Not नॉट् ad.--- नाही, नये, नव्हे.
Notable नोटेबल् a.--- संस्मरणीय, थोर, स्पष्ट, प्रख्यात. n.--- प्रख्यात मनुष्य / गोष्ट.
Notary / Notary public नोटरि / नोटरि-पब्लिक् n.--- करारपत्रावर सही करणारा, कायद्यानुसार कागदपत्रे तयार करणे / करविणे, टी संबंधित व्यक्तींनी रीतसर स्वाक्षरी केलेली वा आंगठा उठवून चिन्हित केलेली आहेत हे स्वतःच्या सहीने व मुद्रांकनाने प्रमाणित करणे इत्यादी कामे करणारा सरकार -मान्य/-नियुक्त अधिकारी.
Notation नोटेशन् n.--- संख्या / अंक मांडणे.
Notch नॉच् n.--- खाच, छेद. माप, मोजमाप, उंची दाखविणारी खूण. v.t.--- (up) ‘Notch’ करणे / मारणे / दर्शविणे, मिळविणे, गाठणे.
Note नोट् v.t.--- लक्ष लावणे, मांडणे, टिपणे. n.--- खूण, निशाण, इशारत, चिठ्ठी, टिप्पण, टीप.
Note-verbale
Noted नोटेड् a.--- नावलौकिकाचा, प्रसिद्ध, मशहूर.
Noteworthy नोटवर्दी a.--- लक्षात ठेवण्याजोगा, स्मरणीय.
Nothing नथिंग् n.--- हलकी / क्षुल्लक गोष्ट, अभाव.
Notice नोटिस् n.--- पाहणे, लक्ष देणे, सत्कार करणे, धोरण राखणे, गोष्ट काढणे. v.t.--- नजर, लक्ष्य, बातमी, सूचना, जाहिरात.
Notification नोटिफिकेशन् n.--- जाहिरात, सूचना.
Notify नोटिफाय् v.t.--- जाहीर करणे, बातमी देणे.
Notion नोशन् n.--- कल्पना, तर्क, मत, संभावना.
Notional नोशनल् a.--- काल्पनिक, छांदिष्ट, कल्पित.
Notoriety नोटोरायिटी = Notoriousness
Notorious नोटोरिअस् a.---
Notoriousness नोटोरिअस्नेस् n.--- लौकिक, प्रख्याती, आख्या, परिस्फोट, डंका, बोभाटा, गवगवा, बभ्रा, टीकास्पदता, कुप्रसिद्धि.
Notus नोटस् n.--- दक्षिणवारा, दक्षिणवायु.
Nought नॉट् n.--- and ad.--- काहीच नाही, शून्य.
Noun नाउन् n.--- नाम, संकेत शब्द, संज्ञा.
Nourish नरिश् v.t.--- पाळणे, वाढवणे, शिकविणे, सांत्वन करणे, उत्तेजन देणे, समाधान करणे.
Nourishment नरिश्मेंट् n.--- पालन, प्रतिपाळ, भक्ष्य.
Nouveau riche नूव्हो रीश् n.--- (फ्रेंच भाषेंतील शब्दप्रयोग = New rich) एकाएकी संपन्न / प्रतिष्ठित झालेला, सद्यःसमुदित.
Novation नोव्हेशन् n.--- एकाच्या जागी अन्य बदली म्हणून ठेवणे, बदल.
Novel नॉव्हेल् a.--- नवलाचा, अद्भुत, नवा. n.--- कल्पित गोष्ट, कथा, कादंबरी, दीर्घकथा.
Novelist नॉव्हेलिस्ट् n.--- कादंबरी रचणारा.
Novelty नॉव्हेल्टि n.--- नवेपणा, नवल, कौतुक.
November नोव्हेंबर् n.--- इंग्रजी अकरावा महिना.
November-eve n.--- ‘Halloween’ चा सण.
Novercal नॉव्हेर्कल् a.--- सावत्र आईला शोभणारा.
Novice नॉव्हिस् n.--- नूतनाभ्यासि, नवशिका, नवा.
Novitiate नोव्हिशिएट् n.--- नवशिकेपणा, नवशिका.
Now नाऊ ad.--- आतां, हल्ली. Now and then - केव्हां केव्हां.
Nowadays नाऊ अडेज् ad.--- आजकाल, संप्रातकाली.
Noway नोवे ad.--- कसाही नाही, अर्थाअर्थी नाही, मुळीच नाही.
Nowhere नोव्हेअर् ad.--- कोठेही नाही.
Noxious नॉक्शस् a.--- उपद्रवी, अपकारक, घातक.
