fos-fyk

fossick फॉसिक् v.i.--- धुंडाळणे, एखादी वस्तू शोधण्यासाठी उसका-उसकी करणे, कसून तपासणी करणे. v.t.--- शोधणे, शोधून काढणे.
fossil फॉसल् शिलास्थि (सावरकर), जीवाश्म (हिंदी), अश्मास्थि, पुराणमतवादी व्यक्ति, अतिकठिण / लवचिकता नष्ट झालेली वस्तु. a.--- ‘Fossil’ च्या रूपातला, जुनापुराणा, कालबाह्य झालेला.
fossilize फॉसलाइझ् v.t./v.i.--- ‘Fossil’ होणे / करणे, ‘फॉसल’-समान (घट्ट/कठिण/अपरवर्तनीय) होणे/करणे.
foster फॉस्टर् v.t.--- ० चे (मातापित्या-समान भूमिकेने) पालनपोषण करणे, पालनपोषण करून वाढविणे. a.--- माता- पित्यासमान भूमिकेने केलेल्या पालन-पोषणांतून उत्पन्न नातेसंबंध असलेला, ‘ दूध---’ या उपपदानें व्यक्त नाते जडलेला.
foul फाउल् a.--- अप्रामाणिक, कपटी, विश्वासघातकी, हलकटपणाचा, धोकेबाजीचा, दगाबाजीचा. (खेळांत) नियमबाह्य, लज्जास्पद, नियमभंगकारक, चुकीचा, गुंतागुंतीचा, गोंधळाचा, थडकाथडकीचा, गलिच्छ, दूषित, हीन, अश्लील, अनैतिक, शिवराळ. v.t.--- (खेळांत) नियमभंग करणे, अडविणे, ०ची मानहानि करणे. n.--- (खेळात) गुंतागुंत, धडकाधडकी, थडकाथडकी, नियमभंग, चूक.
found फाऊण्ड् n.--- (छपाई कामांतील) fount/font
fountain-pen फाउण्टन् पेन् n.--- शाईचा साठा बाळगणारा व शाई टोकांत आपोआप पाझरविणारा टाक, अखंड टाक, स्वयंटाक, झरणी.
fox फॉक्स् v.t.--- गोंधळविणे, बुचकळ्यात टाकणे, ०वर मात करणे, ०वर मात करणे, ०ला निरुत्तर करणे.
foxhole फॉक्स्होल् n.--- तोफा आदींचा मारा चुकविण्यासाठीं केलेला खड्डा / चर / गर्ताश्रय.
fraction फ्रॅक्शन् n.--- अपूर्णाङ्क, vulgar fraction व्हलगर् फ्रॅ.--- व्यवहारी अपूर्णाङ्क, शुद्ध अपूर्णाङ्क, like fractions लाइक् फ्रॅ.--- सामान छेद असणारे अपूर्णाङ्क, unlike fractions अन्लाइक् फ्रॅ.--- असमान छेद असणारे अपूर्णाङ्क, proper fraction प्रॉपर् फ्रॅ.--- लहान अंश व लहान छेद यांनी बनलेला अपूर्णाङ्क. improper fraction इम्प्ऱॉपर् फ्रॅ.--- मोठा अंश व लहान छेद यांनी बनलेला अपूर्णाङ्क.
fractious फ्रॅक्शस् a.--- चिडखोर, ताब्यात ना राहणारा, उन्माद, कल्पित, बेलगाम, अपवर्तक, दुराग्रही, कशालाही दाद न देणारा.
fragment फ्रॅग्मेण्ट् v.t.--- ०चे तुकडे पाडणे.
fragmentation फ्रॅग्मेण्टेशन् n.--- ( लहान-लहान / अनावश्यक) तुकडे पाडण्याचे काम / प्रक्रिया.
frisson फ्रिसाँ n.--- रोमांच, आनंद, स्फुरण, थरार.
frugal फ्रूगल् a.--- काटकसरी, मितव्ययी, कमी खर्चाचा, साधा, जेवणाच्या किंवा पैशाच्या बाबतीत हात राखून वागणारा, विवेकबुद्धीने बचत करणारा.
