Cav-Cen

Cavalcade कॅव्हल्केड् n.--- स्वारी, घोडेस्वारांचा छबिना, मिरवणूक, ओघ, रांग.
Cavalier कॅव्हलिअ(र्) n.--- घोडेस्वार. a.--- मस्तवाल, अभिमानी, घमेंडखोर, दुसऱ्याला तुच्छ लेखणारा, बेपर्वा, बेफिकीर.
Cavalry कॅव्हल्री n.--- घोडेस्वारपलटण, अश्वसेना, भूसेनेच्या वाहनारूढ विभाग, सशत्र-वाहन-दल.
Cave केव्ह् n.--- विवर, गुहा, गुंफा, भुयार.
Caveat केव्हिअॅट् n.--- आपले म्हणणे ऐकल्याशिवाय विशिष्ट बाबीत कांही आज्ञा न करण्याबद्दल संबंधित अधिकार्यास एका पक्षाने दिलेले इशारे व निवेदन/अर्ज. इशारा, टाकेद, चेतावणी(हिंदी). To enter/put in caveat= वरीलप्रमाणे इशारा देणे .
Caveat emptor केव्हिअॅट् एम्प्टॉ(र्) n.--- (buyer beware) विक्रेत्याची हमी नसेल, तर मालाच्या प्रतीची जबाबदारी खरीदणाऱ्याची - हे व्यापारातील तत्व.
Cavern कॅव्हर्न् n.--- दरी, दरीखोरी, गुहा.
Cavernous कॅव्हर्नस् a.--- गुहा/भुयारे इ. नी युक्त/भरलेला. गुहा/भुयार यांशी संबंधित, गुहेसारखा, भुयारासारखा.
Caviar/Caviare कॅव्हिआ(र्) n.--- खारविलेल्या माशांचे खाद्य.
Cavil कॅव्हिल् v.i.--- पोकळवाद करणे, निष्कारण क्षुल्लक दोष काढणे, कुत्सितपणे उणे काढणे.
Cavity कॅव्हिटि n.--- पोकळी, खळगा, खाच.
Cavort कव्हॉर्ट् v.i.--- धिंगाणा घालणे, धिंगामस्ती करणे.
Caw कॉ v.i.--- कावकाव करणे. n.--- कावकाव.
C.B.I. (हिंदी: केंद्रीय जांच ब्यूरो) = भारतीय केंद्रसरकारची गुन्ह्याची (विशेषतः सरकारी नोकरीच्या) चौकशी करण्याची संस्था.
C.E. = Common Era = A.D.
Cease सीझ् v.t.--- and v.i.--- थांबवणे, संपविणे, थांबणे, स्तब्ध होणे, पडणे, संपणे. (n)= Cessation.
Cease fire सीझ्-फायर् n.--- गोळीबाराला दिलेला (तात्पुरता) विराम, (तात्पुरती) युद्धबंदी.
Ceaseless सीझलेस् a.--- निरंतर, सतत, अविश्रांत.
Cedar सीडर् n.--- देवदाराच्या जातीचे एक झाड
Cede सीड् v.t.--- सोडून देणे, स्वाधीन करणे, (तडजोड इ. द्वारा) (दुसऱ्यासाठी) सोडणे, (दुसऱ्यास) देऊन टाकणे.
Ceiling सीलिंग् n.--- तक्तपोशी, छत, चांदवा.
Celebrate सेलिब्रेट् v.t.--- पाळणे, समारंभ करणे, प्रसिद्ध करणे.
Celebrated सेलिब्रेटेड् a.--- नामांकित, प्रसिद्ध, प्रख्यात.
Celebration सेलिब्रेशन् n.--- समारंभ, सताव, उत्सव.
Celebrity सेलिब्रिटि n.--- नांवलौकिक, धेंड, प्रस्थ.
Celerity सेलिरिटी n.--- त्वरा, वेग, त्वरितगति.
Celestial सिलेश्चल् a.--- स्वर्गातला, आकाशातला.
Celestial globe सिलेश्चल् ग्लोब् n.--- खगोल.
Celibacy सेलिबसी n.--- ब्रह्मचर्य, संभोगविरक्ति.
Celibate सेलिबेट् n.--- अविवाहित मनुष्य , ब्रह्मचारी.
Cell सेल् n.--- खळगी, घर, खून, पूड, कोष्टक, लहान खोली, / आवार / दालन / कोठी /कोठडी / कक्ष; विशिष्ट कामासाठी बनलेला मोजक्या व्यक्तींचा लहान गट /संगठना/समूह/मंडळ, अशा गटाची कामाची जागा; (रासायनिक प्रक्रियेने) विजेचा प्रवाह निर्मिणारे/पुरविणारे यंत्र/उपकरण, विजेरी; जीवाप्राया शरीरद्रव्य (protoplasm) व त्याचे तन्निर्मित आधारभूत आजीव, तंतुप्रधान द्रव्य यांचा वेष्टनावगुंठीत, सूक्ष्म, स्वतंत्रपणे वावरू शकणारा किंव्हा समूहाने प्राणिशरीरातील हालचाली चालविणारा, विशिष्ट प्राणिजातीचा विशिष्ट गुणांनी युक्त सजीव समुच्चय, पेशि, पेशी, पेशिका (हिंदी: कोशिका, कोशाणु).
