vac-vam

vacancy व्हेकन्सि n.--- रिकामी जागा, पोकळी, फुरसत, जागा, असामी, आळस, सुस्ताई. विशिष्ट संघटनेतील (कार्य-/अधिकार-) पद नेमणुकी-अभावी रिकामे असण्याची स्थिति. असे रिकामे पद. (हिंदी: ‘रिक्ति’)
vacant व्हेकन्ट् a.--- रिकामा, फुरसतीचा, रिता, रिक्त, शून्य.
vacate व्हेकेट् v.t.--- रिकामा / रद्द करणे, खाली करून देणे.
vacation व्हेकेशन् n.--- रिकामपणा, अवकाश, सुट्टी (मोठी), उसंत, विसावा.
vaccinate व्हॅक्सिनेट् v.t.--- देवी काढणे. -ला ‘vaccine’ देणे (हिंदी: टीका लगाना).
vaccination व्हॅक्सिनेशन् n.--- ‘vaccine’ देण्याची प्रक्रिया, लसीकरण (हिंदी: टीकाकरण)
vaccine व्हॅक्सीन् n.--- विशिष्ट रोगाविरुद्धची शरीराची प्रतिकार-शक्ति उत्तेकजीत करण्यासाठी शरीरांत घालण्याचे, त्या रोगाचे मृतावस्थेंतील रोगजंतु / विषाणु असलेले, औषध, लस. (हिंदी: टीका )
vacillate व्हॅसिलट् v.i.--- हेलकावणे, घुटमळणे. अनिश्चित / अस्थिर असणे.
vacuity व्हॅक्युइटि n.--- शून्यता, रितेपणा, पोकळी, मुद्रेत बुद्धिहीनता, उदासीनता.
vacuous व्हॅक्युअस् a.--- रिकामा, रिता, मोकळा, पोकळ.
vacuum व्हॅक्युअम् n.--- पोकळी, अवकाश, पदार्थविहीन स्थान. v.t.--- ‘Vacuum cleaner’ ने स्वच्छ करणे. Vacuum cleaner --- हवेची पोकळी करून कचरा शोषून घेण्याचे यंत्र.
vade mecum वेडी मीकम् (लॅटिन) (= go with me) --- (सुटसुटीत / हाताळण्यास सोयीचा) संदर्भग्रंथ.
vagabond व्हॅगॅबॉण्ड् a.--- उडाणटप्पू, भटक्या, सोदा. v.i.--- भटकणे.
vagary व्हगेअरी / व्हेगरी n.--- हुक्का, वेड, लहर, तरंग, अस्थिरता
vagina व्हजाइना n.--- (सस्तन प्राण्यांतील) स्त्रीयोनीमार्ग. (पहा: Vulva)
vaginal व्हजायनल् a.--- ‘Vagina’ (संबंधी-)चा.
vagrancy व्हेग्रन्सी n.--- भटकेपणा, उनाडपणा, उनाडकी, स्वैरपणा, उंडगेगिरी.
vague व्हेग् a.--- मोघम, निराधार, संदिग्ध.
vain व्हेन् a.--- व्यर्थ, पोकळ, बढाईखोर, गर्विष्ठ, अहंमन्य. In vain --- व्यर्थ.
vainly व्हेन्ली ad.--- व्यर्थ, बढाईने, दिमाखाने. Vain glorious --- दिमाखाचा, घमेंडखोर, अहंमन्य. Vain glory --- दिमाख.
vainness व्हेन्नेस् n.--- व्यर्थपणा, शेखी, डौल, दिमाख.
vale व्हेल् n.--- दरी.
valediction व्हॅलिडिक्शन् n.--- निरोप देण्या-/घेण्या चा कार्यक्रम / विधि. समारोप.
valedictory व्हॅलेडिक्टरी a.--- निरोपाचा, समारोपाचा.
valentine व्हॅलन्टाइन् n.--- भेटवस्तु, भेटपत्र / अभिनंदनपत्र. प्रियकर, प्रेयसी.
valentine Day व्हॅलन्टाइन् डे --- संत (Saint) Valentine दिवस (प्रतिवर्षी १४ फेब्रुअरीला) जेंव्हा प्रेमीजन भेटवस्तु आदी परस्परांस देऊन प्रेम व्यक्त करतात.
valet व्हॅलेट् n.--- हुजऱ्या, खिजमतगार.
valiant व्हॅलिअण्ट् a.--- पराक्रमी, पराक्रमाचा.
valid व्हॅलिड् a.--- बळकट, भक्कम, सबळ, साधार.
validness व्हॅलिड्नेस् n.--- बळकटी, जोर, कायद्याची / बळकटी जोर.
valley व्हॅलि n.--- दरी, खोरे.
valour व्हॅलर् n.--- पराक्रम, शौर्य.
valourous व्हॅलरस् a.--- पराक्रमी.
valuable व्हॅल्युएबल् a.--- मौल्यवान, योग्य, लायक.
value व्हॅल्यु v.t.--- किंमत / मूल्य करणे / मानणे. n.--- किंमत, योग्यता, हिशेब, मोल, मूल्य, आदर, मान. (पहा: ‘Price’)
valve व्हॅल्व्ह् n.--- द्रव, वायु इत्यादि नलिकेद्वारे वाहून नेण्याचा व्यवस्थेंतील प्रवाह चालू वा बंद करण्याचा नियंत्रित मार्ग / नियंत्रण-युक्त / झापडयुक्त मार्ग. नियंत्रण-छिद्र. Safety-valve --- सुरक्षाछिद्र / सुरक्षाझापड. बाष्पछिद्र.
vamp व्हॅम्प् n.--- पुरुषांना भुलवून फसविणारी दुष्ट स्त्री.