Wap-Wat

wap = whop
war वॉर् n.--- युद्ध, रण, लढाई, संघर्ष. युद्धाचे शास्त्र, युद्धाची कला. v.i.--- युद्ध करणे, लढणे. a.--- लढाई संबंधी, युद्धासंबंधी. (eg. war preparations = युद्धाची तयारी). present participle - warring
warring वॉरिंग् a.--- एकमेकांशी संघर्षांत असलेले.
war-horse वॉर्-हॉर्स् v.t.--- अवलोकनाखाली (रुग्णालयांत) ठेवणे / भरती करणे.
warble वॉर्बल् v.i.--- गाणे, लकेरी मारणे, मधुर व कंपित स्वरात (पक्ष्याप्रमाणे) गाणे, गोड मंजुळ स्वरात गाणे. n.--- गाणे, गोड मधुर आवाजातील गाणे (विशेषतः पक्ष्याचे). मंजुळ गाणे.
warbler वॉर्ब्लर् n.--- एक प्रकारचा गाणारा पक्षी. मंजुळ स्वरात गुणगुणणारी व्यक्ती, पक्ष्याप्रमाणे गोड मंजुळ आवाज काढणारी वस्तू.
ward वॉर्ड् n.--- पहारा, दिमतीतला मनुष्य,न्यायालयाच्या किंवा पालकाच्या देखरेखीखाली ठेवलेली / राहात असलेली (विशेषतः अल्पवयीन) व्यक्ती, देखरेखीत असलेली अल्पवयीन व्यक्ति, पाल्य. तुरुंग किंवा रुग्णालयातील विभाग किंवा दालन, वाडा, मोहोला. मतदारसंघ, स्थानिक स्वराज्याचा एक विभाग. Ward off v.t.--- धोका, हल्ला, हानी इ. टाळण्यासाठी/रोखण्यासाठी दुसरीकडे वळविणे, हल्लेखोरापासून संरक्षण करणे / वाचविणे, राखणे, टाळणे.
warden वॉर्डन् n.--- रखवालदार. एखाद्या जागेची व्यवस्था पाहणारी व तेथील नियम, शिस्त राखणारी व्यक्ती. पेअरच्या जातीचे एक फळ.
wardenry वॉर्डन्री n.--- व्यवस्थापकाचे कार्यालय/अधिकारक्षेत्र/जिल्हा.
warder वॉर्डर् n.--- द्वारपाल, रक्षक, तुरुंगाधिकारी.
wardian case वॉर्डियन केस n.--- जमिनीवर राहणारे लहान प्राणी ठेवण्यासाठी किंवा वनस्पतींची निपज करण्यासाठी बगीचा असलेली काचेची पेटी. See vivarium, terrarium, aquarium.
wardress वॉर्ड्रेस द्वारपालाचे/तुरुंगाधिकाऱ्याचे काम करणारी स्त्री.
wardrobe वॉर्ड्रोब् n.---कपडे ठेवण्याचे कपाट. (एका माणसाचा) कपड्यांचा संच / कपडालत्ता. झगा, पांघरूण.
ware वेअर् n.--- विक्रीचा माल. Ware house --- वखार, कोठार, कोठी. कोठारांत ठेवणे. Hard Ware --- लोखंडी सामान. Wares --- माल.
warlike वॉर्लाइक् a.--- रणशूर, लढाऊ, लढाईचा.
warlock वॉर्लॉक् n.--- चेटक्या, जादूगार.
warm वॉर्म् v.t.--- ऊन करणे, उत्साह आणणे, आवेश येणे. a.--- उष्ण, गरम, उत्साहाचा, तप्त, कडक, जहाल, तापट.
warn वॉर्न् v.t.--- सूचना करणे, बजावणे, सावध करणे.
warning वॉर्निंग् n.--- सूचना, ताकीद, समज, सांगी, वर्दी.
warp वॉर्प् n.--- उभे सूत, ताणा. v.i.--- तिडणे. वक्र होणे, वठणे, वाकडेतिकडे होणे / करणे. a.--- वाकडेपणा, वक्रता, सदोषता, बिघाड.
