conk काँक् v.i.--- बंद पडणे, निकामी होणे. n.--- नाकावर मारलेला ठोसा/बुक्की.
conn कॉन् v.t.--- =Con (v.t.-- जहाज चालविणे या अर्थी).
connascence कॉन्नसेन्स् n.--- सहजन्म, सहोत्पत्ति.
connate कॉनेट् n.--- एकाकाली जन्मलेले, सहज, स्वाभाविक.
connect कनेक्ट् v.t.--- जोडणे, संगति राखणे.
connection कनेक्शन् n.---संयोग, संगति, संग, नातलग, संबंधी, अनुसंधान, धोरण. (वीज, वायु, पाणी, इ. च्या पुरवठ्याच्या व्यवस्थेसंबंधी) जोडणी.
connivance कॉनॉय्व्हन्स् n.--- कानाडोळा, डोळेझाक.
connive कॉनाइव्ह् v.i.--- कानाडोळा करणे. (with)---
connoisseur कॉनसर् / कॉनसूर् n.--- परीक्षक, मार्मिक, चोखंदळ, उत्तम अभिरुचि व ज्ञान असलेली व्यक्ती, मर्मज्ञ.
connote कनोट्/कॉनोट्
connubial कॉन्युबिअल् a.--- लग्नासंबंधी, विवाहाचा, वैवाहिक, गृहस्थाश्रमी, वैवाहिक संकल्पाचा.
conquer कॉन्कर् v.t.--- जिंकणे, पराजय करणे.
conqueror कॉन्करर् n.--- विजयी, फत्ते करणारा.
conquest कॉन्क्वेस्ट् n.--- जय, जिंकणे, विजय.
conscience कॉन्शन्स् n.--- बरे वाईट समजण्याची शक्ति, मनोदेवता, सद्सद्विवेकबुद्धि.
conscience-keeper कॉन्शन्स् - कीपर् n.--- सद्विवेक रक्षक, योग्यायोग्याचा उपदेशक/सल्लागार.
conscientious कॉन्सेन्शस् a.--- इमानी, नीतिमान.
conscious कॉन्शस् a.--- सावध, चाणाक्ष, हुशार, जाणीव-/संवेदना-/विचारशक्ति-/इच्छाशक्तियुक्त, ‘संज्ञ’ (सावरकर).
consciously कॉन्शस्लि n.--- देहभानावर असून, जाणून.
consciousness कॉन्शस्नेस् n.--- शुद्धि, सावधगिरी.
consecrate कॉन्सिक्रेट् v.t.--- वाहणे, अभिषेक करणे, पवित्र करणे.
consecration कॉन्सिक्रेशन् n.---संस्कार, (संस्कारपूर्वक) प्रतिष्ठापना, (मूर्तीची प्राणप्रतिष्ठा), मानाचे स्थान देणे, पूजाविषय बनविणे.
consecution कॉन्सिक्यूशन् n.--- अनुक्रम, परंपरा.
consecutive कॉन्सिक्यूटिव्ह् a.--- अनुक्रमाचा.
consensual कॉन्सेन्शुअल् a.--- संमति/एकमत यासंबंधी/यावर आधारित, परस्पर-संमतीचा, संगन्मताचा, मान्य, अविवाद्य, सर्वमान्य/सर्वसंमत होण्यासारखा.
consensus कॉन्सेन्सस् n.--- ऐकमत्य, ऐकवाक्यता, एकमत, सर्वासाम्मति.
consent कन्सेन्ट् v.i.--- रुकार/अनुमत देणे. n.--- रुकार, संमति, अनुमत.
consequence कॉन्सिक्वेन्स् n.--- परिणाम, वजनदारी, मोठेपणा, फळ, निष्पत्ति, गौरव.
consequent कॉन्सिक्वेन्ट् a.--- आनुषंगिक.
consequential कन्सिक्वेन्शल् a.---
consequently कॉन्सिक्वेन्ट्लि ad.--- म्हणून, त्यामुळे.
conserve कॉन्झर्व्ह् v.t.--- राखून ठेवणे, जतन करणे, पाकांत घालणे. n.--- साखरेत घालून ठेवलेले फळ.
consider कन्सिडर् v.t.--- विचार करणे, चिंतणे, लेखणे, मानणे, चित्तास आणणे, पाहणे, गणणे.
considerable कन्सिडरेबल् a.--- योग्य, बराच.
considerate कन्सिडरेट् a.--- विचारी, विचारवंत.
considerately कन्सिडरेट्लि ad.--- विचारपूर्वक, विचाराने.
consideration कन्सिडरेशन् n.--- विचार, मनन, हेतू, मोबदला.
consign कन्साइन् v.t.--- हवालणे, सोपवणे.
consignee कन्साइनी n.--- ज्यास माल पाठविला तो.
consignment कन्साइन्मेंट् n.--- अडत्याकडे पाठविलेला माल.