Nuance न्यूआॅन्स् / न्यूआन्स् n.--- सूक्ष्म भेद / प्रकार / वेगळेपण, छटा(भेद), रंग(-छटा) / अर्थच्छटा. V.t.--- -च्या (सूक्ष्म) छटा दाखविणे. -ला वेगळी/ळ्या छडा / वेगळा रंग देणे; मध्ये भेद / फरक करणे / वैविध्य आणणे. (With RSS coming out strongly against including caste in census, the Opposition is thinking about nuancing its position slightly.)
Nub नब् n.--- फुगवटा, गोळा. मुख्य / अवघड मुद्दा / प्रश्न / तात्पर्य.
Nubile न्यूबिल् न्यूबाइल् a.--- विवाहयोग्य (स्त्री / कन्या / वय), उपवर.
Nuclear न्यूक्लिअर् a.--- ‘Nucleus’ -चा / -च्या स्वरूपाचा / -पासून/-ने बनलेला. अणुशक्ति -चा / -पासून बन(वि)लेला. (‘हिंदी: नाभिकीय).
Nucleus न्यूक्लिअस् n.--- गर, गीर, खोबरे, बीज, केंद्रक. जीवपेशीचा गाभा, परमाणूचा गर्भ / केंद्रभाग. (हिंदी: ‘नाभिक’).
Nude न्यूड् a.--- उघडा, नग्न. विवस्त्र.
Nudge नज् v.t.--- -ला हलकेच स्पर्शिणे / ढकलणे / डिवचणे, -ला कोपरखळी देणे. n.--- हलका धक्का, कोपरखळी.
Nugatory न्युगेटरि a.--- पोकळ, हलका, व्यर्थ.
Nugget नगे(गि)ट् n.--- (मूल्यवान खनिजाचे) ढेकूळ / गोळा / तुकडा / खंड / पिंड, सुवर्णपिंड. ठेवणीतली मूल्यवान वस्तु / गोष्ट / रत्न.
Nuisance न्यूसन्स् n.--- पीडा, उपाधी, जाच, उपद्रव, कटकट.
Null नल् a.--- निर्जीव, रद्द पडलेले, व्यर्थ, रद्द.
Nullify नलिफाय् v.t.--- रद्द / नाहीसा करणे, मोडणे. a.--- n.---
Numb नम् v.t.--- बेशुद्ध करणे. a.--- गुंग, जड, सुस्त, बधिर, संवेदनाश.
Number नम्बर् v.t.--- मोजणे, आंकडा घालणे. n.--- संख्या, आंकडा. मोजण्यासाठी किंवा विशिष्ट क्रमांतील विशिष्ट स्थिति दर्शविण्यासाठी वापरला जाणारा, क्रमबद्ध नावे वा खुणा (संख्या, अक्षरे, इ.) यामधील एक घटक. (उदा: १,२,३…; अ, आ, इ,...; a,b,c,...) Perfect number --- असा पूर्णाणक की ज्याच्या निःशेष भाजकांची बेरीज त्या पूर्णांकाइतकीच होते. (उदा: ६ (=१+२+३), २८ (=१+२+४+७+१४)). Serial number (संक्षेप : S.No.) क्रमांक, क्रमसंख्या, क्रमाक्षर.
Numberless नम्बर्लेस् a.--- असंख्य, अगणित, असंख्यात.
Numeral न्यूमरल् a.--- संख्येचा. n.--- आंकडा, संख्या.
Numeration न्यूमरेशन् n.--- मोजणी, संख्येची वाचणी.
Numerator न्यूमरेटर् n.--- मोजणारा, अंश, लव.
Numerical न्यूमरिकल् a.--- संख्येचा, संख्यात्मक.
Numero uno
Numerous न्यूमरस् n.--- पुष्कळ, असंख्य, बहुत.
Nun नन् n.--- जोगीण, गोसावीण, विरक्त स्त्री.
Nunchion नंचन् n.--- दुपारचा फराळ.
Nuncupatory नन्क्युपॅटरी n.--- तोंडाचा, तोंडी.
Nuptial नप्शल् a.--- लग्नासंबंधी, विवाहाचा.
Nuptials नप्शल्स् n.--- लग्न, विवाह.
Nurse नर्स् v.t.--- दूध पाजणे. पालन करणे, अंगावर घेणे. n.--- मुले बाळगणारी दाई, रुग्णपरिचारिका.
Nursery नर्सरि n.--- मुलांची खोली, रोपांची जागा.
Nurture नर्चर् n.--- भक्ष्य, शिक्षण, पालनपोषण.