cet-cha

ceturion सेन्टुरिअन् n.--- शंभर पायदळावरचा अधिकारी.
century सेन्चुरी n.--- शतक, शंभर वर्षे, शेकडा.
cephalic सीफॅलिक् n.--- मस्तकशूलहारी औषध.
cerecloth सीअर्क्लॉथ् n.--- मेणकापड.
ceramic सिरॅमिक् a.--- कुंभारकामविषयक, मृत्यात्ररचनाविषयक.
ceramics सिरॅमिक्स् n.--- मृत्पात्ररचनाकला, मृत्पात्रविद्या, मृत्पात्रकारिता.
ceramist सिरॅमिस्ट् n.--- मृत्पात्राविद्, मृत्पात्रकारी.
cereal सीरियल् n.--- धान्य.
cerebral सेरि(र)ब्रल् a.--- ‘Cerebrum’ (मेंदू) -चा /-संबंधीचा. n.--- मूर्धन्य वर्ण.
cerebellum सेरि(र)बेलम् n.--- मुख्य मेंदूच्या मागील भागातील मुख्यतः स्नायूंचे नियंत्रण करणारा व तोल सांभाळणारा लहान मेंदू.
cerebrum सेरि(र)ब्रम् n.--- मुख्य (मोठा) मेंदू.
ceremonial सेरिमोनिअल् a.--- कर्माचा, क्रियेचा.
ceremonious सेरिमोनिअस् a.--- आदरशील, कर्मठ.
ceremony सेरिमनि n.--- संस्कार, सत्कार, रीत, आदर.
certain सर्टन् a.--- अमुक, कोणीएक, खचीत, निःसंशय, कृतनिश्चय, निर्धारयुक्त.
certainly सर्टन्लि ad.--- खात्रीपूर्वक, निःसंशय.
certainty सर्टन्टि n.--- खात्री, निश्चय, खचीतपणा.
certificate सर्टिफिकेट् n.--- दाखला, प्रमाणलेख, प्रमाणपत्र.
certify सर्टिफाय् v.t.--- दाखला लिहून देणे.
certitude सर्टिट्यूड् n.--- निश्चिति, खात्री, निश्चय.
cerulean सिरूलिअन् a.--- अस्मानी, आकाशवर्ण.
ceruse सीरूस् n.--- सफेता, अंगाला लावण्याचा रंग.
cervical सर्व्हिकल् / सर्व्हायकल् a.--- ‘Cervix’ -चा/-संबंधीचा.
cervix सर्व्हिक्स् n.---(plural: Cervices) मान. मानेसारखा अन्य इन्द्रियाचा (विशेषतः गर्भाशयाचा) भाग, गर्भाशयाचे (चिंचोळे) मुख.
cesium सीझिअम् n.--- एक मृदु, धातुरूप मूलद्रव्य. (संक्षिप्त संज्ञा: Cs) (scientists thought they had the ultimate definition of a second : The number of times a cesium atom vibrated back and forth.)
cess सेस् n.--- कर.
cessation सेसेशन् n.--- थांबणे, विराम, तहकुबी, अंत.
cession सेशन् n.--- सोडून देणे, त्याग, दान.
cesspool सेस्पूल् n.--- सांडपाणी, दूपित द्रव साठविण्याचे विवर/कूप.
chafe चेफ् v.t.--- घांसटणे, चोळून-चोळून ऊब आणणे. v.i.--- तडफडणे, फडफडणे. n.--- घर्षणाने आलेली ऊब, आग, धुसफुसणे, सन्तापविणे; घर्षणाने झिजविणे / तासणे/ कासणे, संताप.
chaff चाफ् n.--- भुसा, तूस, भुसकट, भूस, फोल. गप्पाटप्पा, गप्पागोष्टी, हास्यविनोद, परिहास. v.t./v.i.--- गप्पा मारणे ; थट्टामस्करी करणे.
chafing-dish चेफिंगडिश् n.--- शेगडी, भाजण्याचे चुलाणे.
chagrin शग्रिन् v.t.--- रुसवणे, खिन्न करणे. n.--- रुसवा, त्रास, खेद, विषाद.
chain चेन् n.--- सांखळी, बेडी, ओळ, श्रेणी. v.t.--- सांखळी घालणे, बेडी ठोकणे, दास्यत्वांत घालणे, शृंखलाबद्ध करणे.
chainshot चेनेशॉट् n.--- जोडगोळी, जंजीरा गोळी.
chair चेअर् n.--- खुर्ची, अध्यक्ष, मुख्य स्थान. v.t.--- -चा अध्यक्ष असणे/होणे.
chairman चेअर्मन् n.--- अध्यक्ष, सभापति.
chaise शेझ् n.--- बगी, दुचाकी घोड्याची गाडी.
chaise-longue शेज् लॉंग् n.--- (ज्यावर आडवे होता येईल असा) एका हाताचा (कमी उंचीचा) सोफा.
chaldron चाल्ड्रन् n.--- कोळसे तोलाण्याचे माप.
chalice चॅलिस् n.--- पेला, अर्ध्या.
