ग्रेव्ह्यार्ड्-शिफ्ट् n.--- अपरात्रीचा कार्यकाळ / कामाची पाळी. (Delhi is unsafe for women working graveyard shifts.) (Prescribed security procedure has to be followed by companies where women work in graveyard shifts.
Gravitas
Gravitate ग्रॅव्हिटेट् v.i.--- केन्द्राभिगमन करणे.
Gravitation ग्रॅव्हिटेशन् n.--- गुरुत्वाकर्षण.
Gravity ग्रॅव्हिटि n.--- गांभीर्य, वजनदारी, गुरुत्व.
Gravy ग्रेव्हि n.--- धूसर, कबरा, करडा, पिकलेला.
Gray ग्रे a.--- धूसर, कबरा, करडा, पिकलेला.
Graze ग्रेझ् v.t. and v.i.--- --- -ला चाटून / घासून जाणे, -ला चारणे.
Grazier ग्रेझिअर् n.--- गुराखी, गुरे चारणारा, गोवारी.