Other अदर् a. and pron.--- दुसरा, अन्य, परका, दुजा. ad.--- एरवी, अन्यथा.
Otherwise अदर्वाइझ् ad.--- अन्यथा, दुसऱ्या प्रकाराने.
Ought आॅट् v. (imper.)--- पाहिजे. n.--- कांहीही, कितीही.
Ounce ओंस् n.--- एक इंग्रजी वजन, औंस, अर्धटांक.
Our अवर्, Ours अवर्स् pron.--- आमचा.
Ourself अवर्सेल्फ् pron.--- आम्ही स्वतां.
Oust आॅउस्ट् v.t.--- काढणे, तळी उचलणे, दूर सारणे, स्थानभ्रष्ट करणे.
Out आउट् ad.--- बाहेर, शिवाय, मोठ्याने, निराळा. v.i.--- सर्वत्र माहीत होणे, उजेडांत येणे, कळणे.
Outbid आउट्बिड् v.t.--- चढ करणे.
Outbreak आउट्ब्रेक् v.i.--- जोराने फुटणे, बाहेर पडणे. n.--- स्फोट, उकळी.
Outcast आउट्कास्ट् a.--- अपंक्त, बहिष्कृत, जातिभ्रष्ट.
Outcry आउट्क्राय् n.--- ओरड, रड, आक्रोश.
Outdo आउट्डू v.t.--- चढ करणे, मागे टाकणे.
Outdoor आउट्डोअर् a.--- घरा-/दारा- बाहेरचा.
Outer आउटर् a.--- बाहेरील, बाहेरचा.
Outerhouse आउटर्हाउस् n.---
Outfit आउट्फिट् n.--- विशेष कार्यासाठी लागणाऱ्या हत्यारांचा संच. कार्यदल, संघ, टोळी, पथक. एकाच वेळी घालण्याचा कपड्यांचा संच, पोषाख.
Outing आउटिंग् n.--- बाहेर जाणे, फेरी, चक्कर, सहल. प्रकटन, प्रकाशन.
Outknave आउट्नेव्ह् v.t.--- ठकास ठक भेटणे.
Outlandish आउट्लॅन्डिश् a.--- दूरदेशचा, रांगडा.
Outlast आउट्लास्ट् v.t.--- इतरांहून अधिक टिकणे / तंगणे.
Outlaw आउट्लॉ v.t.--- राजाचे संरक्षण बहिष्कृत करणे, मना करणे. n.--- राज्यरक्षणबाह्य मनुष्य, न्यायरक्षणबाह्य मनुष्य.
Outlay आउट्ले n.--- खर्च, व्यय. v.t.--- मांडणे, ठेवणे.
Outlet आउट्लेट् n.--- दार, मार्ग, वाट, निकाल. v.t.--- बाहेर सोडणे.
Outlier आउट्लायर् a.--- बाहेरचा, उपरा.
Outline आउट्लाइन् n.--- मर्यादेची रेषा, आराखडा. v.t.--- रूपरेखा काढणे.
Outlive आउट्लिव्ह् v.t.--- पाठीमागे वाचणे / जगणे.
Outlook आउट्लुक् n.--- टेहळी करणे, पाहरा, टेहळ्या.
Outnumber आउट्नम्बर् v.t.--- संख्येत मागे टाकणे.
Outrage आउट्रेज् n.--- जुलूम, अनर्थ, बलात्कार, अत्याचार, हिंसा. यामुळे उद्भवणारा तीव्र क्षोभ, मानसिक त्रास, वैताग. दुष्ट / अनैतिक कृत्य / वर्तन. v.t.--- -वॉर अत्याचार, बलात्कार आदि करणे, -ला अत्यंत अपमानास्पद वागविणे, अपमानित करणे. सभ्यतेचा / नीतीचा / सदाचाराचा तीव्र / उद्दाम भंग करणे.
Outrageous आउट्रेजस् a.--- अनर्थाचा, जुलमी. आत्यंतिक अत्याचार- / अनाचार- स्वरूपी. आणि (यास्तव) संतापजनक / धक्कादायक.
Outre उतरे ad.--- a.--- अभूतपूर्व, आगळा, विचित्र, चमत्कारिक, भंपक. n.---
Outrider आउट्रायडर् n.--- जिलबीचा स्वार.
Outright आउट्राइट् ad.--- लागलीच, तेंव्हाच, एकदम. a.--- निखालस, पक्का, चक्क, स्पष्ट, सडेतोड. ad.--- पूर्णपणे, पूर्णतया, स्पष्ट-/सडेतोड- पणे.
Outroot आउट्रूट् v.t.--- मुळासुद्धा उपटणे. a.---
Outrun आउट्रन् v.t.--- पळण्यात मागे टाकणे.
Outset आउट्सेट् n.--- उपक्रम, आरंभ.
Outside आउट्साइड् a.--- बाहेरचा. n.--- बाहेरचे अंग.
Outskirt आउट्स्कर्ट् n.--- शिंव, सीमा.
Outsource आउट्सोर्स् v.t.--- एखादे आपले काम / त्याचा अंश / त्यातील विशिष्ट प्रक्रिया अन्य (परदेशस्थ) व्यक्ति / संस्था यांचे कडून कंत्राटाने करून घेणे / करण्यास देणे (विशे. काटकसरीसाठी).
Outspoken आउट्स्पोकन् a.--- स्पष्टवक्ता, निष्कपटी.
Outstrip आउट्स्ट्रिप् v.t.--- मागे टाकणे,पुढे जाणे.
Outvote आउट्व्होट् v.t.--- मतबाहुल्याने मोड करणे.
Outward आउट्वर्ड् a.--- बाह्य, बाहेरील, वरकरणी.
Outway आउट्वे n.--- बाहेर पडण्याचा रस्ता.
Outwit आउट्विट् v.t.--- उलटा फसविणे, तोंडाला पाने पुसणे.
Outwork आउट्वर्क् n.--- बाहेरकोट. v.t.--- हार न जाणे.