foo-for

food फूड् n.--- अन्न, भक्ष, आहार, भोजन, खाणे.
fool फूल् n.--- मूर्ख मनुष्य, हंडीबाग, अक्कलमंद.
foolery फूलरी n.--- वेडेपणा, वेडेचार, चेष्टा, विदुषकी वर्तणूक, विदुषकी लोक.
foot फूट् n.--- पाय, पाद, बूड, तळ, पायदळ, बारा इंचाचे माप.
foot-ball फूट-बॉल् n.--- पदकंदुक(-क्रीडा) =soccer (पहा)
footed फूटेड् a.--- पायांचा, सपाद.
footing फूटिंग् n.--- आश्रय, आधार.
footboy फूट्बॉय् n.--- हुजऱ्या.
footgear फूट्गियर् n.--- जोडा, पादत्राण, बूट.
footman फूट्मन् n.---गणवेशांतील अनुचर/शिपाई.
footnote फूटनोट् n.--- पानाखाली दिलेली टीप.
footpace फूट्पेस् n.--- पाऊल, चाल.
footpath फूट्पाथ् n.--- पायवाट, पायरस्ता, पदपथ, पद्या.
footrace फूट्रेस् n.--- पळण्याची शर्यत.
footsie
footstep फूट्स्टेप् n.--- पाऊल, पायरव, पद, चिन्ह खूण.
fop फॉप् n.--- अक्कडबाज, नखरेबाज.
for फॉर् prep.--- करिता, साठी, मुळे, ऐवजी, जागी. For Considering ०चा विचार करता, ०ला विचारात घेऊन.
forage फोरेज् n.--- लुटून आणलेला, दाना, चार; v.t.--- लुटणे, धाड घालणे, शोध घेणे, धुंडाळणे.
foray फोरे n.--- धाड, (लूटमार करण्यासाठीं केलेले) भ्रमण, चक्कर, फेरा. v.i.--- धाड घालणे, लूटमार करणे.
forbear फोरबेअर् v.t.--- दम धरणे, गय करणे, साहीणे;(from, to)
forbearance फोरबिअरन्स् n.--- गय, क्षमा, संयमन, दम, v.i.---दमाने घेणे.
forbearer फोर्बेअरर् n.--- आत्मसंयमी.
forbid फॉर्बिड् v.t.--- मना करणे, निषेध करणे.
force फोर्स् n.--- बळ, जोर, जुलूम, बळजबरी, बलात्कार, v.t.--- जुलूम करणे, ओढूनताणून आणणे.
force majeure फोॅर्स् मॅझsर् n.--- अचानक-/ आकस्मिक-पणे आलेले विघ्न / संकट, दुर्घटना, उत्पात.
forcemeat फोर्समीट् n.--- पाव, मांस इ. खाद्यपदार्थांत भरायचा मसाला.
forceps फोर्सेप्स् n.--- सोनाराचा -वैद्याचा चिमटा.
forceful फोर्स्फुल् a.--- बळाचा, जोराचा.
forceless फोर्सलेस् a.--- अशक्त.
forcibly फोर्सिब्लि ad.--- बळे, बळाने.
ford फोर्ड् v.t.--- पायउताराने उतरणे, n.--- पायउतार.
fordable फोर्डेबल् a.--- पायांनी उतारण्यासारखा.
fore फोर् a.--- पुढला, समोरचा, अगोदरचा.
forebode फोर्बोड् v.t.--- पुढील गोष्ट अगोदर सुचवणे, भाकीत सांगणे, भविष्य सांगणे. foreboding फोर्बोडिंग् n.--- अपशकुन, आपत्ती येणार असल्याची भावना, वाईट भविष्याची चाहूल. v.i.---भविष्याची कल्पना येणे, चिन्ह असणे.
foreboding फोर्बोडिंग् n.--- अपशकुन, आपत्ती येणार असल्याची भावना, वाईट भविष्याची चाहूल.
forecast फोर्कास्ट् v.t.--- अगोदर तजवीज करणे.
forefather फोर्फादर् n.--- वडील, पूर्वज.
forefoot फोर्फूट् n.--- पुढला पाय.
forefront फोर्फ्रण्ट् n.---पुढला भाग.
