Sol-Som

Solace सॉलेस् v.t.--- शमन करणे. n.--- विसांवा, सुख.
Solar सोलर् a.--- सूर्याचा, सूर्याविषयक, सौर.
Solder सोल्ड(र्) / सॉल्ड(र्) n.--- धातूचे पदार्थ / द्रव्य (शिसे, कथील इ.), डाग / डाख देण्याचा धातू / मिश्रधातु, कस्तर. v.t.--- -ला ‘solder’ ने / तत्सदृश पदार्थ इ. ने / जोडणे / सांधणे, झाळणे. पहा : (‘weld’)
Soldier सोल्ज(र्) v.i.--- सैनिकाचा व्यवसाय करणे. चिकाटीने, लढाऊपणे कार्यरत राहणे. n.--- शिपाई, योद्धा. (on) --- चिकाटीने / सैनिकी बाण्याने आपले काम रेटीत राहणे.
Soldierly सोल्जर्ली a.--- सैनिकाचा, शिपायाचा. शिपायास / सैनिकास साजेसा / उचित. शूर, पराक्रमी. ad.-- शौर्यपूर्वक. सैनिकीबण्याने.
Soldiership सोल्जर्शिप् n.--- शिपाईगिरी.
Soldiery सोल्जरि n.--- लष्करी लोक.
Sole सोल् a.--- एकटा, केवळ. n.--- तळपाय.
Solely सोल्ली ad.--- केवळ.
Solecism सॉलीसिझम् n.--- अपप्रयोग, दुरुक्ति. वाक्- / -चापल्य / -स्खलन /-स्खलित.
Solemn सॉलेम् a.--- समारंभाचा, संस्काराचा, विधियुक्त, पवित्र, गंभीर, हृदयंगम.
Solemnity सॉलेम्निटि n.--- समारंभ, आदर, आस्था, गांभीर्य, संस्कार.
Solemnize सॉलेम्नाइझ् v.t.--- समारंभपूर्वक / विधिपूर्वक करणे, गांभीर्य दाखविणे, आदरयुक्त करणे.
Solicit सॉलिसिट् v.t.--- अर्ज / विनवणी करणे, मागणे.
Solicitation सॉलिसिटेशन् n.--- विनवणी, याचना, प्रार्थना, प्रलोभन.
Solicitous सॉलिसिटस् a.--- चिंता जडलेला, आस्थायुक्त, उत्सुक, उत्कंठित.
Solicitude सॉलिसिट्यूड् n.--- उत्कंठा, चिंता, घोर.
Solid सॉलिड् a.--- घट्ट, मजबूत, पोक्त, सावध. भरीव, एकसंध, घन पदार्थ.
Solidify सॉलिडिफाय् v.t.--- घट्ट करणे.
Soliloquize सलिलक्वाइझ् v.i.--- स्वगत भाषण करणे.
Soliloquy सॉलिलोक्वि / सलिलक्वी n.--- आत्मगत भाषण, स्वतःशी बोलणे.
Solitaire सॉलिटेअ(र्) n.--- एक रत्नाचा / खड्याचा दागिना (नाक, कान, वस्त्राची गुंडी इ. वरील).
Solitary सॉलिटरी a.--- आडवळणाचा, एकटा, एकटा राहणारा, एकला, निर्धन, एकांत, भयाण.
Solitude सॉलिट्यूड् n.--- एकटेपणा, एकांत, अरण्य.
Solstice सॉल्स्टिस् n.--- अयन, आरंभ, अयनांत, अयनसंधि. Summer solstice --- २२ जून सुमारची प्रतिवर्षाची वेळ जेंव्हा दक्षिणायन सुरू होते व दिनमान सर्वाधिक (कमाल) असते. Winter solstice --- २२ डिसेंबर सुमारची प्रतिवर्षाची वेळ जेंव्हा उत्तरायण सुरू होते व दिनमान किमान असते.
Soluble सोल्युबल् a.--- द्राव्य, द्रावणीय, विद्राव्य.
Solubility सोल्युबिलिटि n.--- द्राविकारां, निरासनीयता, विद्राव्यता.
Solution सोल्यूशन् n.--- द्रवीकरण, द्रव, उलगडा, स्फोट. (विशे. द्रवांत) कालविण्याची / मिसळण्याची / विरघळविण्याची (प्र)क्रिया. द्रव पदार्थ (अथवा अन्य पादार्थांत) एखाद्या अन्य पदार्थांचे केलेले मिश्रण, घोळ, कोळ.
Solve सॉल्व्ह् v.t.--- सोडवणे, उलगडा करणे.
Solvency सॉल्व्हन्सि n.--- कर्ज देण्याची लायकी, द्रावता.
Solvent सॉल्व्हन्ट् n.--- द्रावक, ऋण देण्यास लायक.
Somatic सोमॅटिक् a.--- शारीरिक / शरीरांतर्गत (विशे. मानसिकाहून भिन्न या अर्थी-) (पहा : Psychosomatic)
Somber सॉम्बर् a.--- काळासांवळा, उदास, भयाण.
Sombre सोम्बर् a.--- काळवंडलेला, अंधारलेला, छायाग्रस्त, विच्छाय, विवर्ण. v.--- काळवंडणे, काळवंडविणे, हताश / खिन्न होणे / करणे.
Some सम् a.--- कांही, कोणी, कित्येक, थोडेसे. Somebody --- कोणीतरी. Somehow --- जेमतेम. Something --- कांहीतरी. Sometime --- केंव्हातरी. Sometime or other --- कधी ना कधी तरी. Sometimes --- केंव्हा केंव्हा. अधून मधून. Somewhat --- कांहीसा. Somewhere --- कोठे तरी. -some --- ‘जण’ अशा अर्थी संख्यावाचकास जोडला जाणारा शब्द. उदा. : Foursome = चारजण.
Somersault समर्सॉल्ट् n.--- कोलांटी, कोलांटी उडी.
Somnambulate सॉम्नॅम्ब्युलेट् v.i.--- झोपेत चालणे.
Somnambulism सॉम्नॅम्ब्युलिझम् n.--- निद्राभ्रमण.
Somnambulist सॉम्नॅम्ब्युलिस्ट् n.--- निद्रासंचारी.
Somniferous सॉम्निफेरस् a.--- झोप आणणारे.
Somnific सॉम्निफिक् a.--- निद्राकारक.
Somniloquism सॉम्निलॉक्विझम् n.--- झोपेत बोलणे.
Somnolence सॉम्नलन्स् n.--- निद्रेची गुंगी / ग्लानि.
Somnolent सॉम्नलण्ट् a.--- झोपेची गुंगी आलेला/आणणारा.