Unt-Urb

Untamed अन्टेम्ड् a.--- न माणसाळलेला.
Untasted अन्टेस्टेड् a.--- न चाखलेले, न चव घेतलेले.
Unthinking अन्थिंकिंग् a.--- अविचारी, अविवेकी.
Untie अन्टाय् v.t.--- बंधन सोडणे, मुक्त करणे.
Until अन्टिल् prep. & conj.--- जोपर्यंत, पर्यंत, पावेतो.
Untimely अन्टाइम्लि ad.--- भलत्या वेळी, अवेळी.
Unto अन्टु prep.--- पावेतो, पर्यंत.
Untouched अन्टच्ड् a.--- न शिवलेला, न स्पर्शिलेला.
Untrue अन्ट्रू a.--- खोटा.
Untruth अन्ट्रुथ् n.--- खोटे भाषण, अनृत, असत्य.
Unused अन्यूझ्ड् a.--- कोरा, न वापरलेला.
Unusual अन्यूज्वल् a.--- असाधारण, दुर्मिळ.
Unveil अन्व्हेल् v.t.--- बुरखा काढणे, अनावृत करणे.
Unversed अन्व्हर्स्ड् a.--- अनन्यस्त, गैरमाहीत.
Unwary अन्वेरि a.--- गैरसावध.
Unwelcome अन्वेल्कम् a.--- नावडता, अप्रिय, आगतस्वागत न करणे.
Unwell अन्वेल् a.--- आजारी, दुखणेकरी, गैरसावध.
Unwholesome अन्होल्सम् a.--- कुपथ्यकारक.
Unwilling अन्विलिंग् a.--- नाखुषी, नाकबूल, कष्टी.
Unwind अन्वाइंड् v.t.--- उलगडणे, (फिरकीचे झाकण इ.) उलगडून / फिरवून उघडणे. हातपाय पसरणे, विसावणे, आराम करणे.
Unwise अन्वाइझ् a.--- वेडेपणाचा, वेडा, असमंजस.
Unworthy अन्वर्दी a.--- नालायक, अयोग्य, अपात्र.
Unyoke अन्योक् v.t.--- जुवापासून सोडणे.
Up अप् ad.--- वर, वरती, निजून उठलेला. v.t.--- वर करणे / चढविणे, उभारणे. Up to --- पर्यंत.
Up and down अप् अॅण्ड् डाउन् ad.--- वरखाली.
Upbeat अप्बीट् a.--- उत्साहाचा, उमेदीचा, आशावादी. आनंदित, प्रसन्न, खूष.
Upbraid अप्ब्रेड् v.t.--- दोष देणे, निंदा करणे, टोला मारणे.
Update अप्डेट् v.t.--- अद्ययावत् करणे. अत्याधुनिक सुधारणांनी युक्त करणे, अद्यतन करणे.
Updation अप्डेशन् n.--- ‘update’ करण्याची प्रक्रिया.
Upfront अप्फ्रण्ट् a.--- (मन-)मोकळा, सरळ, प्रांजळ, प्रामाणिक.
Uphold अप्होल्ड् v.t.--- वर उचलून धरणे.
Upkeep अप्कीप् n.--- उत्तम स्थितीत ठेवणे.
Upland अप्लॅण्ड् a.--- माळजमीनीचा. n.--- माळजमीन.
Uplift अप्लिफ्ट् v.t.--- उचलणे, उचलून घेणे.
Uplink अप्लिंक् n.--- विमानास / उपग्रहांस जोडणारा आकाशवाणीचा / प्रकाशवाणीचा विद्युत संदेशमार्ग. पृथ्वीवरून उपग्रहास / विमानास पाठवलेला / जोडलेला विद्युतसंदेश / संपर्क. v.i.--- विद्युतसंदेशाने संपर्क साधणे.
Upon अपॉन् prep.--- वर, वरती, विषयी, संबंधी.
Upper अप्पर् a.--- वरचा, मुख्य प्रधान.
Uppermost अप्पर्मोस्ट् a.--- सर्वांनवरचा, वरिष्ठ, सर्वश्रेष्ठ.
Uppish अपिश् a.--- उद्धट, गर्विष्ठ, उद्दाम, आगाऊ.
Uppity अपिटी a.--- पोकळ अहंकारी, पोकळ / खोटा बडेजाव करणारा, घमेंडखोर, आगाऊ.
Upright अप्राइट् a.--- प्रामाणिक, नेकीचा, सत्यनिष्ठ.
Uprightness अप्राइट्नेस् n.--- नेकी, प्रामाणिकता.
Uprising अप्राइझिंग् n.--- उठणे, उदय, बंड.
Uproar अप्रोअर् n.--- गलबला, गलका, कल्ला.
Upset अप्सेट् v.t.--- पालथा करणे, लवंडणे. a.--- उलटलेला, नेमलेला. n.--- उलटणे, उलथापालथ, विसकट.
Upshot अप्शॉट् n.--- परिणाम, शेवट, पर्यवसान.
Upside अप्साइड् n.--- वरली बाजू. Upside down --- उलथा.
Upstairs अप्स्टे(अ)र्झ् ad.--- वरच्या मजल्यावर /-कडे, वरील स्थानी / स्थानास. a.--- वरच्यामजल्यावरील. n.--- (तळमजल्यावरील) वरचा मजला. माडी.
Upstart अप्स्टार्ट् a.--- अकस्मात गबर झालेला.
Upstream अप्स्ट्रीम् a./ad.--- प्रवाहाच्या वरच्या अंगाचा / अंगास उगमस्थानचा / उगमस्थानी.
Upward अप्वर्ड् ad.--- वरती, अंतराळी, मुळाकडे.
Ur- उअर् a.--- आद्य / मूळ /प्रारंभिक या अर्थीचे उपपद (मुलाचा जर्मन उपसर्ग) (उदा.- ur-text)
Uranium यूरेनियम् n.--- करडसार (greyish) रंगाचे, दुर्लभ (rare), अवजड (heavy) किरणोत्सर्गशील (radio-active), धातुरूप (metallic) मूलद्रव्य. संक्षिप्त नाव: ‘U’
Urbanity अर्बनिटि n.--- माणुसकी, भलाई, सौजन्य.
Urban अSर्बन् a.--- शहर-(city / town) -संबंधीचा, शहरी, नागर.
Urbane अर्बेन् a.--- सौजन्यशील, सभ्य, सुस्वभावी, सुविनीत.