Ergonomic अर्गनॉमिक् a.--- ‘ergonomics’ संबंधीचा / -स्वरूपाचा.
Ergonomics अर्गनॉमिक्स् n.--- मानव, त्याची यंत्रे/हत्यारे/साधनसामग्री आणि निसर्ग यांच्या संबंधाचे शास्त्र.
Ermine अर्मिन् n.--- एक केसाळ प्राणी, या प्राण्याचे केस / केसाळ कातडे; याचे कपडे.
Erode इरोड v.t. / v.i.--- कुरतडून काढणे, झिजविणे, झिजणे, धुपणे, ऱ्हास पावणे, खंगणे, खंगविणे.
Erosion इरोजन् n.--- ऱ्हास, धूप, झीज.
Erosive इरोझिव्ह् a.--- ‘erosion’ -चा/-विषयक.
Erotic इरॉटिक् a.--- कामवासनेचा, कामवासनेसंबंधीचा, कामोत्तेजक, कामातुर. n.--- शृंगारिक काव्य.
Erotica इरॉटिका n.--- शृंगारिक / शृंगारप्रधान साहित्य.
Erotical इरॉटिकल् a.--- Erotic
Eroticism एरॉटिसिझम् n.--- कामप्रवणता, शृंगारप्रधानता.
Erotism एरॉटिझम् n.--- कामप्रेरणा. = Eroticism.
Err अर् v.i.--- चुकणे, बहाकाने, सन्मार्ग सोडणे, चूक करणे.
Errand एरन्ड् n.--- निरोप, संदेश, कार्य, कर्तव्य, (नेमून दिलेले) काम, नियान्तक इष्ट कृत्य.
Errant एरन्ट् a.--- भटकणारा, फिरणारा, चुकार, भ्रांत.
Errata इराटा n.--- शुद्धिपत्र.
Erratic इरॅटिक् a.--- लहरी, छांदिष्ट, अनियमित, काळवेळ, रीतभात/ताळतंत्र नसलेला.
Erratically इरॅटिकली ad.--- लहरीनुसार, अनियमितपणे, काही ताळतंत्र न ठेवता / पाळता.
Erratum इराटम् (pl. Errata) n.--- चुकीची दुरुस्ती, प्रमादशुद्धि, शोध, शुद्धिपत्र (पहा: Corrigendum).
Erroneous एरोनिअस् a.--- चुकलेला, चुकीचा.
Error एरर् n.--- चूक, चुकी, भ्रम, अशुद्धपण, प्रमाद, पाप, स्खलन. च्युति.
Ersatz अर्झॅट्स् a.--- नकली, बनावट, कृत्रिम.
Eruct(ate) इरक्ट्(-क्टेट्) v.t./v.i.--- ढेकर देणे, ढेकाराने बाहेर सोडणे.
Eructation (इरक्टेशन्) n.--- ढेकर, उद्धार, उद्धमन.
Eruction (इरक्शन्) n.--- ढेकर, उद्धार, उद्धमन.
Erudite एर्यूडाइट् a.--- पढलेला, पढत.
Erudition एर्यूडिशन् n.--- विद्या, ज्ञान, विद्वत्ता.
Eruption ईरप्शन् n.--- जोराने फुटणे, स्फोट.
Erisipelas एरिसिपिलॅस् n.--- धांवरे.
Escalade एस्कलेड् v.t.--- शिड्या लावून चढणे/पार करणे, (शिड्या इ. च्या सहाय्याने, तटबंदी इ.) पार करण्याची क्रिया.
Escalate एस्कलेट् v.i.--- वर चढणे, वाढणे, तीव्र होणे.
Escalator एस्कलेटर् n.--- वर चढणारा (स्वयंचलित) जिना.
Escape एस्केप् v.t.--- पाळणे, पार पडणे, चुकवणे, टाळणे, निभावणे, धड राहणे. n.--- सुटका, निभाव, बचाव, उद्धार.
Escarpment एस्कार्पमेण्ट् n.--- तट, काठ, कठडा.
Eschatology एस्कटॉलॉजी n.--- जीवाच्या मृत्यूत्तर गतीचे शास्त्र, मरणोत्तरस्थितिविचार.
Escheat एस्चीट् n.--- बेवारसी/जिंदगी माल, बेवारशी मालमत्तेच्या सरकारनामा होण्याची प्रक्रिया/घटना. v.i.--- (वारसहीन मालमत्तेचे) सरकारनामा होणे.
Eschew एस्च्यू v.t.--- टाळणे, पासून दूर करणे.
Escort एस्कॉर्ट् v.t.--- बोळवणे, स्वारीबरोबर रक्षणार्थ असणे.
Esculent एस्क्यूलण्ट् a.--- खाण्याजोगा, भक्षणीय.
Escutcheon एस्कचन् n.--- ढाल, फलक, नावाची पाटी.
Esophagus ईसॉफेगस् n.--- अन्नमार्ग, अन्नाची नळी.