forego फोअर्गो / फॉर्गो v.t.--- मोडणे, त्यागाने, पूर्वी जाणे. [ भू. Forwent क. भू. धा. वि. forgone]
foregone फोर्गॉन् a.--- पूर्वनिश्चित, संकल्पित.
forehead फोर्हेड् n.--- कपाळ, माथा, ललाट.
foreign फॉरिन् a.--- परकीय, परदेशाचा, परदेशी, बाहेरचा, बाह्य.
foreigner फॉरिनर् n.--- प्रदेशचा माणूस, परदेशी.
foreign exchange फॉरेन्एक्स्चेंज् परकीय / परदेशी (य ) चलन. अशा चलनांचे विनिमय-व्यवहार.
foreknow फोर्नो v.t.--- भविष्य जाणणे.
foreland फोर्लॅण्ड् n.--- भूशीर, भूमीचे टोक.
forelock फोर्लॉक् n.--- टाळूवरचे/कपाळावरचे केस.
foreman फोर्मन् n.--- कारभारी, दिवाणजी, मोहरा.
forementioned फोर्मेन्शण्ड् a.--- मजकूर, वर लिहिलेला.
formidable प्रचंड, शक्तिशाली, महाभयंकर.
formost फोर्मोस्ट् a.--- सर्वापुढला, अग्रेसर.
forenoon फोर्नून् n.--- दुपारच्या पूर्वीची वेळ.
forensic फरेंसिक् / झिक् a.--- न्यायालयीन (उपयोगाचा), अपराधांचा शास्त्रीय पद्धतीने तपास करण्यासंबंधींचा. n.--- प्रस्तुत विषयाची एक बाजू मांडणारा लेख / सांगणारे निवेदन.
foreordain फोर्आॉर्डेन् v.t.--- पूर्वी ठरवणे, नेमणे.
forepart फोर्पार्ट् n.--- पुढला भाग, अग्र.
forerunner फोर्रनर् n.--- जासूद,हेर, अग्रसूचक.
foresee फोर्सी v.t.--- पूर्वी पाहणे, भविष्य पाहणे.
foreshadow फोर्शॅडो v.t.---०ची पूर्वसूचना देणे, (भविष्यातील एखाद्या गोष्टी) चें अस्पष्ट रूप दाखविणे. [उदा. The comments foreshadow US’s new policy of containment in regard to China]
foreshow फोर्शो v.t.--- पूर्वी-अगोदर दाखविणे.
foresight फोर्साइट् n.--- दूरदृष्टी, दीर्घदृष्टी.
foreskin फोअर्स्किन् prepuce
forest फॉरेस्ट् n.--- रान, जंगल, अरण्य, बन.
forester फॉरेस्टर् n.--- वनवासी, रानकरी, वनविहार, आटविक.
forestry फॉरेस्ट्री n.--- वनभूमि, वनप्रदेश, वन-संवर्धन व वन संरक्षण यांचे शास्त्र.
foretaste फोअरटेस्ट् n.--- पूर्वसूचना, इशारा, चुणूक.
foretell फोर्टेल् v.t.--- भाकीत-भविष्य करणे.
forethought फोर्थॉट् n.--- दूरदृष्टि, पुढचा विचार.
forever फॉरेव्हर् ad.---सर्वकाळी, नेहमी.
foreword फोर्वर्ड् n.--- प्रस्तावना.
forfeit फोर्फीट् v.t.--- दंड देणे. n.--- दंड, गुन्हेगारी, शिक्षा.
forfeiture फोर्फीचर् n.--- दंड देणे, जप्त होणे-करणे.
forge फोर्ज् v.t.--- घडणे, खोटा कागद करणे, रचणे, घडविणे.
forgery फोर्जरी n.--- बदकाम, बनावट केलेला कागद.
forget फर्गेट् v.t.--- विसर पडणे, भूल होणे.
forgetful फर्गेट्फुल् a.--- विसराळू, विसऱ्या, गफलत्या.
forgive फर्गिव् v.t.--- क्षमा करणे, माफ करणे.
forgiveness फर्गिव्नेस् n.--- क्षमाशीलता.
