ongoing आॅन्गोइंग् n.--- हालचाल, उपक्रम, क्रियाकलाप, उद्योग. a.--- चाललेला, चालू.
onion अनियन् / अन्यन् n.--- कांदा, पालांडू.
online आॅन्लाइन् a.--- संगणकाकडून थेट संपर्कात असलेला.
only ओन्लि a.--- एकटा, एकच. ad.--- फक्त, केवळ. conj.--- परंतु, शिवायकरून.
onomatopoeia आॅनमॅटपीया n.--- एखाद्या वस्तु, व्यक्ति, क्रिया, इ. चे नाव त्याच्याशी परिचित ध्वनीवरून पडण्याची प्रक्रिया. (उदा. Crow, cuckoo, meow, ouzz). अशा प्रक्रियेने बनलेला शब्द, अव्यक्तवर्णनांकन (‘अव्यक्तानुकरण’ (पाणिनि) (हिंदी: अनुकरणन)
onomatopoeic / Onomatopoeical आॅनमॅटपोइक् / आॅनमॅटपोईकल् a.--- ‘Onomatopoeia’ -शी संबंधित / -ने बनलेला / =च्या स्वरूपाचा.
onomatopoeisis आॅनमॅटपोईसिस् / आॅनमॅटपोईआ = Onomatopoeia
onomatopoetic आॅनमॅटपोईटिक् a.--- = Onomatopoeical
onset आॅन्सेट् n.--- = Onslaught.
onslaught आॅन्स्लॉट् n.--- हल्ला, चाल.
ontology आँटॉलॉजि / आँटॉलजि n.--- तत्वज्ञानांतील ‘जीव’ / ‘जीवात्मा’ याबद्दलचा विचार; अंतिम / मौलिक सत्याचा विचार, ‘वस्तुमीमांसा’
onward आॅन्वर्ड् a.--- पुढे गेलेला. ad.--- पुढेपुढे, पश्चात.
onyx आॅनिक्स् n.--- गोमेद, एकप्रकारचा कमी मौल्यवान असा, विविध रंगांचे पट्टे व थर असलेला काचमणी (quartz).
oodles ऊडल्ज् n.--- भरपूर परिमाण.
oops ऊप्स् excl.--- ‘क्षमस्व’, ‘चुकलो’ (असा उद्गार), ‘बाप रे’ / ‘काय म्हणता’ / ‘काय म्हणावे’ (असा आश्चर्यवाचक उद्गार).
ooze ऊझ् v.i.--- पाझरणे, निचरणे, हळूहळू गाळून जाणे. n.--- गाळ, पाझर, निचरा, चिखल, रेंदा, स्त्राव.
oozy ऊझि a.--- रेबडीचा, चिखलाचा, गाळाचा.
op’ cit आॅप् सिट् = in the work cited. निर्दिष्ट ग्रंथातील पूर्वनिर्दिष्टग्रंथगत.
opacity ओपॅसिटि a.--- अपारदर्शकत्व, गूढता.
opaque ओपेक् a.--- अपारदर्शक, अस्पष्ट, गूढ. संदिग्ध, संदेहास्पद. मख्ख.
open ओपन् a.--- उघडा, मोकळा, सार्वजनिक, निष्कपटी, उदार, विकसलेला. v.t.--- उघडा करणे, पसरणे, विकासणे, फोड करणे, उपक्रम काढणे, मोकळा करणे, oडकविणे, फोडणे, कापणे, उमलणे, तडणे. n.--- मोकळे मैदान.
opener ओपनर् n.--- उघडणारा, पसरणारा.
opening ओपनिंग् n.--- उघडणे, भोक, रंध्र, चीर.
openly ओपन्लि ad.--- उघडपणे, प्रसिद्धपणे, मोकळ्या मनाने.
opera आॅपर n.--- संगीत नाटक, संगीत नाटकगृह, संगीतबद्ध नाट्य. असे नाट्य करणारी मंडळी (कंपनी).
opera-hat आॅपर-हॅट् n.--- सभ्य पुरुषाची घडी घालण्याजोगी उभी टोपी.
operate आॅपरेट् v.i.--- शस्त्रक्रिया करणे, वर्तनणे, मनावर घेणे, परिणाम करणे, चालू होणे, काम करणे.
operative आॅपरेटिव्ह् a.--- कार्यकारिणी, गुणावह.
operator आॅपरेटर् n.--- शस्त्रवैद्य, शस्त्रक्रिया करणारा.
operose आॅपरोस् a.--- कष्टाचा, उरफोडीचा.
ophthalmia आॅफ्थॅल्मिया n.--- नेत्रपीडा.
ophthalmic ऑफ्थॅल्मिक् a.--- डोळ्याचा, डोळ्याविषयीचा, नेत्रविषयक. नेत्रास / नेत्रपीडेवर हितकर / चांगला / उपकारक. नेत्ररोगपीडित. n.--- नेत्ररोगावरील औषध.
ophthalmitis ऑफ्थॅल्माइटिस् n.--- = Ophthalmia.
ophthalmological आॅफ्थॅल्मॉलॉजिकल् a.--- ‘Ophthalmology’ -चा / -विषयक.
ophthalmologist आॅफ्थॅल्मॉलॉजिस्ट् n.--- नेत्रशास्त्रविशारद.
ophthalmology आॅफ्थॅल्मॉलॉजी n.--- नेत्रविज्ञान.