Get-Gli

Get-away गेट् अवे v.t.--- चढून जाणे, जाणे.
Get-back गेट्बॅक् v.t.--- परत येणे.
Get-up गेट् अप् v.t.--- निजून उठणे. n.--- पोषाख, बांधणी.
Geyser गीझर् n.--- ऊन पाण्याचा झरा. पाणी तापविण्याचे यंत्र.
Ghetto गेटो n.--- (शहरांतील) अल्पसंख्य गटाची गलिच्छ / बकाल वस्ती.
Ghost घोस्ट् n.--- भूत, पिशाच, समंध.
Ghoul गूल् n.--- (प्रेतभक्षी) पिशाच / वेताळ / भूत.
Ghoulish गूलिश् a.--- राक्षसी, आसुरी, तामसी, अमानुष.
Giant जायन्ट् n.--- राक्षस, दैत्य, धिप्पाड मनुष्य.
Gibet जिबेट् v.t.--- फाशी देणे. n.--- फाशीचा खांब.
Gibber जिबर् v.i.--- बरळणे. n.--- बरळ, कलकलाट.
Gibberish गिबरिश् n.--- अर्थहीन बडबड, बाराल, अगम्य भाषण.
Gibbous गिबस् a.--- फुगीर, पोक्या, कुबडा.
Gibe जाइब् v.t.--- लागून बोलणे. n.--- उपहास, टोमणा.
Giddy गिडि a.--- घेरी आलेला, अविचारी, चंचल, उथळ, उच्छृंखल, छछोर. चक्कर आलेला, गरगरावयास होणारा.
Gift गिफ्ट् n.--- देणगी, इनाम, देण्याचा हक्क, गुण.
Gifted गिफ्टेड् a.--- बुद्धिमान, प्रसादयुक्त.
Gig गिग् a.--- (लहान/एक घोड्याची) बागी, भोवरा, गुलहौशी मनुष्य. (जहाजावरील) होडी.
Gigantic जाइगॅन्टिक् a.--- अवाढव्य, स्थूल शरीराचा.
Giggle गिगल् v.i.--- खिदखिद हांसणे, हींहीं करणे, फिदीफिदी हसणे, खीखी करून हसणे.
Giggly गिग्ली a.--- फिदीफिदी हसण्याची सवय असलेला.
Gilbertian गिल्बर्टिअन् a.--- ‘गिल्बर्ट’ च्या विनोदी तमाशासारखा, विदूषकी थाटाचा, माकडचेष्टांच्या स्वरूपाचा.
Gild गिल्ड् v.t.--- मुलामा करणे, तेजस्वी करणे.
Gilder गिल्डर् n.--- मुलामा देणारा.
Gill गिल् n.--- माशाचा कल्ला, माशाचे श्वासेन्द्रिय.
Gilt गिल्ट् n.--- सोने. a.--- मुलामा चढवलेला.
Gimlet गिम्लेट् n.--- सामता, गिरमिट, टोपण.
Gin = Genie / Jin(n).
Ginger जिंजर् n.--- सुंठ, आले, एक तिखट चवीचा मसाल्यास व औषधांस उपयोगी कंद (मूळ); या कंदाची वनस्पती / झाड / रोप(टे). Green ginger = या कंदाचा ओला / हिरवा प्रकार, आले. Dry ginger = या कंदाचा कोरडा / शुष्क प्रकार, सुंठ. (संस्कृत: शृंगवेरम् / शृंगवेरकम्) एक रंगविशेष : नारंगी-तपकिरी. v.t.--- (खाद्यपदार्थ, पेय इ.) -ला आले / सुंठ लावणे (सुंठ / आले यांचा स्वाद देणे). एखाद्या-(ला) उत्साहित / प्रेरित / स्फूर्तीयुक्त करणे.
Gipsy / Gypsy जिप्सी n.--- स्वतःस रोमनी म्हणविणारी, युरोपांतील एक भटकी जमात. जिप्सी (रोमनी) भाषा. धूर्त / लबाड (स्त्री).
Giraffe जिराफ् n.--- जिराफ = Camelopard.
Gird गर्ड् v.t.--- गुंडाळणे, गच्च आवळणे. n.--- फटका, कुचेष्टा.
Girder गर्डर् n.--- तुळई, कुचेष्टा करणारा.
Girdle गर्डल् n.--- कमरपट्टा, कटिदोरा, करगोटा, पट्टा.
Girl गर्ल् n.--- मुलगी, कुमारी, कन्या, कन्यका.
Girlhood गर्ल्हुड् n.--- कन्यकावस्था, कौमार्य.
Git
Give गिव्ह् v.t.--- देणे, अर्पणे, मत देणे, कळवणे. Give into: शी जुळवून घेणे, -शी जमवून घेणे, बरोबर जाणे. Give over : संपवणे, समाप्त करणे, थांबणे, संपणे.
Gizzard गिझर्ड् n.--- पक्ष्याचा कोटा, मुख्य जठर.
