try-tur

try ट्राय् v.t.--- प्रयत्न करून पाहणे, अनुभव घेणे, परीक्षा पाहणे.
tryst ट्रिस्ट् / ट्राइस्ट् n.--- भेटीचा करार, नियोजित भेट, मीलनसंकेत; संकेतस्थल.
tsunami त्सुनामी n.--- (जपानी भाषेंत = ‘harbor wave’) भूकंप, भूस्खलन, ज्वालामुखी आदींच्या समुद्रतळींच्या उद्रेकाने समुद्राच्या प्रचंड व शक्तिशाली लाटांचे किनारपट्टीच्या भूभागांत घडून येणारे विनाशकारी तांडव / थैमान. सुनामी.
tub टब् n.--- पीप, टीप. (स्नान-) कुंड.
tubby टबी a.--- लठ्ठ, स्थूल, गुबगुबीत.
tube टूब् / ट्यूब् n.--- नळी, नाडी, धमनी, शीर, पन्हाळ. आगगाडीचा तळमार्ग / भुयारी मार्ग. अशा मार्गातून धावणारी आगगाडी.
tubectomy टुबेक्टमी n.--- स्त्रीनसबंदी.
tuberose ट्यूबरोस् n.--- एक प्रकारचे कमळ.
tubular ट्यूबुल(र्) a.--- Tube च्या आकाराचे / Tube-सदृश.
tuck टक् n.--- घडी, दुमड. ‘Tuck up’ --- निऱ्या करणे, खोचून ठेवणे, दुमडून घेणे; कोंबणे. ‘Tuck in’ --- -वर ताव मारणे. -चे मनसोक्त भोजन करणे. ‘Tuck away’--- बाजूला ठेवणे.
tuesday ट्यूस्डे n.--- मंगळवार.
tuft टफ्ट् v.t.--- गोंड्यांनी शृंगारणे, झुपके लावणे, तुऱ्यांनी सुशोभित करणे. n.--- गोंडा, झुपका. तुरा, शेंडी.
tufted टफ्टेड् a.--- झुपकेदार, गोंडस.
tug टग् n.--- (मोठ्या जहाजांना) ओढून नेणारी छोटी नौका; शिकस्तीची ओढ. v.t.--- कष्टाने ओढणे, खेचणे, कष्ट करणे. Tug at --- -वर ताण देणे. Tug at (v.)--- -वर ताण देऊन ओढणे.
tuition ट्यूइशन् n.--- शिकवणी, शिक्षा, उपदेश.
tulle टूल् n.--- तळं / जाळीदार (रेशमाचे) कापड.
tumble टम्बल् v.i.--- लोळणे, लोटत जाणे, कोसळणे, कोलांट्यांचा खेळ खेळणे, ढकलून देणे. Tumble-down: पडका, मोडका.
tumbler टम्ब्लर् n.--- बहुरूपी, डोंबारी, रामपात्र.
tummy टमी n.--- पोट.
tumour ट्यूमर् n.--- गळू, गलांड, गांठ.
tumultuous टुमल्चुअस् a.--- त्रासदायक, अतिशय गोंधळ/गलबला असलेला, क्षुब्ध, विस्कळीत, अशांत.
tumulus ट्यूम्युलस् n.--- दफनभूमीतील मातीचा उंचवटा / ढीग. उंचवटा, गोळ, फुगवटा, गंड. (pl. tumuli)
tumult ट्यूमल्ट् n.--- गलबल, दंगा. (प्र-)क्षोभ, खळबळ.
tumultuous ट्यूमल्ट्यूअस् a.--- दंग्याचा, (प्र-)क्षुब्ध, धकाधकीचा.
tun टन् n.--- मोठे पीप. v.t.--- पिपांत घालणे.
tundra टुण्ड्रा / टण्ड्रा n.--- उत्तरध्रुवाजवळील बर्फ़ाळ मैदानी प्रदेश.
tune ट्यून् n.--- सूर, तान, स्वर, मिलाफ.
tuneful ट्यून्फुल् a.--- चांगल्या सुरांचे, गॉड, सुस्वर.
tunic ट्यूनिक् n.--- मानेपासून कमरे- / गुडघ्या- पर्यंतचा घट्ट अंगरखा.
tunnel टनेल् n.--- बोगदा, विवरमार्ग, नसराळे.
turban टर्बन् n.--- पागोटे, पगडी, शिरोभूषण.
turbid टर्बिड् a.--- मदळ, गढूळ, राड, मातकट.
turbulence टर्ब्यूलन्स् n.--- दांडगाई, बंडखोरी. क्षोभ, तीव्र उद्रेक.
turbulent टर्ब्यूलन्ट् a.--- बंडखोर, क्षुब्ध, दांडगा, पुंड.
turd टर्ड् n.--- विष्ठा, गू, मल.
tureen ट्यूरीन् n.--- खोल बशी / थाळी.
turf टर्फ् n.--- गवताची जमीन. The turf --- शर्यतीचे मैदान. ‘Turf out’ --- हाकलणे, काढून टाकणे. n.--- (pl. Turfs / turves) --- घोड्यांच्या शर्यतीचा खेळ / धंदा. स्पर्धा, संघर्ष, चढाओढ.
turgent टर्जन्ट् a.--- सुजलेला, फुगलेला.
turky टSर्की n.--- एक मोठा अमेरिकन पक्षी. या पक्ष्याचे मांस.
turmeric टर्मेरिक् n.--- हळद.
turn टर्न् v.t.--- फिरवणे, उलटणे, बदलणे, रूपांतर करणे, मन फिरवणे, परतणे. n.--- वळसा, वांकण, पाळी, मनाचा कल. Turn off --- वाटेस लावणे. Turn over --- उलथणे. Turn out --- काढून देणे, तयार करणे. Turn again --- परतणे. Turn aside --- आडरानात शिरणे. To take turn (at) --- (एखादे काम) स्वतः करून पाहणे, -चा प्रयत्न करणे, एखाद्या कामांतील आपली पाळी / सहभाग / भूमिका पुरी करणे.
turncoat टर्न्कोट् n.--- भूमिका, पक्ष इ. (सोयीप्रमाणे) बदलणारा माणूस. संधिसाधू व्यक्ति. विश्वासघातकी मनुष्य.
turnip टर्निप् n.--- शलगम कंद किंवा त्याचे झाड.
turnout टर्नाउट्
turnover ट(र्)न्ओव्ह(र्) n.--- विशिष्ट काळांत केलेल्या व्यापारी व्यवहारांची किंमत (उलाढाल); उत्पादन व त्याची विक्री यांची मूल्य, धंद्यात खपविलेल्या मालाची किंमत. विशिष्ट प्रदेशांतील लोक, माल, इ. ची ये-जा.
turnstile टSर्न्स्टाइल् n.--- प्रवेशस्थानी य-जा-नियंत्रणार्थ बसविलेला फिरता अडसर.
turpentine टर्पेन्टाइन् n.--- देवदाराचा चीक.
turpitude टर्पिट्यूड् n.--- हलकटपणा, दुराचार.
turquoise टर्कॉ(क्वॉ)इझ् n.--- एक (निळ्या आकाशी रंगाचे किंवा हलक्या निळ्या रंगाचे) खनिज.
turret टरेट् n.--- बुरूज, छोटा मनोरा विशेषतः इमारतीच्या एका कोपर्यात असलेला, तोफखानाच्या गोलंदाजांच्या संरक्षणार्थ बांधलेले पोलादी आवरण.
turtle टर्टल् n.--- कासव, खबूतराच्या जातीचा एक पक्षी.