telecommunication टेलिकम्युनिकेशन् n.--- दूरच्या ठिकाणी संपर्क / संवाद साधण्याची संदेश पोचविण्याची (प्र-)क्रिया. दूरसंपर्क (हिंदी: दूरसंचार).
telegenic टेलिजेनिक् a.--- दूरदर्शन (television) वर आकर्षक दिसणारा.
telegram टेलिग्रॅम् n.--- तारायंत्राद्वारे (telegraph द्वारे) प्रेषित / प्राप्त संदेश.
telegraph टेलिग्राफ् v.t.--- तारेने बातमी पोचविणे. n.--- तारायंत्र.
telegraphese टेलिग्रफीज् n.--- तारेने पाठविण्याच्या संदेशाची सूत्रमय / संक्षिप्त भाषाप्रणाली. तार-भाषा.
telegraphic टेलिग्राफिक् a.--- तारेने कळविलेला, तारायंत्राचा, सूत्रमय, संक्षिप्त वाचनाचा.
telekinesis टेलिकिनीसिस् n.--- मनोबलाने दूरच्या वस्तूंत हालचाल घडविण्याची प्रक्रिया.
teleologic टेलिओलॉजिक् a.--- = Teleological. n.--- (जीवनाच्या / सृष्टीच्या) हेतूचा / साध्याचा विचार करणारे शास्त्र.
teleological टेलिओलॉजिकल् a.--- ‘teleology’ संबंधीचा, सृष्ट्युद्देशविचारविषयक, (जगाच्या / संसाराच्या) हेतू-/साध्या-/ संबंधीचा.
teleology टेलिओलॉजी n.--- संसार / प्रपंच कशासाठी आहे याचा अभ्यास / सिद्धांत. प्रपंचसाध्यविचार. अंतिम साध्यांचा विचार, सृष्ट्युद्देश्यविचार.
telepathic टेलेपथिक् a.--- ‘Telepathy’ -विषयक / -जन्य.
telepathy टेलेपथी n.-- दोन मनांचा थेट (विना-स्पष्ट-माध्यम) संपर्क. (हिंदी: दूरबोध, अतींद्रियबोध).
telephone टेलिफोन् n.--- एका स्थानाचा ध्वनि दुसऱ्या स्थानी नेऊन ऐकविणारे यंत्र. दूरध्वनि. (हिंदी: दूरभाष). v.t.--- -ला अशा यंत्राने संदेश पाठविणे.
telephonic टेलिफोनिक् a.--- दूरध्वनिसंबंधी. दूरध्वनीचा.
telephony टेलिफोनी n.--- दूरध्वनि-यंत्रणा.
teleprinter टेलिप्रिण्टर् n.--- तारायंत्र (telegraph) -प्रक्रियेने संदेश मुद्रित / टंकित करून पोचविणारे यंत्र. (हिंदी: दूरमुद्रक, तारलेखी).
telescope टेलिस्कोप् n.--- दुर्बीण, दूरदर्शक यंत्र.
television टेलिव्हिजन् / टेलिव्हीअन् n.--- दूरदर्शन, प्रकाशवाणी.
tell टेल् v.t.--- सांगणे, कळवणे, बोलणे, मोजणे.
telltale टेल्टेल् a. & n.--- चहाडखोर, चुगलखोर.
temerity टमेरिटी n.--- उतावळेपणा, अविचार. औद्धत्य, आडदांड साहसीपणा/धैर्य. eg. The boy had the temerity to ask this to the school principal.
temper टेम्पर् v.t.--- नेमस्त / नरम / गरम / दुरुस्त करणे. (with)--- -ला (-ने/-च्या साहाय्याने / मिश्रणाने) सौम्य / नरम / ठीक / दुरुस्त करणे. (पौलाद इ. धातू-) -ला (तापवून व थंड करून) आवश्यक तेवढे कठीण करणे, -ला (कष्ट, संकट इ. नी) कणखर करणे. n.--- मनाची स्थिति, राग, स्वभाव. विशिष्ट इष्ट-गुणधर्म-युक्त अवस्था. मनस्थिति / मनोवृत्ति.
temperament टेंपेर्मेन्ट n.--- स्वभाव.
temperamental टेंपरमेंटल् a.--- स्वभावज / स्वभावगत. (अति) संवेदनशीलशांत / स्थिर मनस्थिति / मनोवृत्ति. अस्थिर / अनियंत्रित (विशे. संतप्त) मनस्थिति. भावनाशील, लहरी, भावविवश.
temperance टेंपरन्स् n.--- नेमस्तपणा, निमयमितपणा.
temperate टेंपरेट् a.--- नियमित, नेमस्त, शांत.
temperately टेंपरेट्ली ad.--- थंडपणाने.
temperature टेंपरेचर् n.--- प्रकृति, उष्णतामान.
tempest टेंपेस्ट् n.--- तुफान, वादळ.
tempestuous टेंपेस्च्युअस् a.--- वादळाचा, तुफानी.
template टेम्प्लेट् n.--- तुळईचा भार वितरित करून हलका करणारा ठेपा / आधार. साचा.
temple टेम्पल् n.--- देऊळ, देवालय, कानशील.
temporal टेंपोरल् a.--- या लोकाचा, ऐहिक, क्षणिक.
temporary टेंपररि a.--- दोन दिवसांचा, क्षणिक, तात्पुरता.
temporize टेंपराइझ् v.i.--- काळवेळ पाहून वागणे.
tempt टेम्प्ट् v.t.--- भुरळ घालणे, भुलवणे.
temptation टेम्प्टेशन् n.--- मोह, भुरळ, मोहनी.