inv-irr

invade इन्व्हेड् v.t.--- स्वारी / हल्ला करणे, चाल करणे.
invagination इन्वॅजिनेशन् n.--- कोशरचना, आवरणरचना, आच्छादनप्रक्रिया.
invalid इन्व्हॅलिड् a.--- पोकळ, निर्जीव, निरुपयोगी.
invalidate इन्व्हॅलिडेट् v.t.--- रद्द करणे, निर्बल करणे.
invaluable इन्व्हॅल्यूएबल् a.--- अमोलिक, अमोल.
invasion इन्व्हेझन् n.--- स्वारी, परचक्र, हल्ला, चाल.
inveigle इन्वीगल् v.t.--- ओढून घेणे, आकृष्ट करणे; फूस लावणे, फशी पाडणे, मोहात पाडणे.
invent इन्व्हेन्ट् v.t.--- युक्ति काढणे, शोधणे, कल्पणे.
invention इन्व्हेन्शन् n.--- नवी युक्ति/कल्पना, शोध, आविष्कार.
inverse इन्व्हर्स् a.--- उलटा, व्यस्त, उफराटा.
inversion इन्व्हर्झन् / इन्व्हर्शन् v.t.--- विपरीतिकरण, उलटे करण्याची / दर्शविण्याची क्रिया.
invert इन्व्हर्ट् v.t.--- क्रमस्थिति उलटे करणे, आंत वळविणे.
invest इन्व्हेस्ट् v.t.--- नेसवणे, वेढा घालणे, गुंतवणे.
investigate इन्व्हेस्टिगेट् v.t.--- चौकशी/तपास करणे.
investiture इन्व्हेस्टिट्यूर / इन्व्हेस्टिचर् n.---
inveterate इन्व्हेटरेट्
invidious इन्व्हिडिअस्
invigilate इन्व्हिजिलेट् v.t. / v.i.---- (-वर) लक्ष ठेवणे (विशे. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी इ. वर), समवेक्षण/निरीक्षण करणे.
invigilation इन्व्हिजिलेशन् n.--- ‘invigilate’ करण्याचे काम, समवेक्षण, निरीक्षण, देखरेख.
invigilator इन्व्हिजिलेट(र्) n.--- ‘invigilate’ करणारा, निरीक्षक, समवेक्षक.
invigorate इन्विगरेट् v.t.--- उत्साह वाढवणे, तरतरी आणणे, ताकद देणे, जोमदार बनविणे.
invincible इन्व्हिन्सिबल् a.--- अजिंक्य, अजित.
invisible इन्व्हिझिबल् a.--- अदृश्य, परोक्ष.
invite इन्व्हाइट् v.t.--- बोलावणे, आमंत्रण देणे.
invocate इन्व्होकेट् v.t.--- धावा करणे, नाव घेणे.
invocation इन्व्होकेशन् n.--- धावा, स्तव, नामोच्चारण.
invoke इन्व्होक् v.t.--- -ला आवाहन करणे, -चा धावा करणे, -ची प्रार्थना करणे, -ला (आधार म्हणून) उद्धृत करणे. (नियम, मंत्र, इ. चा) प्रयोग / उपयोग करणे, त्यांना चालविणे / कार्यशील करणे.
involution इन्व्होल्यूशन्
involve इन्व्हॉल्व्ह् v.t.--- गर्भित करणे, गुंडाळणे.
involvement
inward इन्वर्ड् a.--- आंतला, आतील. ad.--- आत.
iodine आयोडीन् / आयोडाइन्
ion आयन्
ipse dixit इप्सी डिक्सिट् = he himself said it. (केवळ एखाद्या व्यक्तीच्या वचनावर आधारलेली भूमिका).
ipso facto इप्सो फॅक्टो (= by that very fact, by the fact itself) केवळ त्यामुळे, केवळ त्या स्थितिमुळे.
irascible इरॅसबल् a.--- रागीट, तापत, कोपिष्ठ, चिडका.
irate ऐरेट् a.--- रुष्ट, क्रुद्ध, रागावलेला, रागीट, कोपिष्ठ, क्रोधजनित, रागाचा.
iridology
iris आयरिस् n.--- (pl. Irises or Irides) प्रकाशकिरणे नियंत्रित करणारा / कमी/जास्त करणारा डोळ्याचा, विशिष्ट रंग असणारा, पडद्यासारखा भाग, (डोळ्याची) बाहुली / पुतळी, बुबुळ, अक्षीगोलक, कनीनिका. (पहा: pupil) (मूळ अर्थ : rainbow / इंद्रधनुष्य).
