pi-pil

pi पाय् n.--- ग्रीक वर्णमालेतील १६ वा वर्ण. ग्रॅम लिपीत ‘’ असा लिहिला जाणारा. वर्तुळाचा परिघ व व्यास यांचे परस्परप्रमाण (अंदाजे २२/७ अथवा ३. ४१५९२६५).
piacular पायाक्युलर् a.--- प्रायश्चित्त पाहिजे असा.
piano पिआनो n.--- एक प्रकारचे वाद्य.
piazza पिअॅझा n.--- शहरांतील मोठा चौक, सज्जा, पडवी.
pica पायका n.--- एक प्रकारचा टाईप.
pice पाइस् n.--- पैसा. (pl. Pice).
pick पिक् n.--- (फोडण्याचे / कोरण्याचे) टोकदार हत्यार, पिकाव, सुतकी, कोरणे, वेचणे. v.t.--- उचलून घेणे, निवडणे, बोचणे, खुडणे, वेचणे.
pickaxe पिकॅक्स् n.--- पिकाव, पिकंदर, टिकाव.
picket पिकेट् n.--- मेख, गज, खुंटा, पहाऱ्याची (सैनिकी) चौकी.
pickle पिकल् n.--- मसाला, लोणचे, चवचव.
picklock पिक्लॉक् n.--- कुलूप काढण्याची सळई, चोर.
picknick / Picnic पिक्निक् n.--- वनभोजन. रम्य स्थानाची छोटी सामूहिक सहल. v.t.--- अशी सहल / वनभोजन करणे.
pickpocket पिक्पॉकेट् n.--- उचल्या, भामट्या, खिसेकापू.
pictorial पिक्टोरिअल् a.--- सचित्र, चित्राचा, चित्रमय.
picture पिक्चर् v.t.--- चित्र / तसबीर काढणे. n.--- चित्र.
picturesque पिक्चरेस्क् a.--- चित्रासारखे, सुरेख, हुबेहूब.
piddle पिडल् v.i.--- नाकाओठावर खाणे, रेंगाळणे.
pidgin / Pidjin पिजिन् / पिजन् n.--- चिनी व इंग्लिश चे मिश्रण असलेली वयापारी बोली / भाषा. भिन्न भाषांच्या भेसळीने बनलेली व्यवहारांतील बोली / भाषा. a.--- अन्य भाषणाची भेसळ झालेली (विशिष्ट भाषा). Eg.--- Pidgin - English, Pidgin - Assamese (eg. Nagamese common to all Naga tribes)
pie पाय् n.--- पोळी, पाव, केक, ढोकळा, इ. बनविण्याची थाळी. अशा थाळीतील खाद्यपदार्थ.
piebald पायबाल्ड् a.-- चित्रविचित्र.
piece पीस् n.--- तुकडा, अंश, डाग, नग, ताका, नाणे. तोफ, बंदूक. (विशिष्ट गटाचा) (प्रातिनिधिक) घटक. विशिष्ट कामांसाठी केलेला / काढलेला निश्चित मोजमापाचा एक तुकडा. लेखन, कलाकृति, रचना, जुळणी आदी चे विशिष्ट कार्य / उदाहरण / नमुना. एखाद्या लेखनकृतींतून वेगळा काढलेला उतारा. (बद्धिबळ आदी खेळांतील सोंगटी / मोहरा.)
piece de resistance पायेस् द रेझिस्टान्स् n.--- भोजनसामग्रीतील मुख्य पदार्थ; मुख्य भाग, गाभा, मुख्यांश.
piecemeal पीसमील् ad.--- तुकडे तुकडे करून.
piecework पीसवर्क् n.--- उक्ते काम, खंड काम.
pied पाइड् a.--- रंगीबिरंगी पोषाखाचा, चित्रविचित्र वेषाचा.
