sta-ste

stab स्टॅब् v.t.--- भोसकणे, खराब करणे. वेध, भेद.
stability स्टबिलिटि n.--- मजबूती, स्थिरता, स्थैर्य.
stable स्टेबल् n.--- पागा, तबेला, शर्यतीचे घोडे / गाड्या, खेळाडू इ. चा एका व्यवस्थापनेखालील एक संघ. v.t.--- -ला पागेंत / तबेल्यांत ठेवणे /घालणे. a.--- सुस्थित, सुप्रतिष्ठित, स्थिर, स्थिरमानस, स्थिरभाव.
stag स्टॅग् n.--- नर (लाल) हरिण. काळवीट. कृष्णमृग. सांबर. (पहा: Elk). नवीन समभाग (shares) खरीदून सत्वर फायदा कमाविण्यासाठी ते विकणारा माणूस. a.--- फक्त पुरुषांचा, केवळ पुरुषांसाठीचा.
stage स्टेज् n.--- उभे राहण्याची जागा, पट्ट, पट्टिका. नाट्य इ.च्या प्रदर्शनार्थ मंच, कट्टा, चौथरा, चबुतरा,. रंग-/ नाट्य- / -मंच. नाट्यकला/ -व्यवसाय / -संस्था. (इमारत / सोपान / गर्त / रोग / आयुष्य / काम यांची) उंची / खोली / क्रम / अवस्था / प्रगति इ. ची विशिष्ट पातळी / स्तर / विशिष्ट भाग. अंतराचा विशिष्ट भाग. सार्वजनिक वाहनाचा थांबा / कप्पा.
stagger स्टॅगर् v.i.--- डगमगत चालणे. डळमळणे, डगमगणे. v.t.--- चकित / थक्क करणे, हादरविणे. (अनेक गोष्टी एकत्र / एकाच वेळी ना आणता त्यांची) अंतरे ठेऊन / अडवून मांडणी / व्यवस्था करणे. कामाच्या क्रमांत व्यवधान ठेवणे.
stagnant स्टॅग्नंट् a.--- कोंडलेला, मंद, घाणेरडा, अशुद्ध.
stagnate स्टॅग्नेट् v.i.--- गति मंद होणे, अडणे, खुटणे.
staid स्टेड् a.--- स्थिर, शांत, गंभीर, साधा, बाळबोध.
stain स्टेन् v.t.--- रंगवणे, डाग लावणे. n.--- डाग, रंग, ठिपका, काळिमा.
stair स्टेअर् n.--- पायरी, जिना, सोपान. Staircase --- जिना. Upstairs --- माडीवर. Downstairs --- तळमजल्यात.
stake स्टेक् v.t.--- खुंटा मारणे, पैज मारणे. n.--- खुंटा, मेख.
stale स्टेल् a.--- शिळे, वासट, उच्छिष्ट. v.i.--- मुतणे.
stalk स्टॉक् v.t.--- हळूच पाठलाग करणे. v.i.--- तोऱ्याने जाणे. n.--- काठी, चालण्याचा तोरा / अक्कड.
stall स्टॉल् v.t.--- तबेल्यात बांधणे, थांबविणे, अडविणे. n.--- ठाण, ठाणे.
stallion स्टॅलिअन् n.--- वळू, घोडा.
stalwart स्टॉल्वर्ट a./n.--- बलवान / सशक्त (व्यक्ति).
stamen स्टेमेन् n.--- फुलांतील केसर, पराग, पुंकेसर.
stamina स्टॅमिना n.--- टिकून राहण्याची शक्ति, दम.
stammer स्टॅमर् v.i./v.t.--- तोतरे बोलणे.
stammerer स्टॅमरर् n.--- तोतरे बोलणारा, तोतरा.
stamp स्टॅम्प् v.t.--- पायाने ठोकणे, छाप मारणे. n.--- छाप; रूप; तिकीट; ठेवण; मासला, जात.
stanch स्टांश्
stanchion स्टॅन्शन् n.--- आधार, टेकू.
stand स्टॅन्ड् v.i.--- उभे राहणे / असणे, जागी असणे, निभणे, दोषमुक्त ठरणे, सांचून राहणे. अढळ राहणे, उमेदवार असणे, पक्ष धरणे. v.t.--- सोसणे, सहन करणे. stand by : वाट पाहत तयार राहणे. n./a.--- आवश्यकतेनुसार वापरासाठीं सिद्ध ठेवलेला / राखीव (सैनिक समूह / वस्तु / साधन). Stand out v.i.--- उठून दिसणे (Indian stands out as one of these few countries.)