Cellar सेलर् n.--- तळघर, पेंव, भुयार, कोठार, कोठी, कोठडी.
Cell phone सेल्फोन् n.--- (short form of ‘cellular radio telephone) ‘Cell’ (विजेरी) वर चालणारा दूरध्वनि.
Cellular सेल्युल(र्) a.--- ‘Cell’ च्या /संबंधित/-स्वरूपाचा, पेशीय, पेशिकीय (हिंदी: कोशिकीय), पोकळी-युक्त, सच्छिद्र.
Celluloid सेल्युलॉइड् n.--- कापूर वगैरे जिनसांचा रांधा.
Cellulose सेल्युसोस् n.--- वनस्पतीच्या घन-शरीराचे एक मिख्या, गंधहीन. रस(चव) हीन, सामान्यतः न विरघळणारे द्रव्य.
Celsius सेल्सिअस् / सेल्शस् a.--- तापमान मोजणीच्या मापासंबंधीचा. n.--- तापमान मोजणीचे एक शातांशात्मक (centigrade) माप ज्यात पाण्याच्या सामान्य वातावरणीय दबावाखाली गोठण्याचे / गोठणबिंदूचे तापमान ० अंश व उत्कलन बिंदूचे तापमान १०० अंश मानतात. (पहा: ‘Fahrenheit’)
Censor सेन्सर्
Censorship सेन्सरशिप्
Cement सिमेंट् n.--- गिलावा, लुकण, बांधकामातील घटकांना दृढपणे एकजीव करणारी चुनखडी इ. द्रव्यांची पूड/चूर्ण. संधानचूर्ण, संधानद्रव्य. v.t.--- सांधणे.
Cemetery सेमट्री / सेमिटरी n.--- स्मशानभूमि, प्रेते पुरण्याची श्मशानभूमि.
Cense सेन्स् v.t.--- धूप देणे.
Censer सेन्सर् n.--- धूपारति, धुपाटणे.
Censor सेन्सर् n.--- (अश्लीलता, अब्रूनुकसानी इ. कारणास्तव) (पुस्तक, लेख, चित्रफीत इ.) प्रकाशनांमध्ये काटछाट करणारा किंव्हा त्यावर बंदी घालणारा अधिकारी. v.t.--- वरील प्रमाणे काटच्हात करणे / बंदी घालणे.
Censorious सेन्सोरिअस् a.--- दोषारोपी, निन्दाखोर.
Censorship सेन्सर्शिप् n.--- ‘Censor’ ने केलेली काटछाट / घातलेली बंदी; अशी काटछाटीची / बंदीची प्रक्रिया.
Censurable सेन्शरेबल् a.--- दोष लावण्याजोगा.
Censure सेन्शर n.--- दोष, गर्हणा, निंदा, भर्सना, ताडना. v.t.--- दोष/बोल लावणे.
Census सेन्सस् n.--- खानेसुमारी, शिरगणती.
Cent सेन्ट् n.--- शतक, शेकडा, एक नाणे.
Centage सेन्टेज् n.--- शेंकड्याचा भाव.
Centanarian सेन्टेनेरिअन् n.--- शंभर वर्षाचा मनुष्य.
Centenary सेन्टिनरी n.--- शतक, शेकडा, शतवार्षिकोत्सव. a.--- शतकाचा, शतवार्षिक.
Center = Centre
Centigrade सेंटिग्रेड् a.--- शतांशात्मक.
Centigram सेन्टिग्रॅम् n.---ग्रॅम वजनाचा शतांश.
Centimeter सेन्टिमीटर् n.--- मीटरचा शतांश.
Centipede सेन्टिपीड् n.--- घोण, गोम, शतपदी.
Central सेन्ट्रल् a.--- मधला, मध्ये आलेला, मध्यस्थ.
Centre सेन्टर् n.--- मध्य, मध्यबिन्दु, केंद्र, एखादी क्रिया, वस्तु, विषय आधिक्याने घडत असण्याची/अस्तित्वात असण्याची/ एकत्र होत असण्याची /अन्यत्र प्रसृत होत असल्याची जागा. v.i.--- ‘centre’ मध्ये एकत्र येणे, केंद्रित /केंद्रीभूत /एकाग्र होणे, एकाग्रणे.
Centric सेन्ट्रिक् a.--- केंद्रीभूत, केंद्रीय. (सामान्यतः समासांती उपयुक्त: उदा: ‘India-centric discussion’).
Centrifuge सेन्ट्रिफ्यूज् n.--- वेगवेगळ्या विशिष्ट गुरुत्वाच्या द्रव्यांना अलग करण्याची किंव्हा अवकाशयानप्रवासाच्या अभ्यासाची फिरती यंत्रपेटिका.
Centrifugal सेण्ट्रिफ्यूगल् / सेण्ट्रिफ्यूगल् a.--- केंद्रत्यागी, केंद्रापासून दूर जाणारा/जाण्याची प्रवृत्ती असलेला, केंद्रापसारी, अपकेंद्री, केंद्रोत्सारी, केंद्रापकर्षी.
Centripetal सेन्ट्रिपेटल् a.--- केंद्रगामी, केंद्र्राकडे झुकणारा/झुकण्याची प्रवृत्ति असलेला.
Centuple सेन्ट्युपल् a.--- शंभरपट, शतगुण.