Spl-Spo

Splash स्प्लॅश् v.t.--- हिसळणे, शिंतोडे किंवा ठिपके उडविणे. भरविणे. v. n.--- शिंपडणे, इतस्ततः उसळविणे / उडविणे, हबकणे, हबकविणे, आदळणे (द्रवाचे), उसळवीत जाणे, (द्रव उसळविण्यास त्यावर काहीतरी साधन) हाणणे / आपटणे. (द्रवाचा) हबका, शिपका, फटका(रा), भपका, धमाल. मोठा / अवाढव्य डाग / ठिपका.
Splay स्प्ले v.i.--- पसरणे, वाकडे-तिकडे पसरणे.
Spleen स्प्लीन् n.--- पाणथरी, कौलू, प्लीहा, राग. रक्ताचा साठा, रक्तांतील पांढऱ्या पेशींचे उत्पादन इ. कार्ये करणारे पोटातील डाव्या बाजूचे इंद्रिय, पांथरी, गुल्म. चीड. To vent one’s spleen (on / upon) --- (एखाद्या-) -वर / -चा राग काढणे.
Splendid स्प्लेन्डिड् a.--- शोभिवंत, भव्य, बादशाही.
Splendent स्प्लेन्डन्ट् a.--- तेजस्वी.
Splendor स्प्लेन्डर् n.--- तेज, भव्यपणा, थाटामट.
Splenetic स्प्लेनेटिक् a.--- किरकिर करणारा, चिरड येणारा.
Splice स्प्लाइस् v.t.--- जोडणे, सांधणे. गुंतविणे, जोडणे, सांधणे. (The CD (compact disk) is fabricated and forged; the talk in the CD is spliced.) n.--- जोड.
Splint स्प्लिंट् n.--- ढलपा, कवची. v.t.--- तुकडे करणे.
Splinter स्प्लिंटर् n.--- ढलपा / ढलपी, कवची. तुटून निघालेला / वेगळा झालेला भाग. v.--- -चे तुकडे उडविणे. उध्वस्त करणे.
Split स्प्लिट् v.t.--- चिरणे, फाडणे. n.--- चीर, भेग, तडा.
Splurge स्प्लर्ज् n.--- दिमाख, देखावा, भपका, भडक प्रदर्शन, जोराची वृष्टि, मुसळधार वृष्टि; उधळपट्टी. v.i./ v.t.--- देखावा करणे, भारी वृष्टि करणे. (पैसे इ.) उधळणे.
Splutter स्प्लटर् n.--- चरचर, फुरफुर, फुसफुस (असा आवाज / हालचाल). पुटपुट. v.i.--- पुटपुटणे. फुरफुर /चरचर असा आवाज करणे. (शिंतोडे इ. चे) उडणे, शिंतोड्याच्या रूपात उडणे. गडबडीने अस्पष्ट उच्चारणे; v.t.--- (शिंतोडे इ.) उडविणे, -वर (पाणी) उडविणे. शिंतोडे / तुषार उडविणे.
Spoil स्पॉइल् v.t.--- बिघडविणे, नासविणे, लुटणे, लुबाडणे, नागविणे. n.--- लूट. Spoil (for) (fight etc.) --- -ची /-साठी तीव्र इच्छा / लालसा धरणे.
Spoilage स्पॉइलेज् n.--- खराबी, नासाडी, नाश.
Spoilsport स्पॉइल्स्पोर्ट् n.--- इतरांच्या आनंदात विघ्न आणणारा / त्यांत विरजण टाकणारा / विघ्नसंतोषी माणूस, उपद्रवी व्यक्ति.
Spoke स्पोक् n.--- चाकाची आर, खीळ, अडणी.
Spoliate स्पोलिएट् v.t.--- लूट करणे, दरोडा घालणे. उध्वस्त करणे, मोडतोड करणे. n.--- मोडतोड, खराबी.
Sponge स्पंज् n.--- स्पंज, एक हलका सच्छिद तंतुमय पदार्थ. To throw up the sponge : पराजय स्वीकारणे, माघार घेणे, (युद्धातून) पळ काढणे. v.t.--- लुच्चेगिरीने भरणे, पुसणे. To pass the sponge over : (अपमान इ.) विसरून जाणे, पडदा टाकणे.
Sponsor स्पॉन्स(र्) n.--- जामीन, धर्मपिता. (ख्रिश्चन धर्मविचारात) एखाद्याच्या धार्मिक संस्कारांची वयवसथा करणारी / जबाबदारी घेणारी व्यक्ति / संस्था. (पहा: Godfather). विशिष्ट (सामाजिक / सांस्कृतिक) कार्याची जबाबदारी (विशे. आर्थिक) स्वीकारणारी व्यक्ति / संस्था. पुरस्कर्ता, प्रायोजक. समर्थक. v.t.--- -च्या बाबतींत ‘sponsor’ (n.) होणे. (विशिष्ट कार्य इ.) -चा पुरस्कर्ता / प्रायोजक होणे. -चे समर्थन करणे.
Sponsorial स्पॉन्सोरियल् a.--- ‘sponsor’ (n.) -विषयक.
Sponsorship स्पॉन्स(र्)शिप् n.--- sponsor- पणा.
Spontaneous स्पॉन्टेनिअस् a.--- स्वयंभू, स्वतःसिद्ध.
Spoof स्पूफ् n.--- फसवणूक, बनवाबनवी, लबाडी. विडंबन, कुचेष्टा, टिंगल. v.t.--- -चे विडंबन करणे, फसविणे.
Spool स्पूल् n.--- = Reel.
Spook स्पूक् n.--- भूत, पिशाच. v.t.--- -ला भिवविणे, भिणे, घाबरणे.
Spoon स्पून् n.--- चमचा, पळी.
Sporadic स्परॅडिक् a.--- विखुरलेला (व्यापक नसलेला), तुरळक. प्रासंगिक. विरळ. व्यस्त. क्वचित (केंव्हातरी / कुठेतरी / अधूनमधून) आढळणारी. = Ocaassional, Accidental.
Sporadical स्परॅडिकल् a.--- = Sporadic.
Sport स्पोर्ट् n.--- खेळ, मौज, शिकार. v.t.--- गम्मत / करमणूक करणे.
Sportive स्पोर्टिव्ह् a.--- खेळकर.
Spot स्पॉट् v.t.--- ठिपका पाडणे, डाग पाडणे. n.--- डाग, ठिपका, लांछन, स्थळ, प्रांत, ठाव.
Spotless स्पॉट्लेस् a.--- निष्कलंक, निर्मल, निर्दोष.
Spouse स्पाउस् n.--- नवरा किंवा बायको.
Spout स्पाउट् v.t.--- फवारा उडविणे, चिळकांडी उडविणे, फवाऱ्यांनी सोडणे, बरळणे, चऱ्हाट लावणे. n.--- कारंजे, तोटी, झारी, नळी, पन्हाळ.