standby स्टॅन्ड्बाय् n.--- राखीव व्यक्ति / वस्तु. राखीव स्थिति. On stand by: राखीव स्थितीत, तयारीत राहून वाट पहात राहण्याच्या स्थितीत.
stand-off स्टॅन्ड्-आॅफ् n.--- / अटीतटीची / तुल्यबलांची टक्कर / संघर्ष / झुंज.
standard स्टॅण्ड(र्)ड् n.--- इयत्ता, वर्ग, प्रमाण, निशाण. विधि-/नियम-/रीति- -अनुसार विशिष्ट कमीत कमी आवश्यक / योग्य / चांगला असा दर्जा / प्रत. अशा प्रतीच्या मोजमाप आदि निर्धारित गुणांचे वर्णन. a.--- वरीलप्रमाणे आवश्यक / योग्य / चांगल्या प्रतीचा. प्रचलित, मान्य.
standardization / Standardisation स्टॅण्ड(र्)डाय्झेशन् n.--- ‘Standardize’ करण्याची (प्र-)क्रिया. प्रमाणीकरण.
standardize / Standardise स्टॅण्ड(र्)डाइझ् v.t.--- -ला विशिष्ट (आवश्यक / योग्य / चांगल्या) प्रतीचे / दर्जाचे रूप / योग्यता देणे. -(असा) दर्जा (विधि-/नियम- अनुसार) आवश्यक ठरविणे.
standing स्टॅन्डिंग् a.--- उभा राहणारा, कायम, प्रसिद्ध.
standish स्टॅन्डिश् n.--- कलमदान.
stanza स्टॅन्झा n.--- श्लोक, कविता, पद, कडवे.
staple स्टेपल् n.--- कोयंडा, उदीमाचा माल, वयापाराची जागा. तंतु, तंतूची प्रत. a.--- उदीमाचा.
star स्टार् n.--- नक्षत्र, तारा, ग्रह, चौफुली. v.t.--- फुल्या मारणे. Falling Star --- उल्का.
starch स्टार्च् v.t.--- खळ लावणे. n.--- खळ, पिष्टमय द्रव्य, आढ्यता.
stare स्टेअर् v.t.--- टक लावणे, न्याहाळणे. n.--- टक.
stark स्टार्क् a.--- ताठ, ताठर, कडक. नागडा, धादांत, अट्टल, पक्का. ad.--- अगदी, केवळ, पुरा.
starling स्टर्लिंग् n.--- साळुंकी, मैना, सारिका.
start स्टार्ट् v.i.--- निघणे, निसटून जाणे, मार्ग धरणे, दचकणे, महत्वास चढणे. n.--- चमक, दचका, प्रमाण, लहर, धक्का.
starters / Starter स्टार्टर्स् / स्टार्टर् n.--- भोजनांतील पहिला खाद्यपदार्थ-संच (उदा. आमटीभात इ.). पहिली / प्रथम गोष्ट. (For starters, the government may ask Sharad Pawar what he can do to retrieve the situation.)
starve स्टार्व्ह् v.i.--- उपाशी मरणे, उपासमार होणे.
stash स्टॅश् v.t.--- (गुप्त जागी) साठवणे. n.--- लपवण्याची / गुप्त जागा. गुप्त साठा.
stasis स्टेसिस् n.--- रक्तादि शरीरद्रवांच्या प्रवाहातील प्रतिबंध / त्यांची कोंडलेली स्थिति / अवरुद्ध अवस्था, कोंदटलेली अवस्था.
state स्टेट् v.t.--- हकीकत लिहिणे, कथन करणे. n.--- राज्य, सरकार, डौल. अवस्था, स्थिति. जगांतील विशिष्ट (प्रा-)देशांतील मानवसमाजव्यवस्थेच्या नियंत्रणाचे सार्वभौम / सर्वोच्च अधिकार बाळगणारी संस्था, राज्यसंस्था, शासनसंस्था, शासन, सरकार. अशा शासनसंस्थेच्या / शासनाच्या संघटनांचा समुदाय. (भारतीय घटनेनुसार / संविधानानुसार, भारतांतील सरकारें, भारतीय संसद, राज्यांची विधानमंडळे व भारतीय प्रदेशांतील अथवा भारतसरकारच्या नियंत्रणाखालील सर्व अन्य शासन-संघटना - या सर्वांचा यांत समावेश. (आर्टिकल १२, ३६)). a.--- डौलाचा, सरकारचा.
