deaf डेफ् a.--- बहिरा, बधिर, फुटका.
deafen डेफन् v.t.--- बहिरा करणे. v.i.--- कानठळ्या बसणे.
deafness डेफनेस् n.--- बहिरेपणा, बधिरत्व.
deal डील् n.--- मान, प्रमाण, भाग, पत्त्यांची वाटणी, देवादाराचे लाकूड. v.t.--- वाटणी करणे, विभागणे. v.i.--- देवघेव करणे, वहिवाटणे.
dealer डीलर् n.--- देवघेव करणारा, व्यापारी, उदामी.
dealing डीलिंग् n.--- व्यापार, देवघेव, वर्तणूक, वर्तन.
dean डीन् n.--- ख्रिस्ती धर्माचा एक विशिष्ट क्षेत्रप्रमुख. विद्यापीठ इ. मधील विशिष्ट विषयविभागाचा मुख्य, अधिष्ठाता.
dear डिअर् a.--- आवडता, लाडका, प्रिय.
dearness डिअरनेस् n.--- लाडकेपणा, प्रेम.
dearth डर्थ् n.--- दुष्काळ, चणचण, महागाई.
death डेथ् n.--- मरण, मृत्यु, देवाज्ञा, नाश.
death-bed डेथ् बेड् n.--- मरणशय्या, मृत्युशय्या.
debacle डिबाकल् n.--- अचानक परिस्फोट, उद्वेक; (पराभावाची) तारांबळ/तिरपीट/त्रेधा. फजीतवडा, निर्णायक पराभव.
debar डीबार् v.t.--- आड येणे, प्रतिबंध करणे.
debark डीबार्क् v.t. and v.i.---नावेतून उतरणे.
debase डीबेस् v.t.---
debate डिबेट् v.t.--- वाटाघाट/’भवति न भवति’ करणे. n.--- वाटाघाट, वादविवाद.
debauch डीबॉच् v.t.--- बदकर्मात घालणे, अनैतिक कामात प्रवृत्त करणे. विषयासक्त/लंपट करणे. n.--- बदकर्म, अतिविषयासक्ति, विषयलंपटता , अतिरेकी कामोपभोग, कामरति, अतिविषयासक्त, विषयलंपट, dतिकामुक.
debauchee डीबॉशी n.--- बाहेरख्याली, दुर्व्यसनी, अतिकामुक.
debauchery डीबॉचरी n.--- बदकर्म, बदफैल, दुर्व्यसन, विषयासक्ती, बाहेरख्यालीपणा.
debilitate डीबिलिटेट् v.t.--- कमजोर, निःशक्त करणे.
debility डीबिलिटी n.--- कमजोर, कमकुवत.
debit डेबिट् v.t.--- खर्ची मांडणे/घालणे. n.--- कर्ज.
debonair = Debonnaire डेबनेअर् a.--- शालीन, विनयशील, उमदा, सहृदय, मनमिळाऊ.
debouch डिबूश् / डिबाउच् v.--- (नदी, सैन्य, इ. चे) अरुंद जागेतून बाहेर पडणे.
debris डेब्री n.--- उध्वस्त वास्तू इ. चे मोडून पडलेले भग्नावशेष. केरकचरा, दगडधोंडे, इ. चा ढिगारा.
debt डेट् n.--- कर्ज, ऋण, बांधलेपणा.
debtor डेटर् n.--- ऋणको, देणेकरी, ओशाळा, ऋणकरी.
debunk डीबंक् v.t.--- -ची प्रतिष्ठा कमी करणे, -चा खोटेपणा दर्शविणे, -चे स्तोम/भ्रम/खूळ खोडून काढणे.
debut डेब्यू n.--- आरंभ, प्रथम प्रयत्न, पदार्पण.
debutant देबूटाँ n.--- नवोदित नट/कलाकार.
debutante देब्यूतांत n.--- नवोदित नाती, नवतारका.
decadence डेकडन्स्/डिकेडन्स n.--- र्हास, अधःपतन.
decadency डेकडन्सी/डिकेडन्सी n.--- ऱ्हासावस्था.
decadent डेकडन्ट्/डिकेडन्ट् a.--- ऱ्हासप्रवण, ऱ्हासोन्मुख.
decamp डीकॅम्प् v.i.--- तळउठविणे, कूच करणे.
decant डीकॅन्ट् v.t.--- कलंडवून ओतणे, एखाद्या द्रवमिश्रणातील घनकणांना तळाशी ठेवून वरील द्रव ओतून घेणे.
decapitate डीकॅपिटेट् v.t.--- डोके उडविणे, मारणे.
decapitation डीकॅपिटेशन् n.--- शिरच्छेद.
decay डीके v.i.--- ऱ्हास होणे. n.--- ऱ्हास.