forgo फोर्गो v.t.--- त्यागणे, सोडणे, ०पासून अलिप्त राहणे. भू./ क. भू. धा. वि. ‘Forego प्रमाणे (forwent/forgone)
fork फोर्क् n.--- कांटा, बेचकें, डफाटा, दुबेळकें.
forlorn फोर्लोर्न् a.--- अनाथ, निराधार, दुःखी, कष्टी.
form फॉर्म् v.t.&v.i.--- घडणे, रूप देणे, बनणे, करणे, आकारणे. n.--- आकार, आकृति, बांधा, रूप, डौल, प्रतिमा, रीत, परिपाठ, बर्ग, बांक, धातूचे रूप, प्रपन्न, नमुना.
formal फॉर्मल् a.--- बाहेरच्या डौलाचा, औपचारिक.
formality फॉर्मॅलिटी n.--- कायदेशीरपणा, आदरोपचारसेवा, प्रथमार्गता, उपचार, रीति, औपचारिकता.
format फॉर्मॅट् n.--- पुस्तक, वृत्तपत्र इ. चा आकार/रूप/सजावट, व्यवस्था, योजना, ढंग.
former फॉर्मर् a./n.--- आधींचा, पूर्वींचा, पहिला, प्रथम उल्लेखिलेला, आगला pl.--- Former
formerly फॉर्मर्ली ad.--- मागे, पूर्वी, पहिल्याने.
formidable फॉर्मिडेबल् a.--- भयंकर, भयजनक.
formula फॉर्म्यूल n.--- रीति, पद्धति, औषधाची यादी, एखाद्या द्रव्याचे घटक सांकेतिक अक्षरांकादि खुणांनी सांगणारे सूत्र(उदा. पाणी=H2O
fornicate फॉर्निकेट् v.t.--- व्यभिचार-वेश्यागमन -रांडबाजी करणे.
fornication फॉर्निकेशन् n.---जारकर्म, वेश्यागमन, अविवाहितांचा गमागमन.
fornicator फॉर्निकेटर् n.--- शिंदळ, छिनाल, रांडबाज. fem. fornicatrix.
forspeak फॉर्स्पीक् v.t.--- मनाकरणे.
forswear फॉर्स्वेअर् v.t.--- त्यागणे, निश्चयपूर्वक / शपथेवर नाकारणे.
fort फोर्ट् n.--- किल्ला, कोट, दुर्ग.
forte फॉर्टे n.--- विशेष प्रावीण्याचे/ विद्वत्तेचे / पराक्रमाचे क्षेत्र / विषय.
forth फोर्थ् ad.--- पुढे, बाहेर, शेवटाकडेस, दूर.
forthcoming फोर्थ्कमिंग् a.--- तयार, हाजीर, सिद्ध.
forthwithफोर्थ्वुइथ् ad.--- लागलाच, तेंव्हाच.
fortifier फॉर्टिफायर् n.--- तटबंदी करणारा, मदत करणारा.
fortify फॉर्टिफाय् v.t.--- कोटबंदी-कोट करणे.
fortnight फोर्टनाइट् n.--- पंधरवडा.
fortuitous फॉर्ट्यूइटस् a.--- योगायोगाचा, काकतालीयन्यायाचा.
fortunate फॉर्च्यूनेट् a.--- दैवाचा, भाग्यशाली.
fortune फॉर्च्यून् n.--- दैव, नशीब, संपत्ति, भाग्य, भाग्यदेवता.
forty फॉर्टि a.--- चाळीस.
forum फोरम् n.--- न्यायाधीश मंडळ, पंचांची कचेरी, प्राचीन रोमन नगरांतील बाजार इ. सार्वजनिक व्यवहाराचें केंद्र / स्थळ, सार्वजनिक सभेचे / चर्चेचे स्थळ, विचारमंच, पीठ, न्यायपीठ.
forward फॉर्वर्ड् v.t.--- पुढे पाठविणे, वाढविणे, योग्यतेस चढवणे, पस्ती देणे. a.--- उत्सुक, धीट, उद्धट, उद्दाम, फाजिल , उत्साही. Forward market / forward trading वायदेबाजार, ठरलेल्या दराने पुढे करावयाच्या खरेदी/विक्रीचा आधी केलेला करार.
forwardness फॉर्वर्डनेस् n.---फाजीलपणा.