Dimity डिमिटि n.--- दुमेटीचे कापड, दुमेटी.
Dimple डिम्पल् n.--- गालाची/हनुवटीची खळी.
Din डिन् n.--- गलका, गलबला, गोंगाट, कलाकालात. ‘to din into’ = -ला कानठल्या बसेपर्यंत उच्चाराने/ऐकवणे. v.t.--- कानठळ्या बसविणे. n.--- धडाका, तडाका, निनाद.
Dine डाइन् v.i.--- जेवणे, भोजन करणे. v.t.--- जेवण घालणे.
Dinner डिनर् n.--- जेवण, भोजन.
Dinosaur डाइनसॉ(र्) n.--- पाठीचा कणा असणाऱ्या (vertebrate) व पोटावर अथवा पायांनी सरपटणाऱ्या (reptile) जीवजातींपैकी एक महाकाय पक्ष्याच्या आकाराची (पक्षिगटाशी नाते असलेली) नामशेष/लुप्त झालेली
Dint डिंट् v.t.--- ठोके मारणे. n.--- ठोके, खोचा, जोर, बळ.
Diocese डायसिस् / -सीस् / -सीज् n.--- बिशप (Bishop) चे अधिकारक्षेत्र. या अधिकारक्षेत्रांतील चर्चे (ख्रिश्चन देवस्थाने).
Diorama डाय्ओरामा n.--- विशिष्ट प्रकाशयोजनेने दर्शित (छिद्रामधून पाहण्याचा/ची) चित्रपट/चित्रमाला. रंगीत बाहुल्या, पुस्तके, चित्रे, इ. ने केलेली आरास, झांकी.
Dip डिप् v.i.---बुचकळणे, बुचकळी मारणे. खाली जाणे/घसरणे/उतरणे/पडणे, कमी होणे. v.t.--- बुडविणे; खाली आणणे/उतरविणे, कमी/हलका/क्षीण करणे. n.--- बुचकळी, बुडी. कमतरता, उतार.
Diphthong डिफ्थॉन्ग् / डिप्थाँग् n.--- संधिस्वर, द्विस्वर, जोडस्वर. (oe/ae).
Dipsomania डिप्सोमेनिया n.--- विकृत माद्यासक्ती, दारुडेपणा.
Dipsomaniac डिप्सोमेनिअॅक् n.--- विक्रुतावस्थेस पोचलेला मद्यासक्त, दारुड्या/डा.
Diptych डिप्टिक् n.--- दोन पानांच्या पुस्तकासारखी मिटवून ठेवण्याजोगी लेखरूप/चित्ररूप कलाकृति. पुस्तके, कलाकृति, रचना, इ.ची जोडी.
Diploma डिप्लोम n.--- अधिकार, पदवी, सनद, एखाद्या विशेष विद्याशाखेतील गुणवत्ता/प्राविण्य/क्षमता. एखाद्या विषयाच्या पदवी (degree) च्या खालोखालाची गुणवत्ता/तज्ज्ञता, पदविका.
Diplomacy डिप्लोमसि n.--- दक्षता, चतुराई, मुत्सद्देगिरी, कूटनीति, (राजनय, राजनीति) परराष्ट्रव्यवहारशास्त्र.
Diplomat डिप्लोमॅट् n.--- आंतरराष्ट्रीय संबंध हाताळणारा. अशा संबंधातील तज्ज्ञ. कूटनीतिज्ञ, मुत्सद्दी.
Diplomatic डिप्लोमॅटिक् a.--- राजमंत्रीपणाच्या कर्तृत्वाचा, मुत्सद्दीपणा.
Dire डायर a.--- भयंकर, भयानक, दारुण, भीषण.
Direful डायर्फुल् a.--- भयंकर, घोर, उग्र.
Direct डाय्रेक्ट् v.t.--- रोखणे, नेम धरणे, व्यवस्था करणे, वाट दाखविणे, हुकूम करणे. a.---सरळ, निश्कपतॆ. सरळ/थेट/एका(च) दिशने जाणारा. ‘Direct Current (D.C.) n.--- दिष्ट (विद्युत-)धारा (संक्षिप्त रूप: D.C.)(विद्युत-घटापासून तयार होणारी).
Directed डिरेक्टेड् p.p.a.--- सांगितलेला, योजिलेला.
Direction डिरेक्शन् n.--- दिशा, रोख, व्यवस्था, पत्ता, हुकूम, मार्ग.
Directive डिरेक्टिव्ह् a.--- मार्ग दाखविणारा.
Directly डिरेक्ट्लि ad.--- नीट, समोर, सरळ, थेट, प्रत्यक्षपणे.
Director डायरेक्टर् n.---मुख्य अधिकारी, वहिवाटदार, अध्यक्ष, सुकाण्या, सुकाणदार, नायक, संचालक. Managing Director - व्यवस्थापकीय संचालक.
Directory डिरेक्टरि n.--- एखाद्या ठिकाणच्या रहिवाश्यांच्या नावपत्त्याच्या नोंदीचे पुस्तक, निदेशिका (हिंदी).
Direness डायर्नेस् n.--- घोरपणा, उग्रता.
Dirge डर्ज् n.--- शोकाचे गाणे, शोकगीत.
Dirk डर्क् n.--- खंजीर, सुरा. v.t.--- सूर्याने मारणे.
Dirt डर्ट् n.--- मळ, घाण, कचरा, माती, केर.
Dirtiness डर्टिनेस् n.--- मळकटपणा.
Dirty डर्टि v.t.--- मळवणे. a.--- मळकट, मळसर.