state-of-the-art स्टेट्-आॅफ्-द-आर्ट् n.--- (विशिष्ट तंत्र, विद्या, कला इ. मधील विशिष्ट काळचा) उत्तम / उत्कृष्ट / उंची दर्जा. a.--- अशा दर्जाचा, अत्याधुनिक-तंत्र-युक्त अत्युत्कृष्ट, अत्युत्तम, उत्कृष्ट, गुणवत्तायुत. (उदा: Implant of state-of-the-art pacemakers by AIIMS cardiologists)
stately स्टेट्ली ad.--- डामडौलाचा.
stateroom स्टेट्रूम् n.--- दिवाणखाना.
statesman स्टेट्स्मन् n.--- राजनीतिज्ञ, मुत्सद्दी. प्रशासन कार्यकुशल राजकारणज्ञ. सुप्रशासननिष्ठ राज्यकर्ता.
static स्टॅटिक् a.--- परस्परांशी समतोलांत असणाऱ्या / स्थिर वा अचल असणाऱ्या पदार्थांविषयींचा / गोष्टींविषयींचा. स्थिर, अचल. (opposite : dynamic).
station स्टेशन् In station: आपल्या मुख्य कार्यालय- / निवास- -स्थानी/-गावी अनुपस्थित.
statue स्टॅचू n.--- मूर्ति, पुतळा, प्रतिमा.
statuesque स्टॅचुएस्क् a.--- थोर, प्रतिष्ठित, सुंदर.
stature स्टॅचर् n.--- शरीराची उंची, कांठी.
status स्टेटस् n.--- पदवी, स्थिति, दर्जा.
statute स्टॅट्यूट् n.--- कायदा, ठराव, कानू, नियम.
statutory स्टॅट्यूटरि a.--- कायद्याने स्थापलेला.
staunch स्टाँश् / स्टाँच् v.t.--- -चा प्रवाह रोखणे / बंद करणे, -चे वाहणे थांबविणे. a.--- कणखर, कट्टर, दृढ, निष्ठावान, तत्वनिष्ठ.
stave स्टेव्ह् v.t.--- भोक / तोंड पाडणे. n.--- गाण्यांतील कडवे, फळी, दांडा, काठी, तुकडा. (off, from) v.--- दूर सारणे, निवारणे, रोखणे, पुढे ढकलणे, टाळणे .
stay स्टे n.--- टिकाव, वस्ती, निवास, खळ, तात्पुरता मुक्काम, खोळंबा, आधार, राहणे, तहकुबी, तकूबी, स्थगन/स्थगिति. थांबवणूक, विशिष्ट आज्ञेच्या कार्यवाहीवर / पालनावर तात्पुरती बंदी / मनाई करणारा आदेश). v.i.--- राहणे, टिकणे, खोळंबणे.
stay-put स्टे-पुट् v.i.--- आहे त्या ठिकाणी राहणे; थांबून राहणे, टिकून राहणे.
stays स्टेस् n.--- एक प्रकारची कांचोळी, बंडी.
stead स्टेड् n.--- जागा, ठिकाण. In-stead-of --- ठिकाणी, बदली, जागी, ऐवजी.
steadfast स्टेड्फास्ट्, Steady स्टेडी a.--- एककल्ली, निर्धाराचा, स्थिर, दृढ, खंबीर, निश्चल, भक्कम.
steadily स्टेडिलि ad.--- निश्चयाने, निग्रहाने, अखंड.
steal स्टील् v.t.--- चोरणे, हरणे, हात मारणे, चोरपायांनी जाणे.
stealing स्टीलिंग् n.--- चोरी, चोरीचा माल, चौर्य.
stealth स्टेल्थ् n.--- चौर्यकर्म.
stealthy स्टेल्थिलि a.--- चोरून.
steam स्टीम् v.i.--- वाफ निघणे, वाफेने चालणे. n.--- वाफ, घाम.
steam boat स्टीम्-बोट् n.--- आगबोट. Steam engine --- वाफेचे इंजिन, वाफेचे यंत्र.
steamy स्टीमी a.--- बाष्पमय.
steed स्टीड् n.--- लढाऊ घोडा, वारू, तुरग.
steel स्टील् n.--- पोलाद. a.--- पोलादी. v.t.--- पोलाद घालणे.
steep स्टीप् v.t.--- भिजत घालणे, बुडविणे, चिंब करणे. (in) -ने भिजवून टाकणे, -ने भरून / वेष्टून / आक्रांत करून टाकणे. -ने बेहोश / बेशुद्ध / संवेदनाहीन करणे. n.--- कडा, उभा सूळ. a.--- उभा, उभ्या चढणीचा, सुलासारखा, खडा, अत्याधिक, तीव्र, अवघड.
