Yao-Yet

Yaourt n.--- see Yoghurt
Yap यॅप् v.i.--- कर्कशतेने किंवा खिन्नतेने भुंकणे,जोराने/मूर्खपणें/तक्रारपूर्वक बोलणे. n.--- तसा आवाज.
Yapock यॅपॉक् n.--- दक्षिण अमेरिकेतील पाण्यात राहणारा व पिलाला पोटाच्या पिशवीत ठेवणारा लहान प्राणी.
Yarborough यार्बरो n.--- व्हिस्ट किंवा ब्रिज या पत्त्यांच्या खेळातील ९ च्या वरचे पान नसलेला हात.
Yard यार्ड् n.--- प्रांगण, विशेष कार्यासाठी वापरला जाणारा भूक्षेत्र, गज, वार, यार्ड, वाडगे, आवार, परूस, तीन फुटाच्या लांबीचे माप, शिडाला आधार देणारा दंडगोलाकार भक्कम दांडा.
by the yard--- खूप लांब पर्यंत; yard of ale--- एका खोल सडपातळ पेल्यातील कडक बिअर; yard of clay --- लांब मातीची नळी; man the yards --- मानवन्दनेसाठी यार्डच्या कडेकडेने लोकांना उभे करणे.
Yardage यार्डेज् n.--- एकूण यार्डांची संख्या, गुरांचे गोठे वापरण्यासाठी दिली जाणारी किंमत.
Yardstick n.--- (कपडे वगैरे) मोजण्याचा गज, तुलनेचे मानक / मानदंड.
Yarmulka यामुकह् n.--- यहुदी लोकं वापरत असलेली घट्ट टोपी.
Yarn यार्न् n.--- सूत, धागा, गोष्ट, गप्पा, किस्सा, प्रवचन, बहुरंगी संभाषण. v.i.--- (बोलीभाषेतील) चऱ्हाट लावणे, गप्पा मारणे.
Yarrow यॅरो n.--- बारमाही / सबंध वर्षभर जगणारी वनस्पति
Yashmak यॅशमॅक् / याश्माक् n.--- काही देशातील मुस्लिम बायका घालत असलेला डोळयांखेरीज इतर सर्व अंग झाकलेला बुरखा.
Yataghan यॅटाघन् n.--- मुस्लिम देशात वापरात असलेली संरक्षण नसलेली दुहेरी वक्र असलेली तलवार.
Yaw यॉ v.i.--- सरळ मार्गापासून वळणे; n.--- तसे वळण.
Yawl यॉल् n. --- चार ते सहा वल्ह्यांची नाव, होडी, डिंगी. v.i.--- केकाटणे.
Yawn यॉन् v.i.--- जाम्भई देणे, तोंड वासणे. n.--- जांभई.
Yawp यॉप् v.i.--- घोगऱ्या आवाजात ओरडणे. n.--- मूर्ख बडबड.
Yaws यॉज् n.--- pl. (usu. Treated as sing.) उष्णकटिबंधातील देशांमधील चामखीळ / टेंगुळ वर्धक सांसर्गिक त्वचा रोग
Yb symb. Yetterbium
Y-chromosome वाय् ख्रोमोजोम् n.--- नर पेशींमध्ये असलेले गणसूत्र.
yd(s) abbr. yard(s).
Ye यि pron.--- तुम्ही; (परावर्ति / प्रतिक्रियात्मक सर्वनाम) तुम्ही स्वतः;
Yea ये adv.--- होय ( let your communication be yea); खरोखर. n.--- yeas and nays, ayes and noes, होकारात्मक व नकारात्मक. Yea and nay धरसोड.
Yeah या adv.--- (बोलीभाषा ) होय. (oh) yeah? अविश्वासदर्शक. “yes” चा अनौपचारिक उच्चार.
Yean यीन् v.t. & i.--- (शेळी / बकरीचे) कोकरू जन्माला घालणे.
Yeanling यीन्लिंग् n.--- कोकरू.
Year यिअर् n.--- संवत्सर, वर्ष. Platonic year - २६००० वर्षांचा काळ. Calander or year १जानेवारीपासून मोजले गेलेले वर्ष. Financial or Fiscal year वित्तीय वर्ष. Academic year शैक्षणिक वर्ष. Young for his years वयाच्या मानाने तरुण. (Getting on) in years वृद्ध. Year-book एखाद्या विषयाचे वार्षिक पुस्तक. Year-long एका वर्षापर्यंत चालणारा. Year-round वर्षभर .
Yearling इयलिंग् n.--- एका वर्षाचे वासरू किंवा शिंगरू. a.--- काहीतरी एक वर्ष जुने. एका वर्षाने संपणारे. (yearling bonds.)
Yearly यिअर्ली a. & adv.--- दर वर्षी, प्रतिवार्षिक, वर्षातून एकदा, वार्षिक.
Yearn यर्न् v.i.--- उत्कंठा असणे, दयार्द्र होणे, दया येणे.
