Cue-Cur

Cue क्यू n.--- (केसांचा) शेपटा. नाटक इ. मध्ये पात्राच्या कामाची सूचना देणारे पूर्व खूण/संकेत. पात्राचे शब्द. बिलियर्ड /स्नूकर खेळांतील चेंडू ढकलण्याची काठी.
Cuff कफ् n./v.t.---बुक्की, कफ, गुद्दा मारणे, चापटी, थप्पड (मारणे).
Cuirass क्विरास् n.--- चिलखत, शिरस्त्राण.
Cuirassier क्विरॅसिअर् n.--- चिलखतधारी घोडेस्वार.
Cuisine क्विझीन् n.--- स्वयंपाकगृह, पाकशाला, पाकविभाग, पाकपद्धति.
Cuiss क्विस् n.--- तारांचा चोळणा, जंघात्राण.
Cul de sac कू द साक n.--- बंद गल्ली, तीन बाजूंनी बंद असलेले स्थान, जेथून काही प्रगति होत नाही अशी स्थिति.
Culinary क्यूलिनरि a.--- स्वयंपाकसंबंधी, पाकशास्त्राचा.
Cull कल् v.t.---निवडणे, वेचणे, निवडून घेणे. (समूहांतून) (अनावश्यक, दूषित इ. घटकां--) --ला/--स निवडून बाहेर काढून टाकणे. अशा रीतीने संख्यानियमन करणे.
Culprit कल्प्रिट् n.--- गुन्हेगार, अपराधी, दोषी.
Cult कल्ट् n.--- धार्मिक उपासनापद्धति. (विशिष्ट देवतेचा/गुरूचा/नेत्याचा) आचार-/विचार- पंथ.
Cutivate कल्टिवेट् v.t.--- लागवडीस आणणे, नांगरणे, पीक करणे, अभ्यासाने वाढवणे, सुधारणे.
Cultivation कल्टिवेशन् n.--- लागवड, शेती, राबणे, माशाफात, व्यासंग.
Cultivator कल्टिवेटर् n.--- शेतकरी, कुणबी.
Culture कल्चर् n.--- मशागत, मेहनत, सुधारणा, संस्कृति.
Culvert कल्वर्ट् n.--- नाला (विशे. लोहमार्ग, रस्ता यांच्या खालचा)
Cumber कम्बर् v.t.--- ओझे लादणे, खोडा घालणे, घोटाळ्यात पाडणे. n.--- अडथळा, विघ्न, खोडा.
Cumbersome कम्ब(र्)सम् a.--- अवाढव्यतेमुळे/भारीपणामुळे हाताळण्यास अवघड, अवजड, त्रासदायक, कटकटीचा.
Cumbrous कम्ब्रस् a.--- अवघड, त्रासदायक, कठीण.
Cumin(seed) कमिन्(सीड्) n.--- जिरे.
Cumulative क्युम्युलेटिव्ह् a.--- साठत जाणारा, साठून राहण्याचा गुणधर्म असलेला, संचयशील.
Cuneiform क्यूनिफाॅर्म् a.--- पाचरेंच्या आकाराचा, कीलाकार, अशा आकाराच्या अक्षरांनी युक्त (लिपि) (उदा: बाबिलोनिया, पार्शिया येथील प्राचीन कोरीव लेख).
Cunning कनिंग् a.--- शहाणा, कावेबाज. n.--- कावा, कपट.
Cup कप् n.--- पेला, वाटी. v.t.--- तुंबडीने रक्त काढणे, फांसण्या मारणे.
Cupboard कबर्ड् n.--- कपाट, फडताळ.
Cupid क्यूपिड् n.--- कामदेव, अनंग, मदन.
Cupidity क्यूपिडिटि n.--- लोभ, हव्यास, हांव, तृष्णा.
Cupola क्युपोला n.--- कळस, घुमट.
Cupping-glass क्युपिंग्-ग्लास् n.--- तुंबडी.
Cur कर् n.--- कुतरडे, तुसडा, भांडखोर, गावठी कुत्रा, खाष्ट, अविनीत व्यक्ति.
Curable क्युरेबल् a.--- बारा होण्याजोगा, उपायसाध्य.
Curacy क्यूरसी n.--- ‘curate’ चे पद/कार्यक्षेत्र/अधिकारक्षेत्र.
Curate क्यूरेट् n.--- (कनिष्ठ प्रतीचा) भटजी, कनिष्ठ धर्मगुरु. v.t.--- आयोजित करणे, मांडणे, देखरेख करून चालविणे, -ची व्यवस्था पाहणे.
Curator क्युरेटर् n.--- देखरेख करणारा, राखणदार, चालक, व्यवस्थापक.
Curb कर्ब् n.--- लगाभाची कडी, दाब. v.t.--- दाबणे.
Curd, कर्ड् curds कर्ड्स् n.--- दही, दधि. आंबटाने दूध फोडून वेगळा केलेला दुधाचा घट्ट भाग/चोथा, छेना/पनीर(हिंदी).
Curd, कर्ड् Curdle कर्डल् v.t.--- विरजणे, घट्ट करणे.