chalk चॉक् n.--- खडू. v.t.--- खडूने रेखाटणे.
challenge चॅलेन्ज् n.--- युद्धामंत्रण, आव्हान. v.t.--- आव्हान देणे.
challenged चॅलेन्ज्ड् a.--- अधू, विकल, उणा.
chamber चेम्बर् n.--- कोठडी, खोली.
chamberlain चेम्बर्लेन् n.--- खासगी कारभारी.
chameleon कमीलिअन् n.--- सरडा, सरड, सरट.
chamfer चँफर् n.--- खोबणी, खांचाणी.
champ चॅम्प् v.t.--- दातओठ खाणे, जबड्याची उघडझाप करणे, जबड्याने चावणे.
champaign शॅम्पेन् n.--- मैदान, पटांगण.
champion चॅम्पिअन् n.--- शूर, शिपाई, वीरगडी, योद्धा.
chance चॅन्स् n.---दैवगति, घडण्याचा संभव. v.t.--- काय होईल ते पाहणे. v.i.--- योगायोगाने घडणे, घडून येणे.
chancellor चॅन्सेलर् n.--- पंडित, पंडितराव, शासनप्रमुख, प्रधान, विद्यापिठाचा प्रमुख (हिंदी: औपचारिक कलाधिपति).
chancery चाान्सरि n.--- सदर, अदालत.
chandelier शॅन्डेलिर् n.--- झुंबर, झाड.
chandler चॅन्ड्लर् n.--- मेणबत्त्या करणारा, विकणारा.
change चेन्ज् n.--- बदल, पालट, खुर्दा. v.t.--- फेरफार करणे, बदलणे, खुर्दा करणे.
changeable चेन्जेबल् a.--- चंचल, लहरी, अस्थिर.
changeful चेन्ज्फुल् a.--- फिरणारा, बदलणारा.
changeling चेंज्लिंग् n.--- देवदूतांनी गुप्तपणे किंवा नकळत अदलाबदली केलेले मूल.
channel चॅनल् n.--- खाडी, कालवा, पात्र, वाट, खांचणी, प्रणाली, फाटा, पाट, सरणी, वाहिनी. v.t.--- कालवा-पाट काढणे.
chant चाण्ट् n.--- (धर्मग्रंथांतील इ.) गेय वाचन धार्मिक गीत. अशा वचनाचे/गीताचे/मंत्राचे गान. v.t.--- गाणे, गान. v.i.--- मेळाने म्हणणे, गाणे, सुरात म्हणणे.
chanticleer चॅन्टिक्लीर् n.--- कोंबडा.
chaos केआॅस् n.--- घोटाळा, भूतावस्था, ब्रह्मघोटाळा.
chaotic केआॅटिक् a.--- घोटाळ्याचा.
chap चॅप् n.--- चीर, जबडा, बच्चाराम, मुलगा, पोर, गडी. v.i.--- भेग पाडणे, भेगाळणे.
chape चेप् n.--- अडकवण (म्यानाचे).
chapel चॅपेल् n.--- ख्रिस्ती धर्मीयांचे पूजास्थान. ख्रिश्चनांचे खाजगी / सामूहिक देवस्थान. अधिकृत चर्चव्यतिरिक्त अन्य लहान चर्च.
chaperon शॅपरॉन् n.--- (तरुण मुलीची) पाठराखीण स्त्री.
chaplain चॅप्लेन् n.--- देवळाचा अधिकारी, धर्मोपदेशक, धर्मकृत्य चालविणारा पुरोहित.
chaplet चॅप्लेट् n.--- स्मरणी, पुष्पमाला, जपमाळ.
chapter चॅप्टर् n.--- अध्याय, खंड, भाग.
char चार् n.--- रोजकाम, मोडकाम. v.t.--- रोज काम करणे, जाळून कोळसा करणे.
character कॅरेक्टर् n.--- निशाणी, चिन्ह, वळण, अक्षर, वर्ण, स्वभाव, वर्तन, गुण, नाते, अब्रू, अब्रूपत्र, सोंग घेणारा, वर्णन. (नाट्य, कथा, इ. मधील) व्यक्ति, पात्र; विशिष्ट भाषेच्या विशिष्ट लिपींतील वर्ण/अक्षर दाखवणारी आकृती/खूण/चिन्ह; सुस्वभाव, सद्वर्तन, सच्चरित्र/सच्चारित्र्य. (शुद्ध/नीतियुक्त/ पवित्र) शील.
characteristic कॅरेक्टरिस्टिक् n.--- विशेष लक्षण. a.--- विशिष्ट, भेददर्शी.
characterize कॅरेक्टराइझ् v.t.--- लक्षण सांगणे, मुद्रित करणे, गुणभेद दाखविणे.
charade शराड् n.--- खुणा/अभिनय इ. वरून शब्द (-संहति) ओळखण्याचा खेळ; सोंग; बुचकळ्यात (अचरटपणाची) टाकणारी वागणूक.
charcoal चार्कोल् n.--- कोळसा.
charcoal-burner चार्कोल् बर्नर् n.--- लोणारी.
