Kaleidoscope कलाय्डस्कोप् n.--- परस्परांशी ६०डिग्री अंशांच्या कोनात जोडून एका गोल नळीत बसविलेली तीन लांबट आयताकृति आरशा नळी व तीत ठेवलेले रंगीत काचांचे तुकडे यांनी बनविलेले एक उपकरण ज्याची एक बाजू अर्धपारदर्शक पडद्याने बंद करून दुसऱ्या बाजूकडून पारदर्शक पडद्यातून नळी फिरवत पाहिले असता आरश्यांच्या मध्ये ठेवलेल्या रंगीत तुकड्यांच्या तीन बाजूंच्या आरशातील प्रतिबिंबांमुळे असंख्य सममितिबद्ध, रंगीबेरंगी, चित्रविचित्र व मनोरंजक नाक्ष्या / आकृतिबंध दिसतात. सतत बदलत राहणारे/राहणारा दृश्य / देखावा / रचनाबंध / घटनाक्रम. a.--- चित्राकृतिदर्शक.
Kaleidoscopic कलाय्डस्कॉपिक् a.--- ‘kaleidoscope’ -स्वरूपाचा / -सारखा.
Kaleidoscopically कलाय्डस्कॉपिकलि ad.--- ‘Kaleidoscope - रीतीने / -सारखे.
Kamelopard = Camelopard
Kangaroo कँगरू n.--- ऑस्ट्रेलिया व आसपासच्या प्रदेशातील एक सस्तन चतुष्पाद - मागील लांब बलवान पायांनी उंच उड्या मारीत जाणारा, पिलांसाठी पोटाला पिशवीसारखा अवयव असलेला.
Kaput कपुट् a.--- बिघडलेला, मोडलेला, नादुरुस्त, बाद.
Katydid केटीडिड् n.--- अमेरिकेत आढळणारा एक मोठा हिरवा किडा.
Kaw कॉ v.i.--- कावकाव करणे. n.--- कावकाव, कुरकुर.
Kedger केजर् n.--- लंगर, लहान नांगर (गलबताचा).
Keel कील् n.--- नावाचा कणा, आडे, गलबत, नौकेच्या बांधणीतील पायाभूत तलरचना. On even keel - सपाट / क्षितिजसमांतर पायावर उभा, स्थिर, सुप्रतिष्ठित. Keel over : कलंडणे.
Keen कीन् a.--- उत्सुक, कडक, तेजस्वी, उत्साही, तीक्ष्ण, सुबुद्ध, हुशार, तीक्ष्ण, चपल, पाणीदार.
Keep कीप् v.t.--- राखणे, रखवाली करणे, सांभाळणे, बाळगणे, खोटी करणे, दिमतीस ठेवणे, चालू ठेवणे, पाळणे (आज्ञार्थी). Keep back : छपविणे. Keep in : आवरणे. Keep down : दाबांत ठेवणे. Keep on : चालू ठेवणे.
Keeper कीपर् n.--- संरक्षक, रक्षक, पालक.
Keepsake कीप्सेक् n.--- आठवण, आठवणीसाठी दिलेली वस्तु, प्रेमचिन्ह.
Ken केन् n.--- दृष्टिपथ, विचारविषय.
Kennel केनेल् n.--- कुत्र्याचे घर, बीळ, गटार, नाला.
Keramic = Ceramic
Kerb कर्ब् n.--- उंचवट्यावरील पायवाटेची (बांधीव) कडा.
Kerchief कर्चिफ् n.--- शिराच्छादन, शिरवस्त्र.
Kern कर्न् n.--- जाते, घरटे.
Kernel कर्नल् n.--- दाणा, बी, मगज, गीर, अडळी, गाभा.
Kettle केटल् n.--- हांडा, होडी, कढई.
Kettle drum केटल् ड्रम् n.--- नगारा.
Key की n.--- किल्ली, चावी, कळ, उतारा, खुबी.
Khud कड् n.--- खड्डा, दरी.
Kibbutz किबट्स् (pl. kibbutzim) n.--- इस्त्रायली / यहुदी लोकांची सामूहिक वसति / शेत.
Kick किक् n.---लाथ; चेतना, प्रेरणा, उद्दीपन; उल्लास, उत्साह, आनंद, आल्हाद; झटका. v.t.--- लाथ मारणे, दुगाण्या झाडणे.
Kick off किक् आॅफ् v.t.--- चेंडूशी पहिली लाथ मारून (फुटबॉलचा) खेळ सुरू करणे.
Kick-off किक्-आॅफ् n.--- (फुटबॉलच्या खेळाचा वगैरे) प्रारंभ.
Kickback किक्बॅक् n.--- कमाई करण्यात मदत केल्याचे / मेहेरबानीबद्दलचे बक्षीस.