fullness फुलनेस् n.--- पुरतेपणा, समृद्धी, भर, पूर्णता.
fulsome फलसम् a.--- ओंगळ, किळस आणणारा.
fume फ्यूम् v.t.--- मनात चडफडणे-फुणफुणणे. n.--- धूर, वाफ, धूम, खकाणा, संताप, मनःक्षोभ.
fumigate फ्यूमिगेट् v.t.--- धुरी-वाफारा देणे.
fun फन् n.--- थट्टा,विनोद, मौज, मस्करी, तमाशा.
function फङ्क्शन् n.--- व्यापार, कार्य, काम, कर्म, (गणित) “फलन”.
functionary फङ्क्शनरी n.--- कामदार, अंमलदार, कर्मचारी.
fund फण्ड् n.--- पुंजी, भांडवल, गाठोडे.
funeral फ्यूनरल् a.--- उत्तरकर्माचा, प्रेतकर्माचा, प्रेतसंस्काराचा.
funnel फनेल् n.--- नरसाळे, धुराडे, चिमणी.
funk फङ्क् v.t.--- गाळण होणे, घाबरणे, घाबरून ०ला टाळणे. n.--- स्तंभित अवस्था, गाळण, घाबरगुंडी.
funny फनि a.--- मौजेचा, विनोदाचा, विनोदी.
fur फर् n.--- लोकर, लव, लोकरीचे कातडे, लोम.
furbish फरबिश् v.t.--- झिलई - उजाळा देणे.
furcation फर्केशन् n.--- डेले, डेलके.
furious फ्यूरियस् a.--- आवेशी, साहसी, बेफाम.
furiously फ्यूरियस्ली ad.--- जोराने, आवेगाने, कावरेबावरेपणाने.
furioपusness फ्यूरियस्नेस् n.--- आवेश, साहस.
furlong फऱ्लाँग् n.--- मैलाचा आठवा भाग. / २२० वार (यार्ड ), ०. २ किलोमीटर.
furlough फर्लो n.--- रजेचा एक प्रकार.
furnace फर्नेस् n.--- भट्टी, चूल, चुलाणे.
furnish फर्निश् v.t.--- देणे, संपन्न करणे, सजविणे.
furniture फर्निचर् n.--- सामान, सरंजाम, साहित्य, घरसोईचे सामान.
furrow फरो n.--- तास, हरळ, फाळ, खांचणी.
further फर्दर् ad.--- येथून पुढे. a.--- पलीकडचा, परता, सुरकुती, आठी.
fury फ्यूरी n.--- त्वेष, संताप, उन्मत्तता, वेड, कोप.
fuse फ्यूज् v.i.---- रस होणे, वितळणे. v.t.--- रस करणे.
fusee फ्यूझी n.--- लहान बंदूक.
fusible फ्यझिबल् a.--- विटाळण्याजोगा, पातळ होणारा.
fusion फ्यूजन् n.--- आटणे, एकीकरण, मिश्रण, गाळणे.
fuss फस् n.---गलबला, धामधूम, हाकाटी, खटाटोप, उपद्व्याप, धांदल, खटपट, स्तोम, बडेजाव (व्यर्थ). v.i.--- “fuss” करणे.
fussy फसी a.---fuss करणारा.
fusty फस्टि n.--- कुजलेला, घाण, वाशेरा.
futile फ्यूटाइल् a.--- निरर्थक, क्षुल्लक, हलकट.
future फ्यूचर् n.--- भविष्य, पुढलाकाळ. a.--- पुढला, पुढे घडणारा, भावी, भविष्य, भावितव्य.
futurity फ्यूचरिटी n.--- भविष्यकाळ, भवितव्य.
fuzzy फझी a.--- पोकळ, भुसभुशीत, फोपसा, ढिला, अस्पष्ट, अंधुक.
fy फाय् int.--- छी, धिक्, छि.
fyke फाइक् n.--- मासे धरण्याची पिशवी.