irk अर्क् v.t.--- -ला शिणविणे / त्रासणे / कंटाळा आणणे.
irradiate इरेडिएट् v.t.--- -वर (प्रकाश) किरणे / वायु-/उष्णता-लहरी सोडणे, -ला अशा किरणांनी / लहरींनी संस्कारिणे. किरणे/लहरि उत्सर्जिणे / फेकणे / सोडणे.
irradiation इरेडिएशन् n.--- किरणोत्सर्जन प्रक्रिया. औषधि किरणे / लहरी यांच्या संस्काराने केलेले शुद्धीकरण.
irrational इरॅशनल् n.--- तर्कशून्य, निर्बुद्धपणाचा, असमर्पक, अयुक्त, मूर्खपणाचा, बुद्धिहीन. Irrational number - दोन पूर्णांकांच्या भागाकाराच्या रूपाने व्यक्त ना होऊ शकणारी संख्या.
ironing आयर्निंग् v.t.--- इस्त्री करणे.
ironsmith आयर्न्स्मिथ् n.--- लोहार, घिसाडी.
irony आय्रनी n.--- उपरोध, आक्षेप, व्याजोक्ति, विडंबना.
irregular इरेग्युलर् a.--- गैरशिस्त, बेशिस्त, अनाचारी, अनपेक्षित, अनौचित्य.
irregularity इरेग्युलॅरिटि n.--- गैरशिस्तपणा, अन्याय.
irrelevance इरेलिव्हन्स् n.--- असंबद्धता, अप्रस्तुतता, संदर्भहीनता, असंगति, विसंगति. संदर्भशून्यता, विसंगति, निरुपयोगिता, कालबाह्यता.
irrelevancy इरेलिव्हन्सी n.--- =Irrelevance.
irrelevant इरेलिव्हन्ट् a.--- असंबद्ध, अप्रस्तुत, विषयबाह्य, गैरलागू, असंगत, विसंगत, संदर्भहीन, विसंगत, कालबाह्य. अप्रासंगिक (हिंदी).
irreligion इरिलिजन् n.--- धर्मद्वेष; धर्मविमुखता.
irreligious इरिलिजस् a.--- धर्मविमुख, धर्मद्वेष्टा.
irreparable इरेपरबल् a.--- पूर्वावस्थेस आणण्यास / येण्यास कठिण / अशक्य (अवस्था इ.), भरपाई करण्यास अवघड / अशक्य (हानि इ.).
irreplaceable इरिप्लेसबल् a.--- बदलण्यास अशक्य / अवघड. अद्वितीय, अजोड, बिनतोड.
irrepressible इरिप्रेसबल् a.--- अनावर, दुर्दम्य, दुर्दांत.
irreproachable इरिप्रोचबल् a.--- अनिंद्य, अगर्ह्य, निर्दोष.
irresistible इरिझिस्टबल् a.--- दुर्निवार, अनावर. हृदय वेधून / छेचून घेणारा, दिलखेचक, वेड लावणारा.
irresolute इरेझलूट् a.--- अनिश्चयी, डळमळीत/लटपटीत वृत्तीचा.
irresolution इरेझलूशन् n.--- अनिश्चय, डळमळीत / लटपटीत वृत्ति.
irrespective (of) इरिस्पेक्टिव्ह् a.--- च्या निरपेक्ष. च्या अस्तित्वास दुर्लक्षून, -ला उपेक्षून.
irresponsible इरिस्पॉन्सिबल् a.--- कर्तव्याची जाण नसलेला, कर्तव्याबद्दल बेफिकीर, बेजबाबदार.
irresponsibility इरिस्पॉन्सबलिटी
irreverent इरेव्हरण्ट् a.--- भक्तिहीन, अश्रद्ध.
irreversible इरिव्ह(र्)सबल् a.--- अपरिवर्तनीय.
irrevocable इरेव्हकबल् a.--- फिरविण्यास / बदलण्यास अशक्य, मागे / माघारी घेण्यास अशक्य.
irrigate इरिगेट् v.t.--- पाटाने पाणी देणे, पाणी इ. ने भिजवून सिंचन काढणे.
irrigation इरिगेशन् n.--- पाटाचा पाणीपुरवठा.
irritable इरिटबल् a.--- चिडखोर, तापट.
irritate इर्रिटेट् v.t.--- राग आणणे, चिडविणे, खिजविणे.