Kid किड् n.--- करडू, बकरू, मोळी, मूल, बाळ, बच्चा. v.t./v.i.--- (गम्मत म्हणून) (-ला) फसवणे / फजिती करणे / टिंगल उडविणे. v.t.--- विणे.
Kidling किड्लिंग् n.--- लहान करडू.
Kidnap किड्नॅप् v.t.--- (मनुष्य) उचलून/चोरून अथवा फूस लावून नेणे.
Kidney किडनि n.--- मूत्रपिंड.
Kidney-bean किडनीबीन् n.--- उडीद.
Kill किल् v.t.--- ठार मारणे, शांत करणे, वध करणे.
Kiln किल्न् n.--- नाते, गोत्र, गोत्रसंबंध. a.--- सजातीय.
Kin किन् n.--- गोत्र, गोतावळा. a.--- सजातीय, सगोत्र, नात्यातील, सगोत्र नातलग.
Kinaesthesis / Kinaesthesia काय्नेस्थीसिस् / काय्नेस्थीशिया n.--- स्नायुकार्याची संवेदना (शारीरिक हालचालीत होणारी).
Kinaesthetic काय्नेस्थेटिक् a.--- ‘Kinaesthesis’ विषयक.
Kind काइन्ड् a.--- मायाळू. n.--- जात, प्रकार, तऱ्हा.
Kindhearted काइन्ड्हार्टेड् a.--- दयाळू, ममताळू.
Kindle किंडल् v.t.--- चेतविणे, पेटवणे, मनोवृत्ति जागृत/उद्दीप्त करणे. प्रेरित / प्रवृत्त करणे.
Kindly काइंड्लि a.--- ममताळू, कृपाळू.
Kindness काइंड्नेस् n.--- कृपा, अनुग्रह, परोपकार.
Kindred किन्ड्रेड् n.--- नाते, गोतावळा, भाऊबंद. a.--- नात्यांतील, तत्सबंधीचा, तत्सदृश.
Kine काइन् n.--- ‘Cow’ चे जुने अनेकवचन.
King किंग् n.--- राजा, राव, नृपति, भूपाल.
Kingcraft किंग्क्रॅफ्ट् n.--- राजनीति, नृपनीति.
Kingdom किंग्डम् n.--- राज्य, राज्याधिकार.
Kingfisher किंग्फिशर् n.--- पाणकावळा, गण्या.
Kingship किंग्शिप् n.--- King-hood = राज्याधिकार, नृपत्व.
Kink किंक् n.--- दोरीचा पीळ, लहर, खूळ, चक्रमपणा.
Kinky किंकी a.--- लहरी (पणाचा), चक्रम(पणाचा), वेडसर(पणाचा).
Kinship किन्शिप् n.--- नाते, गोत्रसंबंध.
Kinsman किन्स्मन् n.--- भाऊबंद, दाईज, कुटुंबी.
Kirghizstan / Kyrgyzstan युरोपखंडातील रशियाच्या दक्षिणेकडील एक देश.
Kiss किस् v.t.--- मुका घेणे, चुंबणे. n.--- मुका, चुंबन.
Kitchen किचन् n.--- स्वयंपाकघर, पाकशाला, ओवरा.
Kite काइट् n.--- पतंग, वावडी, घार, भामटा.
Kitsch किच् n.--- दिखाऊ / सवंग / हीन अभिरुचीची कला-/साहित्य-/-कृति.
Kitschy किची a.--- सवंग / हीन दर्जाचा / अभिरुचीचा.
Kitten किटन् n.--- मांजरांची पिल्ले.
Kitty किटी n.--- धनराशि, संचित साधनसंपत्ति, उपलब्ध सामग्री, कोठी.
Knack नॅक् n.--- हातोटी, युक्ति, हिकमत, कसब.
Knag नॅग् n.--- गाठ, ग्रंथि, खुंटी.
Knaggy नॅगि a.--- गांठाळ, खट्याळ, द्राष्ट.
Knap नॅप् n.--- टेंगूळ, गुळूम, टेकाड.
Knapsak नॅप्सॅक् n.--- पडशी, थैली, पोतडी (प्रवाशाची).
Knave नेव्ह् n.--- ठक, सोदा, खेळातला गुलाम, ठग.
Knavery नेव्हरि n.--- ठकबाजी, सोदेगिरी, लबाडी.
Knavish नेव्हिश् a.--- फसव्या, ठक.
Knead नीड् v.t.--- मळणे, मर्दणे, कमावणे.
Knee नी n.--- गुडघा. Knee-pan नीपॅन् n.--- गुडघ्याची वाटी.
Knee-deep नीडीप् a.--- गुडघ्या इतका, गुडघाभर.
Kneel नील् v.i.--- गुडघे टेकणे.
Knell नेल् n.--- मृत्युसूचक, नाशसूचक घंटानाद; v.i.--- विनाशाचा (शोकाचा) घंटानाद करणे.