diss-dist

dissimilarity डिस्सिमिलॅरिटि n.--- भिन्नता, अंतर.
dissimulate डिसिम्युलेट् v.i.--- लापावाछपवी करणे, सत्यपरिस्थितीवर पांघरूण घालून दिशाभूल करणे, लबाडी करणे.
dissimulation डिस्सिम्युलेशन् n.--- आंत एक बाहेर एक असा, ढोंगाचा व्यवहार, ढोंग, कपट.
dissipate डिसिपेट् v.t. --- ला उधळून/उडवून लावणे, -ला नाहीसे करणे/पुसून टाकणे,-वर बोळा फिरविणे,-ची (विल्हे-)-वाट लावणे/उधळपट्टी करणे. (उदा: Doing so will dissipate responsibility all dogether). v.t. and v.i.--- उथळणे, वितळणे, फांकविणे, बदफैली करणे, घालवणे, उडणे. v.i.--- नाहीसे होणे, विरून/वितळून जाणे.
dissipated डिस्सिपेटेड् a.--- बदफैली, विषयलंपट.
dissipation डिस्सिपेशन् n.--- बदफैलीपणा, दुराचरण.
dissociate डिस्सोशिएट् v.t.--- वेगळा करणे.
dissolute डिसल्यूट् / डिस्सोल्यूट् a.--- नीतिनियमांच्या बाबतीत ढिला, लंपट, व्यसनी, दुराचारी, पापी, पापात्मा. बदफैली, दुर्व्यसनी, अनैतिक.
dissolution डिस्सोल्यूशन् n.--- पृथक्करण, विसर्जन, मोडप वितळविणे, मरण.
dissolve डिझाॅल् v.t. and v.i.--- वितळविणे, द्रव करणे, बरखास्त करणे, रस करणे/होणे, तुटणे, फुटणे.
dissolvent डिझाॅल्व्हन्ट् a. and n.--- द्रावक, स्त्रावक.
dissonance डिस्सोनन्स् n.--- बेसूरपणा, बेबनाव, बिघाड, विसंगति.
dissonant डिस्सोनन्ट् a.--- विसंवाद, बेसुराचा, बेबनावाचा, विसंगत.
dissuade डिस्स्वेड् v.t.--- उपदेश करून मन वळवणे.
dissyllable डिस्सिलॅबल् n.--- दोन अवयवी शब्द.
distaff डिस्स्टाफ् n.--- चरकी, तुर्कटी, कुटुंबांतील स्त्रीवंश/स्त्रीशाखा.
distance डिस्टन्स् n.--- अंतर, पल्ला, लांबी. v.t.--- मागे जाणे, थक्क करून सोडणे.
distant डिस्टन्ट् a.--- लांब, दूर, अस्पष्ट, अंधुक, वांकडा.
distaste डिस्टेस्ट् n.--- अरुची, नावड, तिटकारा. v.i.--- नावडणे.
distemper डिस्टेम्पर् n.--- आजार, रोग, विकृति.
distend डिस्टेण्ड् v.i.--- पसरणे, प्रसारण पावने. फुगणे, विस्तारणे, वासणे. V.t.---ताणणे, फुगवणे, पसरविणे, वासणे.
distension डिस्टेन्शन् n.--- ताठा, ताण, विस्तार.
distitch डिस्टिक् n.--- दोहरा, दोन चरणी कविता.
distil / Distill डिस्टिल् v.t.--- (past tense/past participle : Distilled व Distilling) ऊर्ध्वपातन क्रियेने (शुद्ध रूपांत)वेगळे काढणे. सारांश काढणे. v.i.---
distillation डिस्टिलेशन् n.--- मद्य गाळून काढणे, उर्ध्वपातन(प्रक्रिया)
distiller डिस्टिलर् n.--- मद्य गाळून काढणारा.
distillery डिस्टिलरी n.--- मद्य काढण्याची भट्टी.
distinct डिस्टिंक्ट् n.--- स्पष्ट, साफ, पृथक, वेगळा.
distinction डिस्टिंक्शन् n.--- भेद, विशेष.
distinctness डिस्टिंक्ट्नेस् n.--- निराळेपणा, स्पष्टपणा.
distinguish डिस्टिंग्विश् v.t. and v.i.--- ओळखणे, भेद पाहणे, नांव मिळविणे. v.t.--- -ला गौरवान्वित करणे. गौरविणे.
distinguished डिस्टिंग्विश्ड् p.p.a.--- नामंकित.
distort डिस्टाॅर्ट् v.t.--- मुरडणे, पील देणे, वांकडा करणे, ओढूनताणून भलता अर्थ काढणे.
distortion डिस्टाॅर्शन् n.--- पिळा, मुरड.
distract डिस्ट्रॅक्ट् v.t.--- -ला अन्यत्र आकृष्ट करणे, ला विचलित करणे, घाबरविणे, वेडा करणे.
distracted डिस्ट्रॅक्टेड् p.p.a.--- घाबरा/वेडा झालेला, विक्षिप्त चित्त, विचलित, भ्रमिष्ट.