Ewe-Exc

Ewe-lease यू-लीज् n.--- मेंढ्यांना चरण्यासाठी/राहण्यासाठी भाड्याने दिलेली भूमि/भूखंड.
Ewer यूअर् n.--- हाततोंड धुवायचे भांडे, तस्त.
Ex facie ad.--- वर-वर पाहता, प्रथम-दर्शनी.
Ex-official एक्स्आॅफिशल् a.--- अधिकारनियुक्त.
Ex-officio एक्स्आॅफिशिओ ad.--- अधिकारपरत्वे, पदसिद्ध.
Ex post facto a./ ad.--- (Latin = In the light of sunsequent event) = With retrospective action / force. (नंतरच्या घटितांमुळे) पूर्वकालापासून प्रभावी. (नंतरच्या घटितांमुळे) पूर्वकालप्रभावाने.
Exact एक्झॅक्ट् a.--- बरोबर, खरा, व्यवस्थित, सुती, रेखलेला, वक्तशीर, साफ. v.t.--- जुलमाने घेणे.
Exacting एक्झॅक्टिंग् a.--- जुलमी, करडा, कडक.
Exaction एक्झॅक्शन् n.--- जुलमाने घेतलेला पैसा.
Exactly एक्झॅक्ट्लि ad.--- बरोबर, नेमका.
Exactitude एक्झॅक्टिट्यूड् n.--- अचूकता, नेमकेपणा, रेखालेपणा, टापटीप.
Exaggerate एक्झॅजरेट् v.t.--- फुगवून सांगणे, रजाचा गज करणे, तिखटमीठ लावून सांगणे. -च्या बाबतीत अतिशयोक्ति करणे.
Exaggeration एक्झॅजरेशन् n.--- अतिशयोक्ति.
Exalt एग्झॉल्ट् v.t.--- उभारणे, मोठेपणास चढवणे, स्तुति करणे, उंच करणे, वाढवणे.
Examination एग्झॅमिनेशन् n.--- परीक्षा, पारख.
Examine एग्झॅमिन् v.t.--- परीक्षा करणे/घेणे, तपासणे, प्रश्न घालणे/करणे.
Examinee एग्झॅमिनी n.--- परीक्ष्य, परीक्षेला बसणारा.
Examiner एग्झॅमिनर् n.--- परीक्षा घेणारा.
Example एग्झॅम्पल् n.--- उदाहरण, कित्ता, नमुना, दाखला, ताकीद, सांगी. For example - उदाहरणार्थ.
Exasperate एग्झॅस्परेट् v.t.--- खिजवणे, चेतवणे, चिडविणे, त्रास देणे.
Excavate एक्स्कॅव्हेट् v.t.--- कोरणे, पोखरणे, खोदणे.
Exceed एक्सीड् v.t. and v.i.--- अधिक होणे, मर्यादेबाहेर जाणे, मागे टाकणे, जिंकणे.
Exceeding एक्सीडिंग् a.--- मर्यादेबाहेर /आदिक होणारा, पुष्कळ, अतिशय, जास्त, अतिरिक्त.
Exceedingly एक्सीडिंग्लि ad.--- अतिशय, अधिक.
Excel एक्सेल् v.t.--- जिंकणे, मागे टाकणे, वरचढ करणे.
Excellence एक्सेलेन्स् n.--- उत्कृष्टपणा, उत्तमपणा.
Excellent एक्सेलेन्ट् a.--- उत्कृष्ट, उत्तम, फार चांगला.
Excelsior एक्सेल्सिआॅर् a.--- अधिक चांगले, उच्चतर.
Except एक्सेप्ट् prep.--- शिवाय, वाचून. v.t.--- वगळणे, सोडणे, गाळणे, खेरीज करणे. v.i.--- अडथळा घेणे. conj.--- असे नाही तर, नाही तर, शिवाय.
Exception एक्सेप्शन् n.--- अपवाद, वर्जन.
Exceptionable एक्सेप्शनेबल् a.--- अपवाद घेण्याजोगा.
Exceptional एक्सेप्शनल् a.--- नियमाव्यतिरिक्त, असाधारण.
Excerpt एक्सर्प्ट् v.t.--- उतारा / उद्धरण म्हणून काढणे / देणे / उद्धृत करणे. n.--- उतारा, उद्धरण, अवतरण.
Excess एक्सेस् n.--- पराकाष्ठा, सीमा, विशेष, वरताळा.
Excessive एक्सेसिव्ह् a.--- पराकाष्ठेचा, अतिशय.
Excessively एक्सेसिव्ह्लि ad.--- अतिशय.
Exchange एक्सचेंज् v.t.--- मोबदला/साटेलोटे करणे, वटावणे, अदलाबदल करणे. n.--- अदलाबदल, वटाव, साटेलोटे, बट्टासट्टा, सराफा.
Exchequer एक्सचेकर् n.--- जमाबंदीची कचेरी.