Glad ग्लॅड् a.--- आनंदी, खुषी, आनंदाचा.
Glacial ग्लेशल् a.--- बर्फाचा, हिममय.
Glacier ग्लेश(र्) / ग्लॅसिअ(र्) n.--- घसरत/पसरत जाणारे हिमक्षेत्र, हिमनदी, हिमसंघात. (हिंदी: हिमनद, हिमखंड)
Gladrags ग्लॅड्रॅग्स् n.--- खास / ठेवणीतील कपडे / पोषाख.
Gladden ग्लॅडन् v.t.--- आनंदविणे, खूष करणे.
Glamour ग्लॅम(र्) n.--- भारून टाकणारा / अद्भुत प्रभाव / मंत्र / आकर्षण, जादूची / बनावट चमक / सौंदर्य.
Glamorize ग्लॅमराइझ् v.t.--- -ला ‘Glamour’ चे रूप देणे.
Glamorous ग्लॅमरस् a.--- ’Glamour’- युक्त.
Glance ग्लॅन्स् v.t.--- काण्या डोळ्याने बघणे, चमकणे.
Gland ग्लॅन्ड् n.--- मांसाची पिशवी, मांसपिंड गोळी, ग्रन्थि.
Glare ग्लेअर् v.t.--- चकाकणे, झळकणे, टवकारणे, डोळे वटारून बघणे. n.--- चकाकी, नेत्रदीपक प्रकाश, क्रोधदृष्टि.
Glaring a.--- नेत्रदीपक, डोळे दिपविणारा, चकित करणे, चकाकणारा; टळटळीत, ढळढळीत; (क्रोधाने / आवेशाने) रोखून पाहणारा.
Glasnost ग्लाझनोस्त n.--- (रशियन शब्द) (कामकाजांतील / निर्णयप्रक्रियेतील) खुलेपणा, उघडपणा, प्रांजळपणा, मोकळेपणा (इ.स. १९८५ मध्ये रशियांत झालेल्या कम्युनिझमविरोधी क्रांतीचे (Gorbachev या नेत्याने पुरस्कारिलेले) एक मूलतत्व. (पहा: Perestroika)
Glass ग्लास् n.--- काच, आरसा.
Glassware ग्लास्वेअर् n.--- काचेचे पदार्थ / सामान.
Glaucoma ग्लॉकोमा n.--- डोळ्याचा प्रकाशसंवेदनशीलपडद्यातील बिघाडाने येणारे अंधत्व, काचबिंदु, नेत्रगोलकामधील वाढलेला दाब / तणाव व तदुत्भव डोकेदुखी या लक्षणांनी युक्त नेत्ररोग.
Glaze ग्लेझ् v.t.--- तावदान बसवणे, सफाई करणे.
Glazier ग्लेझर् n.--- तावदान बसविणारा, काचवाला.
Gleam ग्लीम् v.i.--- चकचकणे, लकलकणे. n.--- चमक, तिरीप.
Glean ग्लीन् v.t.--- दाणे टिपणे, वेचणे, टिपून घेणे.
Gleed ग्लीड् n.--- निखारा.
Gleet ग्लीट् n.--- परमा, स्राव. v.i.--- वाहणे.
Glen ग्लेन् n.--- दरी, खोरे, खोरा.
Glib ग्लिब् a.--- गुळगुळीत, निसरडा, स्वैर, स्वच्छंदी, बाष्कळ (भाषण), उथळ / पोकळ / लबाडीची ऐट असलेला.
Glide ग्लाइड् v.i.--- सरकत जाणे, संथ वाहणे, सरणे.
Glimmer ग्लिमर् v.i.--- मिणमिणणे, टिकटिकणे. n.--- टिकटिक उजेड, मिणमिणीत / मिणमिणता उजेड. अस्पष्ट जाणीव / कल्पना.
Glimpse ग्लिम्प्स् n.--- क्षणचित्र, टिकटिक उजेड, झुळूक, चुणूक, भास. v.t.--- -चे क्षणचित्र प्राप्त करणे / अनुभवणे / पाहणे.
Glint ग्लिन्ट् n.--- चमक. तिरकस दृष्टिक्षेप, कटाक्ष. v.--- चमकणे. कटाक्ष टाकणे, डोकावणे.
Glitch ग्लिच् n.--- अनीप्सित / आकस्मित / भ्रामक विद्युतप्रवाह किंव्हा विद्युतसंदेश. (किरकोळ) तांत्रिक अडचण / समस्या व्यत्यय, प्रत्यूह.
Glitter ग्लिटर् v.i.--- चकचकणे, तकतकणे, चमचमणे.
Glitterati ग्लिटराटी n.--- प्रकाशांतील / प्रसिद्धीतील लोक-/जन- (-समूह).
Glitz गलिट्झ् n.--- झगमगाट, भपका, भडकपणा, दिखाऊपणा. v.--- भडकपणे पोषाख करणे / मिरवणे.
Glitzy गलिट्झी a.--- भडक, दिखाऊ.