dense डेन्स् a.--- गच्च, निबिड, घट्ट, दाट, जाडा.
density डेन्सिटि n.--- घट्टपणा, गच्चपणा, दृढता.
dent डेन्ट् n.--- पोंचा, खोंचा.
dental डेन्टल् a.--- दांतासंबंधी, दंत्य, दाताचा.
dentifrice डेन्टिफ्रिस् n.--- दांतवण, दंतमंजन.
dentist डेन्टिस्ट् n.--- दंतवैद्य.
dentition डेन्टिशन् n.--- दांत फुटणे, दन्तोद्भव.
denude डिन्यूड् v.t.--- नागवा करणे, उघडा करणे.
denunciate डिनन्शिएट् v.t.--- धमकी देऊन सांगणे, दोषारोप करणे. .
denunciation डिनन्सिएशन् n.--- धमकी.
deny डिनाय् v.t.--- नाकबूल करणे, नाकारणे.
denying डिनाइंग् n.--- नकार, नाकारण्याची क्रिया. = Denial (उदा. There can be no denying that (= हे नाकारता येणार नाही कॆ…) this country has been extremely cavalier in its approach to handling pesticides)
depart डिपार्ट् v.i.--- वाट धरणे, जाणे.
department डिपार्टमेंट् n.--- खाते, विल्हा, प्रकरण. (हिंदी: विभाग)
departure डिपार्चर् n.--- निघून जाणे, प्रयाण, गमन.
depasture डिपास्चर् v.i.--- चरणे.
depend डिपेंड् v.i.--- अवलंबून असणे, हाती/अधीन असणे, चिकटून/लटकून असणे, विश्वास ठेवणे, लोंबणे.
dependence डिपेंडन्स् n.--- पारतंत्र्य, अवलंब.
dependent डिपेंडन्ट् a.--- अवलंबी, परांकित, आश्रित.
depender डिपेंडर् n.--- लोंबणारा, संबंधी.
depict डिपिक्ट् v.t.--- चित्र काढणे, वर्णन करणे.
deplete डिप्लीट् v.t.--- कमी करणे, रिकामी करणे, घटविणे.
deplorable डिप्लोरेबल् a.--- रडू येण्याजोगा, शोच्य.
deplore डिप्लोअर् v.t.--- -च्या बद्दल तीव्र नापसंती दाखविणे / खेद करणे / रडणे.
deponent डिपोनन्ट् n.--- शपथेवर साक्ष/जबानी देणारा.
depopulate डिपॉप्युलेट् v.t.--- उजाड/ओसाड करणे.
deport डिपोर्ट् v.t.--- वागणे, वर्तणे, करणे, हद्दपार करणे.
deportment डिपोर्टमेंट् n.--- आचरण, वर्तणूक, चाल, हद्दपार.
depose डिपोझ् v.t.--- गाडीवरून/कामावरून काढणे.
deposit डिपॉझिट् v.t.--- अमानत ठेवणे, ठेव ठेवणे, ताब्यात देणे, सांठविणे. n.--- ठेव, गहाण, अनामत, न्यास.
depositary डिपॉझिटरि n.--- जिम्मेदार, वखार, कोठा.
deposition डिपॉझिशन् n.--- गादीवरून / कामावरून काढणे, साक्ष, जबानी, मत, ठेव.
depot डेपो n.--- कोठार, जागा, संग्रहालय.
deprave डिप्रेव्ह् v.t.--- खराब करणे, अपवित्र करणे (नैतिक दृष्ट्या).
depravity डिप्रेव्हिटी n.--- अपवित्रता, भ्रष्टता, दुष्टता.
deprecate डेप्रिकेट् v.t.--- न करण्याबद्दल विनंति करणे, नापसंत करणे.
depreciate डेप्रिसिएट् v.t.--- किंमत कमी करणे.
depreciation डिप्रिशिएशन् n.--- किंमत उतरणे, गुणापकर्ष, झीज, मूल्यक्षय, निंदा, मूल्यऱ्हास.
depredate डेप्रिडेट् v.t.--- लुटणे, फन्ना उडवणे, ओस पाडणे, विध्वंस करणे.
depredation डेप्रिडेशन् n.--- लूट, सप्पा, नाश.
depredator डेप्रिडेटर् n.--- लुटारू, उजाड करणारा.