Lob लॉब् n.--- लोंबणारा गोळा, लोळ; (गोळ्यांतील दागिन्याचे) खोड; लंबक (तत्सदृश वस्तु), तरंगत / लोम्बत राहणे; फेकणे (चेंडू, गोळा, हातबॉम्ब, इ.).
Lobby लॉबि n.--- ओटी, देवडी, सोपा, ओटी, पडवी, ओसरी, घराच्या मुख्य दालनाला लागून असलेली, मोकळी-उघडी-शी, छताची, भेटीस येणाऱ्या इ. ना थांबण्याबसण्याची जागा / उपदालन. Lobbying करणारा गट, विशिष्ट भूमिकेचा / योजनेचा पुरस्कार / प्रचार / पाठपुरावा करणारे संघटित मंडळ. v.i.--- (महत्वाच्या lobbies मध्ये ऊठ-बस ठेवून) विशिष्ट विचार / धोरण / काम पुरस्काराणे / प्रचारिणे / तडीस नेवविणें.
Lobe लोब् n.--- पुढे आलेला गोलाकार भाग / अवयव.
Lobster लॉब्स्टर् n.--- एक जलजंतु (माशाप्रमाणे खाण्यात असणारा).
Local लोकल् a.--- देशाचे, स्थानाचे, देशसंबंधी, स्थानिक. n.--- स्थानिक बातमी, मोठ्या शहरापासून जवळच्या गावास जाणारी आगगाडी.
Locale लोकाल् n.--- (घटना-)स्थळ, (कार्य-) स्थळ, परिसर, आसमंत.
Locality लोकॅलिटि n.--- जागा, स्थान, स्थिति, वस्ति.
Locate लोकेट् v.t.--- ठेवणे, बसणे, नेमणे.
Lock लॉक् v.t.--- कुलूप लावणे, किल्ली करणे. n.--- कुलूप, झुलूप, चाप, पेंच, पकड, टाळे, केसांचा झुबका. कालव्यातील / नदीच्या प्रवाहातील झडप / दार.
Lock-smith लॉक्स्मिथ् n.--- कुलपे करणारा लोहार.
Locker लॉकर् n.--- खण, फडताळ.
Locket लॉकेट् n.--- फासा, अडकवण.
Lockjaw लॉक्जॉ n.--- दातखिळी (धनुर्वाताचे एक प्रारंभिक लक्षण).
Lockup लॉकप् n.--- कच्चा कैदखाना, कोंडवाडा.
Locomotion लोकोमोशन् n.--- गमनशक्ति, स्थलांतर.
Locus लोकस् n.--- (pl. Loci लोसाय्) स्थान, अधिष्ठाण; विशिष्ट नियमानुसार फिरणाऱ्या (किंवा विविध स्थाने धारण करणाऱ्या) बिंदूच्या सर्व संभाव्य स्थितीस्थानांनी बनणारी रेखा / आकृति.
Locust लोकस्ट् n.--- (थव्यांनी संचार करून वाटेतील वनस्पति / पिके फस्त करणारा) टोळ, नाकतोडा. पहा : grasshopper.
Lode लोड् n.--- नाला, पाण्याचा प्रवाह.
Lodestar लोड्स्टार् n.---
Lodestone लोड्स्टोन् n.---
Lodge लॉज् v.t.--- बिऱ्हाड करणे, राहणे. n.--- लहान घर, बंगली.
Lodger लॉजर् n.--- भाडेकरी, बिऱ्हाडकरू, भाडोत्री.
Lodging लॉजिंग् n.--- मुक्काम, बिऱ्हाड, भाड्याची जागा.
Loft लॉफ्ट् n.--- माळा, माडी, माळ्यावरची खोली. v.t.--- प्रक्षेपित करणे, फेकणे.
Lofty लॉफ्टि a.--- उंच, मगरूर, चढेल, प्रौढ.
Log लॉग् n.--- ओंडा, करांडा, ढोणकूर.
Loggerhead लॉगर्हेड् n.--- अकलेचा खंदक, टोणपा.
Logic लॉजिक् n.--- तर्कशास्त्र, न्यायशास्त्र, न्याय.
Logical लॉजिकल् a.--- तार्किक, तर्कशुद्ध, तर्कनिष्ठ, तर्कसंगत, सुसंगत. To carry (something) to its logical conclusion--- (विचार / क्रिया) सुतारकानुसार अखेरच्या निष्कर्षापर्यंत नेणे / आचरणे. (हिंदी: -की तार्किक परिणति तक पहुंचाना).
Logician लॉजिशन् n.--- तर्कशास्त्री, नैय्यायिक, तर्की.
Logistic(al) लजिस्टिक्(-कल्) a.--- मोजणी / गणिती / हिशेब यासंबंधीचा. Logistics’ संबंधीचा / स्वरूपाचा. ‘Logistics’ गणिती हिशेबाचे कौशल्य / कला. सैन्याच्या हालचालीचे / शिबिरस्थानाचे शास्त्र, वयूह-/वयोवहां-(शास्त्र). कोणत्याही मोठ्या कामाच्या पूर्ततेचा / कार्यान्वयनाचा सविस्तर आराखडा.
