slo-slu

slobber स्लॉबर् v.i.--- लाळ गाळणे, घाण करणे, गलिच्छपणे वागणे.
slog स्लॉग् v.t./v.i.--- ठोके / तडाखे हाणणे. जोरदार परिश्रम करणे, अडचणीतून मार्ग काढीत जाणे. n.--- जोराचा तडाखा, रट्टा, प्रखर परिश्रम.
slogan स्लोगन् n.--- (सैनिकांची) वीरघोषणा, आरोळी. (कार्याचे) सूत्रबद्ध ध्येयवचन, ध्येयवाक्य.
sloganeer स्लोगनीअर् n.--- ‘Slogan’ रचणारा / प्रसार करणारा.
slop स्लॉप् n.--- भिकार दारू, सांडपाणी. v.t.--- घाण / खराब करणे.
slope स्लोप् v.t.--- उतरता / तिरका करणे. a.--- उतरता, तिरका.
sloping स्लोपिंग् a.--- उतरता.
sloppy स्लॉपी a.--- सांडलेल्या पाण्याने (वगैरे) घाण झालेला; चिकचिकाटाचा, गलिच्छ; गबाळा, बावळट.
slosh स्लॉश् v.t.--- (द्रव, पैसा इ.) ओतणे / उडविणे / उधळणे, खर्चिणे. (Walia sloshes more money into water and sanitation.)
slot स्लॉट् n.--- खाच, खोबण, चीर, भेग, छेद, बीळ, कोनाडा.
sloth स्लॉथ् n.--- सुस्ती, मांद्य, आळस. अस्वलांचा समूह.
slothful स्लॉथ्फुल् a.--- आळशी, सुस्त.
slouch स्लाउच् v.i.--- वाकून अस्ताव्यस्त चालणे, कडमडणे.
slough स्लफ् n.--- (साप इ. ची टाकलेली) कात / (टाकलेला) अन्य अवयव(-खंड). v.t.--- (कात अवयव(-खंड)) टाकणे. v.i.--- (पासून, मधून इ.) निघणे, सुटणे. Slough स्लाउ n.--- खिन्न / विषण्ण मनःस्थिति. दलदल, चिखलाचे डबके.
sloven स्लोव्हन् a.--- गबाळ्या.
slovenia / Slovenija स्लोव्हीनिय propernoun --- युरोपखंडातील उत्तर इटली, दक्षिण-ऑस्ट्रिया व पश्चिम हंगेरीस लागून असलेला एक देश.
slovenly स्लोव्हन्ली ad.--- गैदीपणाने.
slow स्लो a.--- धिमा, जंड, मठ्ठ, सावकाश, थंड, मंद.
slowness स्लोनेस् n.--- मंदपणा, सुस्ती.
slowly स्लोलि a.--- सावकाश, मंदगतीने.
sludge स्लज् n.--- (साचलेला) गाळ, चिखल.
slug स्ल्ग् n.--- अळी. संथ / हळू चालणारे वाहन (जनावर इ.). खंड, तुकडा, गोळी. चपरी, तबकडी, घोट. ठोसा / बुक्की. वर्तमानपत्र इ. मधील लक्षवेधी अक्षरांतील चौकट. v.t.--- ठोसा लगावणे, आघात / टोला / प्रतिप्रहार / प्रतिटोला हाणणे. (‘out’ सह सुद्धा) (वेळ) आळसात घालवणे. -ला उशीर करणे / अडथळा आणणे / मागे राहणे. v.i.--- (‘it’ सह सुद्धा) आळसांत राहणे / रेंगाळणे.
slug-a-bed स्ल्ग्-अ-बेड् a./n.--- आळसाने अंथरुणात लोळत पडणारा.
sluggard स्लगर्ड् a.--- आळशी.
sluggish स्लगिश् ad.--- सुस्त, मंद, जड.
sluggishly स्लगिश्लि ad.--- आळसाने.
sluice स्लूस् n.--- पाण्यांत बांधलेला बांध, सांडवा.
slum स्लम् n.--- गर्दी / खेचाखेच, दारिद्र्य, अस्वच्छता, अव्यवस्था यांनी भरलेली वस्ती. (शहरांतील) बकाल वस्ती. v.i.--- आपल्यापेक्षा निम्न सामाजिक दर्जा असलेल्या लोकांच्या वस्तीत मदतीसाठी किंवा केवळ उत्सुकतेसाठी भेट देणे.
slumber स्लम्बर् v.i.--- झोप / डुलकी घेणे. n.--- डुलकी.
slump स्लम्प् n.--- बहुसंख्यता, विशालता, मोठी संख्या, मोठे परिमाण. पात, पतन, घसरण, अवसाद.v.t.--- गोळा / एकत्र करणे. खाली पाडणे, उतरविणे. v.i.--- गाळून जाणे / पडणे, कोसळणे, गडगडणे. In slump / By slump --- एकूण, मिळून.
slur स्लर् v.t.--- डाग लावणे, छपवणे. n.--- डाग, बट्टा.
slurp स्लर्प् v.i.--- मिटक्या मारणे. लज्जत असणे, ओठांचा आवाज होईल असा घोट घेणे, चोखताना / तोंडाने ओढताना आवाज करणे. v.t./v.i.--- सुरसुर करीत / शोषून / भुरक्यांनी खाणे/पिणे. भुरकणे, भुरकून (हावरेपणाने / घाईघाईने) खाणे/पिणे. n.--- चोषणध्वनि, भुरका.
slurpy स्लर्पी a.--- चूषण-/चोष(ण)-युक्त, चूषणध्वनियुत. (उदा. : The gratitude of the pets is evident : a purr of satisfaction, a slurpy lick on the face.)
slur स्लर् v.--- घाईघाईने / अर्धवटपणे / अस्पष्टपणे / तुटकपणे चालणे. Slur over : (शब्द इ.) गाळणे / अर्धवट उच्चारणे. -ला उपेक्षिणे / पुरे विचारांत ना घेणे.
slurry स्लरी n.--- पातळ द्राव / काला, तरल पंक.
slush स्लश् n.--- गाळ, रेंदा, चिखल; घाण / रद्दी / भिकार लिखाण, भाषण; लाच, भ्रष्टाचार, अनीतीचे धन.
slut स्लट् n.--- जोगम्मा, गबाळी बायको. वेश्या. कुत्री. (तुच्छता-/अपमान- वाचक शब्द) शालीनहीन स्त्री.