Evangelist इव्हॅन्जेलिस्ट् n.--- धर्म सांगणारा / शिकविणारा
Evangelization इव्हँजलायझेशन् n.--- ख्रिश्चन धर्माची दीक्षा (देण्याची प्रक्रिया/विधि).
Evangelize इव्हँजलाइझ् v.t.--- -ला ख्रिश्चन-ध्रामाची / (नवीन) धर्माची दीक्षा देणे.
Evaporate इव्हॅपोरेट् v.t. and v.i.--- वाफ होणे, उडणे, उडून जाणे, वाफ करणे, वाफ करून उडवणे.
Evaporation इव्हॅपोरेशन् n.--- बाष्पीकरण भुवन.
Evasion ईव्हॅशन् n.--- चुकवाचुकव, उडवणी, सवड.
Evasive इव्हेसिव्ह् a.--- चुकवणारा, टाळणारा.
Eve ईव्ह् n.--- (कोणत्याही विशेष दिवसाच्या / प्रसंगाच्या) आधीची / आदल्या दिवसाची संध्याकाळ / थोड्या आधीचा समय, पूर्वसंध्या (हिंदीतून), नाताळच्या पूर्वीची संध्याकाळ. (काव्यात : evening). (proper noun: (ख्रिश्चन पुराणानुसार) ईश्वराने निर्मिलेली पहिली मानव स्त्री. पहा: Adam).
Even ईव्हन् ad.--- देखील, ही, सुद्धां, जरी. a.--- सपाट, साफ, समान, शांत, रास्त, बरोबर. v.t.--- सारखा/सपाट करणे. To be/get even with --- -शी हिशेब चुकता करणे, सूड उगविणे.
Evening ईव्हिनिंग् n.--- संध्याकाळ. a.--- सांजचा.
Evening song ईव्हिनिंग् साँग् n.--- संध्यास्तोत्र.
Evenness ईव्हन्नेस् n.--- सपाटी, सारखेपण, साम्य.
Event ईव्हेन्ट् n.--- घडलेली गोष्ट, परिणाम, फळ, बाब, घटना.
Eventful ईव्हेन्टफुल् a.--- उलटापालीचा, घडामोडीचा.
Eventual इव्हेन्चुअल् a.--- अनुषंगिक, परिणामाचा, नंतरचा, आगामी, पुढे केंव्हातरी येणारा/होणारा, भावी. अखेरचा, शेवटचा, अंतिम.
Eventuality इव्हेन्चुअॅलिटी n.--- प्रसंग, वेळ, वेळप्रसंग, योग. घटनांचा कार्यकारणसंबंध / क्रम जाणण्याची बौद्धिकशक्ति.
Eventually इव्हेन्चुअली ad.--- परिणामी, शेवटी, अंततः, अखेर, नंतर, पुढे.
Ever एव्हर् ad.--- कधीतरी, केंव्हातरी, सर्वकाळ.
Ever so एव्हर् सो --- हवा इतका, वाटेल तितका.
Evergreen एव्हर्ग्रीन् a.--- सर्वकाळ हिरवा, ताजा.
Everlasting एव्हर्लास्टिंग् a.--- सर्वकाळ टिकणारा.
Evermore एव्हर्मोअर् ad.--- निरंतर, सतत.
Every एव्हरी a.--- हरप्रत्येक, एकेक.
Everyday एव्हरीडे ad.--- प्रतिदिवशी, दररोज.
Evidence एव्हिडन्स् v.t.--- पुरावा दाखविणे, खात्री करणे. n.--- पुरावा, मुद्दा, साक्ष, प्रमाण (हिंदी: साक्ष्य).
Evident एव्हिडेन्ट् a.--- स्पष्ट, उघड, जाहीर.
Evidently एव्हिडेन्ट्लि ad.--- उघड, साफ, निवळ.
Evil ईव्हल् a.--- वाईट, दुःखकर, अमंगळ. n.--- वाईटपणा, पाप, अरिष्ट, अपाय, संकट, कुकर्म.
Evileyed ईव्हल्आईड् a.--- दुष्ट, हेवेखोर.
Evilspeaking ईव्हल्स्पीकिंग् n.--- चहाडी, उणे भाषण.
Evilstarred ईव्हल्स्टार्ड् a.--- हतभागी, दुर्दैवी.
Evince ईव्हिन्स् v.t.--- शाबित करणे, स्पष्ट दाखविणे.
Eviscerate ईव्हिसरेट् v.t.--- -ची आतडी बाहेर काढणे, -ला निष्प्राण/निष्प्रभ करणे.
Evocation इव्होकेशन् n.--- प्रकटीकरण, संचारन, प्रकटन, आवाहन.
Evocative इव्होकेटिव्ह् a.--- आवाहन करणारा, स्मरण करवून देणारा, प्रेरक.
Evoke इव्होक् v.t.--- बोलावणे, आवाहन करणे, समर्थनार्थ उद्धृत करणे, प्रकट करणे, (invoke).
Evolution इव्होल्यूशन् n.--- मूळकर्म, उत्क्रांति.
Ewe यू n.--- मेंढी, मषी.