warrant वॉरण्ट् v.t.--- अधिकार देणे, निर्भय करणे, आश्रय देणे, खातरी करणे. n.--- आधार, प्रमाण, हुकूमनामा, वॉरंट.
warrantable वॉरण्टेबल् a.--- योग्य, वाजवी, कायदेशीर.
warren वॉरेन् n.--- संमेलनस्थान, आलय, विहारस्थान.
warrior वॉरिअर् n.--- योद्धा, वीर, शिपाई.
wart वॉर्ट् n.--- कातड्यावरचा फोड, चामखीळ.
wary वेरि a.--- सावध, हुशार, दक्ष.
wash वॉश् v.i.--- कसास उतरणे, परीक्षेत टिकणे, पटणे / पटण्यायोग्य असणे, (कपडा इ.) धुण्यांत टिकून राहणे, धुण्याने खराब न होणे. v.t.--- धुणे, साफ करणे, स्नान करणे, विसळणे.
washable वॉशेबल् a.--- धुण्यासारखा.
wash one’s hands of: -शी संबंध तोडून टाकणे, -पासून मुक्त होणे; -बद्दलची जबाबदारी नाकारणे.
washerman वॉशर्मॅन् n.--- परीट.
washer-woman वॉशर्-वुमन् n.--- परटीण.
washy वॉशि a.--- पाणथळ, दमट, फिकट.
wasp वॉस्प् n.--- गांधील माशी. (पहा: ‘hornet’).
waste वेस्ट् v.t.--- व्यर्थ खर्च करणे, नासाने, उधळणे, हैराण करणे, क्षीण करणे. a.--- उजाड, टाकाऊ, बेचिराख, पडित. n.--- व्यर्थ खर्च, उधळपट्टी, झीज, क्षय, नास. waste book --- कच्चा खर्डा.
wasteful वेस्ट्फुल् a.--- उधळ्या.
wasting वेस्टिंग् n.--- झिजविणारा.
wastrel वेस्ट्रल् n.--- उनाड, उडाणटप्पू, कुचकामी, ऐतखाऊ. उधळ्या, अनाथ, निराधार.
watch वॉच् v.t.--- नजर ठेवणे, राखण करणे, पहारा देणे. n.--- पहारा, चौकीदार, खिशांतले घड्याळ, जागल्या.
watchful वॉच्फुल् a.--- सावध, जागा.
watchhouse वॉच्हाउस् n.--- चौकी.
watchman वॉच्मॅन् n.--- चौकीवाला, पाहारेकरी, चौकीदार.
watchword वॉच्वर्ड् n.--- खुणेचा / परवलीचा शब्द.
water वॉटर् v.t.--- पाण्यावर नेणे, पाणी पाजणे. n.--- पाणी, तेज. water course --- जलप्रवाह. waterfall --- धबधबा. watergate --- सांड, कालवा. waterman --- होडीवाला. watermelon --- कलिंगड. watermill --- पाणचक्की. waterproof --- आंत पाणी ना शिरू देणारी. water-snake --- पाणसांप. watertight --- जलाभेद्य water-wheel --- रहाटगाडगे. ‘To make water’ --- मुतणे. water-closet --- शौचविधीचे भांडे. शौचगृह, शौचालय.
waterlog वॉटर्लॉग् v.i. / v.t.--- पाण्याने व्याप्त होऊन बिघडणे / बुडणे.
watery वॉटरि a.--- पाण्याचा, जलरूप, पाणचट.
watt वॉट् n.--- वीज मोजण्याचे माप: एकवॉट् वीज म्हणजे एका सेकंदात १ जूल (joule) ऊर्जा देणारी वीज. (पहा: ‘Joule’). एक वॉट् वीज म्हणजे एक व्हॉल्ट विद्युत दाब व एक अँपियर विद्युतप्रवाहजोर यांनी कार्यशील होणारी वीज.
wattle वॉटल् n.--- ताटी, कूट. v.t.--- विणणे, वळणे.