gloat ((up)on / over) ग्लोट् v.i.--- -ला / -कडे सहर्ष / आधाशीपणे / वासनापूर्वक /द्वेषपूर्वक पाहणे, - बद्दल उक्त भावनापूर्वक चिंतणे, द्वेषभावनेने बघणे किंव्हा विचार करणे, कपटी समाधानाने पाहणे. n.--- द्वेषभावना, कपटी विचार, द्वेषबुद्धी, द्वेषयुक्त समाधान.
global ग्लोबल् a.--- (घन-) गोलाकार. जागतिक, जगद्व्यापी. सर्वसाधारण, सर्वव्यापी, सर्वसमावेशक.
globalisation / Globalization ग्लोबलाइझेशन् n.--- जागतिकीकरण. जगभर पसरण्याची / प्रचार करण्याची प्रक्रिया.
globe ग्लोब् n.--- गोल, गोळा, वर्तुळ.
globocop ग्लोबोकॉप् n.--- सर्व जगाचा शिपाई.
globular ग्लोबयुलर् a.--- वर्तुळाकार, गोलाकृति.
globule ग्लोबयूल् n.--- लहान गोळी, गोळी.
gloom ग्लूम् n.--- झांकोळ, काळोखी. उदासपणा, नैराश्य, विषण्णता.
glorify ग्लोरिफाय् v.t.--- गौरव करणे, मोठेपणा देणे.
gloriole ग्लोरिअल् n.--- प्रभावळ, प्रभावलय.
glorious ग्लोरिअस् a.--- तेजस्वी, प्रतापी.
glory ग्लोरि v.i.--- विजय / आनंद / अभिमान मध्ये धुंद / मस्त असणे / राहणे, धन्यता अनुभवणे. n.--- गौरव, प्रशंसा, मोठेपणा, प्रताप, वैभव, महात्म्य. v.t.--- प्रतिष्ठा मारणे, आनंद मानणे, बढाई मारणे, फुशारकी मारणे.
gloss ग्लॉस् v.t.--- -चा अर्थ (छोट्या) टिप्पणीद्वारा विशद करणे, -वर भाष्य करणे. n.--- झिलई, सफाई, टीका, व्याख्या, शब्दांवरील टिप्पणी, शब्दार्थ -व्याख्या/-टिप्पणी. टीका, टिप्पणी, भाष्य, विवरण. = glossary. n.--- चमक, चमक देणारा रंग / रंगोटी.
glossary ग्लॉसरि n.---
glossy ग्लॉसि a.--- गुळगुळीत, सफाईदार.
glove ग्लव्ह् n.--- हातमोजा, पंजा, हाताचा मोजा.
glow ग्लो v.i.--- रसरसणे, झळकणे, लुसलुसणे, तापणे, धगधगणे, फणफणणे. n.--- झ्काकी, आंच, भडका, टवटवी, धग, आग, चकाकी, गुरमी.
glow-worm ग्लोवS(र्)म् n.--- काजव्याची चमकणाऱ्या पोटाची पंखाहीन मादी. काजवीण. पहा: Firefly.
glower ग्लोअर् v.i.--- रागाने / तिरस्काराने / वाकड्या नजरेने पाहणे.
glue ग्ल्यू v.t.--- सरस लावणे, सरसाने डकविणे. N.--- सरस, डकवण, चिकटवण.
glug (down) ग्लग् v.i.--- गिलने, गट्ट करणे, घटाघट पिणे. (The kids get out of schools and glug down their desired quota of carbonated water.)
glum ग्लम् a.--- मलूल, दुर्मुख, खिन्नवदन.
glut ग्लट् v.t.--- ओकारी आणणे, काठापर्यंत घालणे, (बाजार मालाने) भरून टाकणे. n.--- रेलचेल.
glutton ग्लटन् n.--- अधाशी, खादाड.
gluttonize ग्लटनाइझ् v.i.--- आकंठ भोजन करणे.
gnarl नार्ल् n.--- फुगारा गांठ. गुरगुर.
gnarled ना(र्)ल्ड् a.--- गाठीन्नी भरलेला, वाळून वाकडा झालेला. वठलेला. रुसणारा, चिडणारा. चिडखोर (स्वभाव / चेहरा).
gnash नॅश् v.t.--- दांतओंठ खाणे, दांत कराकरा चावणे.
gnat नॅट् n.--- चिलट, मुरकट, मच्छर.
gnaw नॉ v.t.--- दातांनी कुरतडणे, कलणे, डाचणे, टोचणे, झिजविणे, गंजविणे.
go गो v.i.--- जाणे, चालणे, तोंड काळे करणे. Go out = विझणे.
go-ahead गो-अहेड् n.--- पुढे चालण्याचा / सुरू करण्याचा संकेत / खूण / इशारा / अधिकार.
goad गोड् v.t.--- अंकुश / पराणी टोचणे, उचल करणे. n.--- पराणी, अरि, अंकुश.
goal गोल् n.--- चेंडूची धावण्याची हद्द / मर्यादा.
goat गोट् n.--- बोकड, शेळी, शेरडू.
goate गोटी n.--- हनुवटीवरची दाढी.
gobbledygook गॉबल्डिगूक् n.--- शब्दजंजाळ, वाग्जलि.
gobet गॉबेट् v.t.--- गपागप खाणे, चेंदामेंदा करणे.
goblet गॉब्लेट् n.--- जांब, पंचपात्री, गडू,पेला .
goblin गॉब्लिन् n.--- भूत, पिशाच्च, प्रेत.
gocart गोकार्ट् n.--- पांगुळगाडा.
god गॉड् n.--- ईश्वर, देव, परमेश्वर, भगवान.