chare/Chares चेअर्/ चार् n.--- = Chore/chores
charge चार्ज् n.--- हवाला, सोपविलेले काम, आरोप, खर्च, चाल, हल्ला, ताकाद, बंदुकीचा बार. v.t.--- बंदूक भरणे, सोपवणे, कर बसवणे, आरोप आणणे, नांव मांडणे, चाल करणे, बजावून सांगणे, मोल मागणे.
charge-sheet चार्ज्- शीट् n.--- आरोप-पत्र.
charger चार्जर् n.--- लढाऊ घोडा, थाळा, मोठे तबक.
chariot चॅरिअट् n.--- रथ, स्यंदन.
charioteer चॅरिअटीर् n.--- सारथी, रथ हाकणारा.
charioteering चॅरिअटीरिंग् n.--- सारथ्य.
charisma करिझ्मा n.--- आकर्षण, आदर, निष्ठा खेचून घेणारे प्रभावी/आकर्षक व्यक्तिमत्व, विभूतित्व, अद्भुत आकर्षकता, नखरा, दिमाख.
charismatic कॅरिझ्मॅटिक् a.--- ‘charisma’ युक्त, दिलखेचक, अद्भुत/जादूचे आकर्षण असलेला.
charitable चॅरिटेबल् a.--- दयाळू, उदार, धर्मार्थ, परोपकारी, अनुकूल.
charitably चॅरिटेब्लि ad.--- दयाळूपणाने.
charity चॅरिटि n.--- दानधर्म, औदार्य, दयाधर्म.
charlatan शार्लटन् n.---ढोंगी, लब्धप्रतिष्ठित, (ज्ञान, प्राविण्य, साधुत्व, इ. चा आव आणणारा), भोंदू, खोटा/नकली तज्ज्ञ, लफंगा.
charlatanic(al) शार्लटॅनिक(ल्) a.--- ‘charlatan’ च्या स्वरूपाचा.
charlatanry शार्लट्न्री n.--- ‘charlatan’ चा धंदा/व्यवसाय.
charm चार्म् n.--- मंत्र, ताईत, मोहक पदार्थ, सौंदर्य. v.t.--- मोहणे, भारणे, हांसवणे, रंजन करणे.
charmer चार्मर् n.--- चेटकी, मांत्रिक.
charming चार्मिंग् n.--- मोहिनी, मोह, मोहणे. a.--- मारू, मनोहर, सुंदर, मोहक, छबकडे.
charter चार्टर् n.---व्यावास्थापत्र, करारपत्र, हक्क, अधिकार. v.t.--- रीतसर स्थापित करणे/ठरवणे/आखणे, (वाहन इ.) भाड्याने घेणे.
chary (of) चेअरी (आॅफ्) a.--- (पासून) सावध, लटपटीत, डळमळीत.
chase चेझ् n.--- v.t.---
chasm कॅसम्
chassis शासी n.--- (गाडीचा-) आधारभूत सांगाडा / आधारांग.
chaste चेस्ट् a.---पवित्र, निर्दोष, शुद्ध, पतिव्रता, सती, अनलंकृत.
chastely चेस्ट्ली ad.--- शुद्धतेने, शुद्ध /पवित्र भावनेने.
chasten चेसन् v.t.--- पवित्र/स्वच्छ करणे, शुद्ध/बिनचूक करणे;’chastise’, वठणीवर/वळणावर आणणे, सरळ आणणे, नरम आणणे.
chasteness चेस्ट्नेस् n.--- सतीपणा, पातिव्रत्य.
chastetree चेस्ट्ट्री n.--- निरगुडी, निगडी, निर्गुड.
chastise चॅस्टाइझ्/चॅस्टाइझ् v.t.--- शिस्त राखण्यासाठी शासन करणे, खरडपट्टी करणे, कडक शिक्षा देणे, छळ करणे.
chastisement चॅस्टाइझ्मेंट n.--- (शिस्तभंगाचे) शासन.
chastity चॅस्टिटी n.--- निर्दोषता, पवित्रता, पावित्र्य.
chat चॅट् n.--- गप्पा, गप्पाष्टक. v.i.--- गप्पा मारणे.
chateau शाटो n.--- किल्ला, गढी, बंगला. (pl. chateaux शाटोझ्).
chattel चट्ल् n.--- मालमत्ता, चीजवस्त, घरजिनगी.
chatter चॅटर् v.i.--- वटवट करणे, किलबिल करणे, किंचाळणे, चिवचिव करणे. n.--- वटवट, किलबिल, चिवचिव.
chatteratti चॅटरॅटी n.--- विविध विषयांवर बोलण्यात/चर्चा करण्यात रस घेणारे लोक. चर्चाप्रिय/चर्चाप्रवीण मंडळी.
chauvinism शोविनिझम् n.--- (अतिरेकी गटाचा) अतिरेकी स्वाभिमान.
chauvinist शोविनिस्ट् n.--- अतिरेकी देशभक्ती बाळगणारी व्यक्ती. ‘स्रीजातिला पुरुषजाति पेक्षा किंवा पुरुषजाति ला स्त्रीजाति पेक्षा श्रेष्ठ मानणारी व्यक्ति.