pier पियर् n.--- पुलाचा दगडी खांब, मनोरा, धक्का. नौकांना किनाऱ्याजवळ चढउतारासाठी थांबण्यास अथवा जलाशयासाठी फेरफटका करण्यास बांधलेला, अंशतः पाण्यांत प्रविष्ट, बंधारा.
pierce पिअर्स् v.t.--- टोचणे, रुतणे, भेदणे, घुसणे, मनास लागणे, मनोगत जाणणे, भेद करणे, बोचणे.
piercing पिअर्सिंग् a.--- मनास लागणारा / रुतणारा / बोचणारा, कडक, कर्कश, तीक्ष्ण, भेदक.
pietist पाएटिस्ट् n.--- ईश्वरनिष्ठ, धर्मनिष्ठ, निष्ठावान, भक्त.
piety पाईटि n.--- धर्म/ईश्वरनिष्ठा, पितृभक्ति.
piffle पिफल् v.i.--- व्यर्थ / अर्थहीन बडबड / बॅरल करणे. n.--- बरळ.
piffling पिफ्लिंग् a.--- बाष्कळ, फोल, क्षुल्लक.
pig पिग् n.--- डुक्कर. v.t.--- डुकराप्रमाणे राहणे.
pig-rat = Bandicoot.
pigeon पिजन् n.--- खबूतर. = Pidgin.
piggyback पिगिबॅक् v.--- दुसऱ्यावर स्वार होऊन / दुसऱ्याच्या आधाराने चालणे; दुसऱ्याच्या बळावर विसंबणे.
pigment पिग्मेंट् n.--- रंग.
pigmy पिग्मि n.--- लहान, वामनमूर्ति.
pike पाइक् n.--- भाला, बर्ची. Pikeman n.--- भालेवाला, द्वारपाळ. Pike staff n.--- भाल्याची कांठी, शूलदंड.
pilaster पिलॅस्टर् n.--- चौकोनी खांब.
pile पाइल् v.t.--- रास करणे. n.--- रास, गंज, वाडा, धिरा, चिता, खुंट. चवड, एकावर-एक रचून केलेला द्रव्यांचा / वस्तूंचा ढीग / स्तंभ / खांब. भुसभुशीत / कच्च्या / कमकुवत जमिनीवरील मोठ्या / अवजड बांधकामासाठी बनविण्याच्या, भूपृष्ठापासून भूगर्भातील (सुमारे १० मीटर वा अधिक खोल, भक्कम खडकांपर्यंत पोचणाऱ्या बांधकामाच्या भक्कम पायाद्रव्यान्नी (सिमेंट, लोखंड, चुना इ.) ठासून भरलेल्या आधारभूत स्तंभांपैकी एक.
pile-foundation ‘piles’- आधारित पाया / मूलाधार.
piles पाइल्स् n.--- मूळव्याध, अर्श. (संस्कृत: अर्शस्).
pilfer पिल्फर् v.t.--- चोरणे, उचलणे, क्षुल्लक व किरकोळ वस्तूंची चोरी करणे, भुरटी चोरी करणे.
pilgrim पिल्ग्रिम् n.--- यात्रेकरू, विदेही, त्यागी.
pilgrimage पिल्ग्रिमेज् n.--- तीर्थयात्रा, तीर्थाटण.
pill पिल् n.--- गोळी, गुटिका. v.t.--- लुटणे.
pillage पिलेज् n.--- लूट, दरोडेखोरी, लूटमार, विध्वंसयुक्त लुटालूट. v.t.--- लुटणे, बुचाडणे. लुटून नेणे, दरवडा घालून नेणे; जबरदस्तीने लुबाडणे, लुटून उध्वस्त करणे.
pillar पिलर् n.--- खांब, स्तंभ, आधार. a.--- स्तंभाश्रित.
pillory पिलरि n.--- मानखोडा.
pillow पिलो n.--- उशी, तक्क्या. Pillow ship --- अभ्रा.
pilot पायलट् n.--- पाण्यांतील वाटाड्या, कर्णधार, तांडेल.