god-child गॉड्-चाइल्ड् n.--- (ख्रिश्चन-) धर्मदीक्षेसाठी जबाबदार व्यक्ति द्वारा पुरस्कृत केली गेलेली व्यक्ति.
god-father गॉड्-फादर् n.--- (ख्रिश्चन-)धर्मदीक्षेसाठी कोणासतरी पुरस्कृत करून त्यास धर्मनिष्ठा ठेवण्याची जबाबदारी घेणारा पुरुष. ज्येष्ठ हितचिंतक. याचप्रमाणे God-mother, God-parent(s) इ..
god-head गॉड्-हेड् n.--- सर्वशक्तिमान देव. परमेश्वररूप सर्वोच्च शक्ति. = God.
goddess गॉडेस् n.--- देवी, भगवति, देवता.
godlike गॉड्लाइक् a.--- देवासारखा, देवरूपी.
godliness गॉड्लिनेस् n.--- ईश्वरभक्ती, ईश्वरनिष्ठा.
godown गोडॉउन् n.--- कोठी, वखार, जिन्नसखाना.
godsend गॉड्सेंड् n.--- ईश्वरी देणे, ईश्वराने दिलेली अनपेक्षित संधि/देणगी; अनपेक्षित शुभयोग.
godspeed गॉड्स्पीड् n.--- यशस्वी होवो, सुखप्रवास.
goggle गॉगल् v.t.--- डोळे वटारणे. a.--- बटबटीत.
goiter / Goitre गॉइटर् n.--- कंठग्रंथीची सूज, गलगंड.
gold गोल्ड् n.--- सोने, पैका, नाणे, संपत्ति, कनक.
golden गोल्डन् a.--- सोन्याचा, सोनेरी, आनंदाचा, सुखाचा.
golden shower गोल्डन्-शॉवर् n.--- = Laburnum.
goldsmith गोल्ड्स्मिथ् n.--- सोनार.
gong गॉन्ग् n.--- तास, घड्याळ, घड्याळातील घंटा, धातूच्या तबकडीची घंटा.
gonorrhoea गॉनरीअ n.--- परमा, प्रमेह. जननेन्द्रियांच्या (मूत्रनलिका आदि) श्लेष्मस्त्रावी अंतर्भागांचा दाह करणारा रोग.
goo गू n.--- चिकटद्रव्य. निरुपयोगी सामान, अडगळ, कचरा, घाण. अति(रेकी) भावनाप्रधानता.
good गुड् a.--- चांगला, उत्तम, उपकारी, कुशल, दमदार, शुभ. n.--- फायदा, श्रेय, हित, कल्याण. For good: ad.--- ओघाने प्राप्त / तर्कसंगत निर्णय म्हणून. अखेरचा / कायमचा निर्णय म्हणून.
Good Friday गुड्फ्राइडे n.--- जीसस् क्राइस्टला क्रूसावर चढविले गेल्याचा वर्धापनदिन - ‘ईस्टर’ (Easter) दिनाच्या आधीचा शुक्रवार.
goodbye गुड्बाय् int.--- सुखी ऐस/असो, स्वस्ति.
goodnatured गुड्नेचर्ड् a.--- शीलाचा, सुशील.
goodfellow गुड्फेलो n.--- सच्चा माणूस, गुळाचा गणपती.
goodie गूडी = Goody
goodly गुड्ली a.--- सुरेख, सुंदर, सुरूप. भरपूर, पुष्कळ. बरा, ठीक, सोयीचा.
goodness गुड्नेस् n.--- चांगुलपणा, सत्व, कस.
goods गुड्स् n.--- माल, चीजवस्तू, जिन्नस.
goodwill गुड्वुइल् n.--- मर्जी, जुनी, गिर्हाइकी, मान्यता, प्रत, प्रतिष्ठा, विश्वास (विशेषतः व्यापार, व्यवसाय यांतील).
goody गूडी n.--- विशेष आकर्षण / लाभ / लग्गा, अशा स्वरूपाची वस्तु.
goody-goody गूडी-गूडी a./n.--- विशेष सभ्य / साळसूद, अत्यादरशील.
goof गूफ् n.--- मूर्ख, विदूषक, खुळा. v.i.--- मूर्ख बनणे, फाशी पडणे, उपहासास्पद होणे. Goof up: v.t.--- (मूर्खपणाने हाताळून) बिघडविणे. n.--- मूर्खपणाचे कृत्य, वेडाचार. ‘Cook (one’s) goose’ : -चा सत्यानाश करणे, उच्छेद करणे.
googly गूग्ली n.--- ‘Leg-break’ (पहा) म्हणून फेकलेला / तशी भासणारी, पण प्रत्यक्षात ‘off-break’ (पहा) असणारी / होणारी, क्रिकेट-खेळांतील (दक्षिणहस्ती) गोलंदाजाची (दक्षिणहस्ती) फलंदाजाकडे केलेली फसवी / चाकावानारी चेंडू-फेक.
goose गूस् n.--- हंसी, हंस, मूर्ख. संलग्न बोटे व काकमान असलेला हंस जातीचा पाणपक्षी. अशा पक्ष्याची मादी, हंसी. Wild goose : जंगली हंस/हंसी; विदूषक / मूर्ख इसम. Wild goose chase : मूर्खपणाचा / निष्फळ, उपद्व्याप, निरर्थक काम, मृगजळामागे धावणे.
goose- flesh / -pimples / -skin) गूस्-फ्लेश्/-पिंपल्स्/-स्किन् n.--- अंगावर कांटा उभा राहण्याची प्रक्रिया / अवस्था, असे उभे राहिलेले कांटे.
gooseberry गूझ्बेरि n.--- एक प्रकारचे फळ.
goosey n.--- साधाभोळा माणूस / व्यक्ति.