steeple स्टीपल् n.--- घुमट, घुमटी.
stenographer स्टेनोग्राफर् n.--- आशुलिपिक, लघुलिपिक.
stenography स्टेनोग्राफी n.--- लघुलिपि, आशुलिपि.
stentorian स्टेन्टोरियन् a.--- (ग्रीक योद्धा Stentor सारखा) प्रचंड व दूरगामी आवाज असलेला; खणखणीत दुमदुमणारा (आवाज).
step स्टेप् (सावत्र या अर्थाचे उपपद) --- v.i.--- पाऊल टाकणे. n.--- पाऊल, कदम, पायरी. (pl.) --- वाट, मार्ग. Step by step --- पायरी पायरीने. Step brother --- सावत्र भाऊ. Step daughter --- सावत्र मुलगी. Step mother --- सावत्र आई. Step sister --- सावत्र बहीण. Step son --- सावत्र मुलगा. Step child --- सावत्र मूल. (भावंडांच्या संदर्भात ‘step’ व ‘half’ या उपपदांतील अर्थभेद: हाफ ब्रदर किंवा हाफ सिस्टर म्हणजे ज्यांची आई किंवा वडील एकच असतात. उदा. राम-लक्ष्मण. पण जर आई आणि वडील या दोघांचंही दुसरं लग्न असेल आणि त्यांना पहिल्या लग्नापासून अपत्यं असतील तर त्या दोघांच्या लग्नानंतर ती मुलं एका घरात येतात, आणि मग त्यांचे आई-वडील कोणीही एक नसतात, अशा नात्याला स्टेप-ब्रदर किंवा स्टेप सिस्टर म्हणतात.)
steppe स्टेप् n.--- उत्तरपूर्व युरोप व सैबेरिया यांमधील मैदानी प्रदेश.
stereotype स्टीरिओ(-अ)टाइप् n.--- सर्वसाधारण / ठरीव गुणधर्म असलेला ठसा / नमुना. (एखाद्या गटाची) सर्वसामान्य धारणा / भूमिका / वृत्ति / स्वभाव.
sterile स्टेराइल् a.--- नापीक, वांझ, भरड, भुकट, निर्जंतुक. निष्फल.
sterility स्टरिलिटी n.--- नापीकपणा, वांझपणा. फलोत्पादन-/प्रजोत्पादन- शक्ती संपल्याची/नष्ट झाल्याची अवस्था/स्थिति. जंतुमुक्त स्थिति/अवस्था.
sterilization स्टेरिलायझेशन् n.--- फलोत्पादन-/प्रजोत्पादन- शक्तीचा अवरोध. जंतुमुक्त / जंतुरहित करण्याची प्रक्रिया.
sterilize स्टेरिलाइझ् v.t.--- -ची फल / प्रजा उत्पन्न करण्याची क्षमता नष्ट करणे / थांबविणे. -ला जंतुविरहित करणे.
sterling स्टर्लिंग् n.--- इंग्लंडमधील पेनी नावाचे चांदीचे नाणे (मूळ अर्थ); इंग्लंडमधील (२४० पेनींचा बनणारा) पौंड. “Pound” शब्दापुढे इंग्लंडमधील चलनाचा दर्शक शब्द. (Pound Sterling). a.--- उत्कृष्ट, अस्सल दर्जाचा (गुण, तत्व, शील).
stern स्टर्न् a.--- निष्ठुर, कडवा, खंबीर. करडा, कडक, कठोर.
sternum स्टर्नम् n.--- उराचे हाड.
steroid स्टिअरॉइड् n.--- चरबीसारखे (औषधी) मिश्रण.
stethoscope स्टेथोस्कोप् n.--- (Stethos (ग्रीक शब्द) = छाती) शरीरांतील आवाज ऐकून रोगनिदान करण्याचे एक यंत्र.
stevedore स्टीव्हिडोअर् n.--- (जहाजावर / जहाजामधून) माल चढविण्याचे / उतरविण्याचे काम पाहणारा. v.--- असे काम करणे.
steward स्ट्युअर्ड् n.--- घराचा कारभारी / व्यवस्थापक. विमान-मंडळी इ. मधील चहापाण्याची इ. ची व्यवस्था पाहणारा.
stewardship स्ट्युअर्ड्शिप् n.--- कारभार्याचे काम.