Yearning यर्निंग् n.--- उत्कट इच्छा, उत्सुकता, तळमळ.
Yeast यीस्ट् n.--- दारू, पाव इ. मध्ये आंबविण्यासाठी वापरला जाणारा पिवळसर, फेसाळ, घट्ट व चिकट पदार्थ. वाळलेल्या स्वरूपात केक व पेस्ट्री बेक करण्यासाठी उपयुक्त.
Yeasty यीस्टी a.--- यीस्ट सारखा फेसाळ, आंबवणात यीस्ट सारखा उपयुक्त. पाल्हाळिक, शब्दबंबाळ, वरवरचा, अवास्तविक.
Yegg येग् n.(sl.) --- yeggman प्रवासी घरफोड्या, तिजोरी फोडून आतील ऐवज लुबाडणारा.
Yell येल् v.--- किंकाळी फोडणे, अतिशय जोराने ओरडणे. n.--- ओरडा, किंकाळी.
Yellow येलो a.--- पिवळा Yellow back --- पिवळ्या आच्छादनातील स्वस्त सनसनाटी कादंबरी. Yellow belly--- भित्रा, खालचा भाग पिवळा असलेला प्राणी किंवा मासा. Yellow card --- पिवळा पत्ता, (फुटबॉलच्या खेळाडूस अनुचित आचरण केल्याबद्दल मैदानातून बाहेर पाठविण्याची चेतावणी देण्यासाठी प्रयुक्त). Yellow cedar---अमेरिकेतील सदाहरित शोभेचे झाड. Yellow dog --- कामगार संघटनेचा द्वेष करणारा. Yellow fever --- पीत ज्वर. Yellow hammer --- नर पक्ष्याचे डोके, मान, व छाती पिवळी असलेली एका गाणाऱ्या पक्ष्याची जात (Bunting). Yellow Jack --- पीत ज्वर, झेंडा. Yellow metal --- ६० टक्के तांबे व ४०टक्के जस्त असलेले पितळ. Yellow pages --- देत असलेल्या वस्तू व सेवेप्रमाणे कंपन्यांची सूची असलेली टेलिफोन डिरेक्टरी मधील पिवळी पाने. the yellow peril --- पिवळी जात पांढऱ्यांना दडपून टाकेल किंवा जगाला पादाक्रांत करेल असा धोका. the yellow press--- अनैतिक खळबळ उडविणारे वृत्तपत्र. yellow soap--- सामान्य घरगुती साबण, yellow spot -- डोळ्यातील पडद्यावरील अचूक दृष्टीचा बिंदू, Yellow streak --- भ्याडपणाचे लक्षण, the yellows --- घोडे इ. जनावरांना होणारी कावीळ, n. --- पिवळा रंग, v.--- पिवळा होणे किंवा पाडणे.
Yelp येल्प v.i.--- केकाटणे. n.--- शेखीं, बढाई.
Yen येन् n.--- जापानी नाणे. v.i.--- ( चिनी पोटभाषा) इच्छिणे.
Yeoman योमन् n.--- स्वतःच्या मालकीची शेती असणारा शेतकरी,थोडी शेतीभाती असलेला गृहस्थ, मध्यम स्थितीतील शेतकरी, छोटा जमीनदार, मिरासदार, नाईटची पदवी असणाऱ्याला दिलेले मत, नौदलातील एक मामुली अधिकारी. Yeoman’s service--- गरजेच्या वेळेस मिळालेली उपयोगी मदत, महतवाची सेवा, मोठी कामगिरी.
Yeomanry योमन्री n.--- शेतकरी, स्वेच्छासेवी अश्वारोही सैन्यदल.
Yep येप् var. of YES
Yes येस् adv.--- बरोबर आहे. n.--- होय. Yes-man --- होयबा. (बोलीभाषा) चरित्रहीन, आज्ञाकारी, निरुपयोगी माणूस.
Yester यस्टर् comb. Form.---( पद्यात्मक किंवा पुरातन) शेवटचे गेलेले ( yester-eve, yester-morn, yester-night, yester-year).
Yesterday यस्टर्डे n.--- काल, आदला दिवस. adv.--- काल, आदल्या दिवशी.
Yet येट् adv.--- अजून, अद्यापपर्यंत, तरी, असे असताही, तथापि, पुन्हा, आणखी (yet again, yet another), असे असून सुद्धा (It is strange, and yet it is true.) Nor yet--- सुद्धा नाही. (won’t listen to me, nor yet to her). Conj.--- तथापि, तरीसुध्दा.
Yeti येटी n.--- बर्फ़ाच्छादित हिमालयात राहतो असे मानला जाणारा, अज्ञात मानवसदृश पण मानवापेक्षा मोठा पायाचा ठसा असलेला कुरूप प्राणी, हिमालयाच्या अत्यन्त उंच भागात आढळणारा माणसासारखा दिसणारा केसाळ धिप्पाड प्राणी.