Logistics लजिस्टिक्स्
Logo लोगो n.--- एखाद्या संघटनेचे कलात्मक / सचित्र चिन्ह, परिचयचिन्ह , ध्वज.
Logorrhea लॉगऱ्हीया n.--- वाचाळता, वटवट, वाग्जाल.
Logwood लॉग्वुड् n.--- पतंगाचे लाकूड / झाड.
Loin लॉइन् n.--- कमर, कटी, जननेंद्रियावरील भाग, जननेंद्रियप्रदेश, गुह्यांग.
Loiter लॉइटर् v.i.--- गमणे, गमत रमत चालणे, तरंगणे.
Loiterer लॉइटरर् n.--- चेंगट, गमणारा, टेहळ्या.
Loitering लॉइटरिंग् n.--- टेहळणी, चेंगटपणा.
Loll लॉल् v.i.--- आळसाने अंग टाकणे, जीभ लळलळ करणे. v.t.--- जीभ काढणे, लळलळ करणे.
Lone लोन् a.--- केवळ, एकटा, एकाकी.
Lonely लोन्लि a.--- एकटा, निर्जन, एकला.
Loneliness लोन्लिनेस् n.--- एकटेपणा, सडेपणा.
Loner लोनर् n.--- एकाकी पडलेली / एकांतप्रिय (विविक्तसेवी) व्यक्ति.
Long लाँग् a.--- लांब, चेंगट, दीर्घ, मोठा. ad.--- लांब, दूरवर, लांबवर. v.i.--- इच्छा होणे, प्राण टाकणे, जीव टांगलेला असणे, डोहाळे लागणे. Long ago लाँग् अगो ad.--- फार दिवसांपूर्वी.
Long - faced लाँग्फेस्ड् a.--- चिंताक्रान्त मुद्राचा.
Longbow लाँग्बो n.--- लांबलचक मनुष्य.
Longbreathed लाँग्ब्रीथ्ड् a.--- दमदार.
Longer लाँगर् n.--- वासना गेलेला, इच्छिणारा.
Longeval लॉन्जीव्हल् a.--- चिरंजीवी, दीर्घायु.
Longevity लॉन्जेव्हिटि n.--- दीर्घायुष्य, चिरायुष्य.
Longface लाँग्फेस् n.--- संचित / चिंताग्रस्त मुख / मुद्रा / चेहरा.
Longing लाँगिंग् n.--- आशा, भूक, डोहाळे.
Longitude लाँजिट्यूड् n.--- लांबी, रेखांश.
Longitudinal लाँजिट्यूडिनल् a.--- लांबीचा.
Longsighted लाँग्साइटेड् a.--- दूरदृष्टि, दीर्घदृष्टि.
Longsome लाँग्सम् a.--- फार लांब, कंटाळवाणा.
Longsuffering लाँग्सफरिंग् a.--- सहनशीलता, क्षमा.
Longwise लाँग्वाइज् ad.--- लांबीने, लांबीकडून.
Look लुक् v.i.--- पाहणे, नजरेस येणे, पुढे तोंड असणे. n.--- चेहरा, आकार, डौल, मुद्रा, चर्या. To look in - आंत जाणे. Look into - तपास करणे. To look out - सावध राहणे. Look up - (संदर्भग्रंथ इ. मध्ये) शोधणे / पाहणे. -ला ऊभाऊबही भेटून येणे, -ला धावती भेट देणे. सुधारणे.
Lookalike लुकलाइक् n.--- समानरूपाची वस्तु / व्यक्ति. सरूप, प्रतिरूप, प्रतिकृति. हुबेहूब, स(मान)रूप व्यक्ति / वस्तु.
Looking-glass लुकिंग्ग्लास् n.--- आरसा, आरशी.
Loom लूम् v.i.--- अंधुक दिसणे. अस्पष्टपणे / भीतिदायकपणे / अवाढव्यपणे / विस्तीर्णपणे / व्यापकपणे प्रकटणे / आकारणे. तरळणे n.--- कोष्ट्याचा माग.
Loon लून् n.--- हरामजादा, हरामी, दुर्जन.
Loony लूनी a.--- वेडा, पिसा, खुला, माथेफिरू.
Loop लूप् n.--- फास, आढी, तिढा, फट, भोंक.
Loophole लूप्होल् n.--- (प्रकाशकिरण, अस्त्र, इ. ना) वाट करून देणारे लहान भोक / छिद्र. अडचणीच्या प्रसंगी उपलब्ध / उपलभ्य सुटकेचा लहानसा मार्ग / उपाय. विपरीत स्थितीतील कामी येऊ शकणारा दोष / उणीव / संदिग्धता, पळवाट.
Loopy लूपी a.--- अडचणींनी / टिढ्यांनी भरलेला. गुंतागुंतीचा, लबाडीचा, चालाखीचा.
Loose लूझ् v.t.--- मोकळा करणे, सुटका करणे, (गाठ / मोळी,इ.) सोडणे. n.--- मोकळीक, मुक्तता. a.--- मोकळा, सुटा, ढिला.
Loosen लूझन् v.t.--- -ला ढिला / मोकळा सोडणे, -ला सैल करणे.
Looseness लूझ्नेस् n.--- ढिलाई, शैथिल्य.
Loot लूट् n.--- लूट. v.t. and v.i.--- लुटणे.