shun शन् v.t.--- टाळणे, वर्जिणे.
shut शट् v.t.--- बंद करणे, बंद होणे. n.--- बंद होण्याची वेळ, बंद करणे. Shut up --- कोंडणे, “गप बस!”
shutter शटर् n.--- झांकण, ढापण, झडप.
shuttle शट्ल् n.--- विणकामात धागे एकमेकांत गुंतविण्यासाठी दोऱ्यांच्या उभ्या ओळींमधून (warp मधून) आडवी फिरविली जाणाऱ्या दोऱ्याची (weft ची) गुंडाळी. धोटा. = Weaver’s shuttle. दोरे खालीवर नेत परस्परांत व शिवायच्या कापडांत गुंतविण्यासाठी खालीवर होणारा शिवणयंत्राचा भाग. बॅडमिंटन खेळांत दोन बाजूंच्या खेळाडूंमध्ये परस्पराकडे फेकले जाणारे पिसांचे शंकु-आकाराचे फूल (= shuttle-cock). v.t. / v.i.--- वेगाने मागेपुढे चालणे / फेकले जाणे / चालविणे / फेकणे.
shuttle-cock शट्ल्-कॉक् n.--- बॅडमिंटन खेळातील ‘shuttle’. (पहा : ‘Shuttle’)
shy शाय् a.--- लाजाळू, भित्रा, सावध, लाजवट.
sial सायल् n.--- पृथ्वीच्या कवचाचा भूखंडाच्या रूपांतील भाग.
sibilant सिबलण्ट् a.--- फुसकारण्याचा, फिस्कारण्यासारखा; असा वर्ण (जसे श, ष, स).
sibling सिब्लिंग् n.--- (सख्खे वा सावत्र) भावंडे. a.--- अशा भावंडांसारखा.
siblings सिब्लिंग्ज् n.--- भावंडे (सख्खी वा सावत्र).
sic सिक् n.--- = so, thus. मुळातली शब्द जसेच्या तसे उद्धृत केल्यावर, ते जसे मुळात आहेत तसेच उद्धृत केले आहेत हे आवर्जून सांगण्यासाठी, उद्धरणानंतर कंसात लिहिण्याचा शब्द.
sick सिक् a.--- आजारी, दुःखणाईत, वीट आलेला.
sicken सिकन् v.t.--- आजारी करणे, कंटाळा आणणे.
sickle सिकल् n.--- कोयता, विळा, खुरपे.
sickleback सिकल्बॅक् n.--- एक प्रकारचा लहान मासा.
sickly सिक्लि ad.--- आजारी, रोगी.
sickness सिक्नेस् n.--- आजार, मळमळ, ओकारी, दुखणे.
side साइड् v.t.--- कैवार / पक्ष घेणे. n.--- बाजू, पक्ष, अर्धांग. a.--- बाजूचा.
sideline साइडलाइन् n.--- (मैदान इ. ची) (डावी / उजवी) सीमारेखा. अवांतर काम / व्यवसाय.
sidelong साइड्लाँग् a.--- बाजूचा, तिरका.
sidewise साइड्वाइझ्, Sideways साइड्वेझ् ad.--- बाजूने, आडवा.
siege सीज् n.--- फौजेचा वेढा. To lay siege to --- वेढा घालणे.
sieft सीफ्ट् v.t.--- चाळणे, गाळणे, पाखडणे.
siesta सिएस्टा n.--- दुपारची झोप / विश्रांति, वामकुक्षी.
sieve सीव्ह् n.--- चाळण. v.t.--- चाळणे.
sift सिफ्ट् v.t./v.i.--- चाळणे, गाळणे, कसोशीने, तपासणे, बारकाईने तपास करणे, गाळून/चाळून वेगळे होणे.
sigh साय् v.t.--- सुस्कारा टाकणे. n.--- सुस्कारा, निःश्वास.
sight साइट् n.--- दृष्टी, नजर.
sightless साइट्लेस् a.--- आंधळा.
sightly साइट्लि ad.--- दर्शनीय, देखणा.
sigma सिग्मा n.--- ग्रीक भाषेंतील १८ व्या वरणाचे नांव. ग्रीक लिपीत Σ, σ किंवा ς असा लिहिला जाणारा. इंग्लिशमधील ‘S’ शी तुल्य. जुन्या ग्रीक वर्णमालेत मोठ्या सुट्या लिपिमध्ये ‘C’ असा काढला जाणारा.
sigmoid सिग्मॉइड् a.--- ‘C’ या आकाराचा अर्धवर्तुळाकार, अर्धचंद्राकृति. ‘S’ प्रमाणे दोन गोल वळणे असलेला. n.--- मोठ्या आतड्याचा गुदद्वाराशी संपणारा अखेरचा वळशाचा भाग.
sigmoidoscopy सिग्मॉइडोस्कोपी n.--- ‘सिग्मॉइड’ या आताडाच्या भागाचे चिकित्सार्थ चित्रण.
sign साइन् v.t.--- सही करणे, निशाणी करणे. n.--- निशाणी, खूण, लक्षण. संकेत, बावटा, चिन्ह. सूचक / ज्ञापक लक्षण / घटना नाम-/सूचना- फलक.
sign up साइनप् : (एखाद्या कार्यात / संस्थेत) (सही करून / औपचारिकपणे) दाखल होणे, नाव घालणे, दीक्षा घेणे.
signage साइनिज् n.--- लोकांच्या मार्गदर्शनार्थ सार्वजनिक ठिकाणी उभारण्याच्या खुणांचा संग्रह / पद्धति / व्यवस्था. अशा खुणा / चिन्हे उभारण्याचे काम. (‘Road Signage Work in Progress’ - दिल्ली नगर निगमची एक रस्त्यावरील कामाचे ठिकाणी लावलेली पाटी. )
signal सिग्नल् a.--- विलक्षण, लक्षणीय, उल्लेखनीय. n.--- इशारत, खूण.
signalize सिग्नलाइझ् v.t.--- मिळविणे, गाजविणे, नाव / कीर्ति गाजविणे, खुणेने कळवणे.
signature सिग्नेचर् n.--- स्वाक्षरी, हस्ताक्षर, नामाक्षर, सही, दस्तुर, शिक्का, मोर्तब.
signet सिग्नेट् n.--- मोहर, खूण, शिक्का, मुद्रा.
signify सिग्निफाय् v.t.--- सूचना करणे, असे असणे, बिशाद असणे.
significance सिग्निफिकन्स् n.--- अर्थ, अभिप्राय.
significant सिग्निफिकन्ट् a.--- अर्थाचा, दर्शक.
signification सिग्निफिकेशन् n.--- अर्थ, अभिप्राय, आशय.