Lurch लर्च् n.--- एकदम तोल / झोक जाण्याची / लडखडत, झोकांड्या खात राहण्याची स्थिति, दुःस्थिति, दुरवस्था, विपत्ति, असहाय अवस्था. v.i.--- लटपटत / लडखडत जाणे, झोकांड्या खाणे / खात जाणे (Unable to process the hard knocks of this election, the BJP has lurched from non-issue to non-issue). (जहाज इ. चे) एकदम कलंडणे, कडमडणे, धडपडणे. To leave one in the lurch - -ला असहाय अवास्टनेत / संकटात सोडून जाणे.
Lure ल्यूर् v.t.--- मोहविणे, लालूच दाखविणे. n.--- आमिष.
Lurid ल्यूरिड् a.--- भयानक, भयप्रद, बटबटीत, भपकेबाज.
Lurk लर्क् v.i.--- दडणे, लपणे, दडी मारून बसणे, दबा धरून बसणे, लपत छपत हिंडणे.
Luscious लशस् a.--- अतिगोड, रुचकर, स्वादिष्ट.
Lush लश् a.--- भरघोस, घनदाट, संपन्न, समृद्ध, बहरलेला.
Lust लस्ट् v.i.--- लुब्धणे, जीव टाकणे. n.--- हौस, सोस, (शारीरिक / पाशवी / पापी) कामवासना, मदत, काम, तेज.
Lustily लस्टिलि ad.--- जीव तोडून, जोराने, मजबूत.
Lustrate लस्ट्रेट् v.t.--- -ला शुद्ध / पवित्र करणे.
Lustration लस्ट्रेशन् n.--- विधिपूर्वक शुद्धीकरण / पावनीकरण, नीराजन.
Lustre लस्टर् n.--- कांति, तेज, पाणी, प्रतिष्ठा, रंग.
Lustrous लस्ट्रस् a.--- तेजस्वी, पाणीदार, चकचकीत.
Lusty लस्टी a.--- जोमदार, जबरदस्त, पाणीदार.
Lute ल्यूट् n.--- वीणा, तंबुरा, बीन. v.t.--- वाजविणे.
Luxuriance लक्झ्यूरिअन्स् n.--- माज, ऊत, मात.
Luxuriant लक्झ्यूरिअन्ट् a.--- वाढीचा, उफाड्याचा.
Luxuriate लक्झ्यूरिएट् v.i.--- माजणे, फोफावणे.
Luxurious लक्झ्यूरिअस् a.--- विलासी, भोगी.
Luxury लक्शुरी n.--- ऐषारामाचे साहित्य.
Lychee (also Litchi) लायची n.--- लांबट लिंबाच्या आकाराचे खवलेदार सालाचे आंत पांढरा गर व त्याआंत लांबोडे बी असलेले (‘लिची’ म्हणून उत्तरभारतात ओळखले जाणारे) एक फळ. या फळाचा वृक्ष.
Lying लाइंग् n.--- खोटे बोलणारा, असत्या कथन.
Lymph लिंफ् n.--- जीव शरीरांतील, अनेक अवयवांपासून / त्यांच्या घटकद्रव्यापासून स्रवणारा, अल्कलीगुणयुक्त, किंचित-प्रथिनयुत, ‘Lymphocyte’ प्रकारच्या पांढऱ्या रक्तपेशींनी व्यत्प्त, रंगहीन द्रव / रस / लस (हिंदी मध्ये : लसिका)
Lymph gland लिम्फ् - ग्लँड् = Lymph node
Lymph node लिम्फ् - नोड् n.--- ‘Lymph’ वाहक नलिकाजालांतील ‘Lymphoid tissue’ ने बनलेली ‘Lymph’ ला शुद्ध ठेवणारी ‘antibodies’ पुरविणारी शरीरांतील ग्रंथि.
Lymphatic लिंफॅटिक् a.--- ‘Lymph’ संबंधीचा. n.--- = Lymphatic vessel
Lymphatic tissue = Lymphoid tissue
Lymphatic vessel लिम्फॅटिक् वेसल् n.--- ‘Lymph’ - रस शरीरात फिरविणाऱ्या शरीरात पसरलेल्या नलिकाजालांतील एक नलिका.
Lymphocyte लिम्फोसाइट् n.--- ‘Lymph’ मधील पांढऱ्या रक्तपेशींचा एक प्रकार.
Lymphoid लिम्फॉइड् a.--- ‘Lymph’ शी / त्यासंबंधी द्रव्याशी सदृश.
Lymphoid tissue लिम्फॉइड् टिशू n.--- स्वतःच्या पेशींच्या विभाजनाने ‘Lymphocyte’ उत्पन्न करणारे शरीरात अनेक ठिकाणी, विशेषतः पांथरी, Thymus, tonsil, येथे पसरलेले द्रव्य.
Lyre लायर् n.--- वीणा.
Lyric लिरिक् a.--- छंदोबद्ध करण्याजोगा, गेय. वैयक्तिक भावना व्यक्त करणारा, भावोत्कट, भावादरपूर्ण. n.--- अशी कविता / भावगीत. =Lyrical
Lyrical लिरिकल् = Lyric
Lyricism लिरिसिझम् n.--- कला / कृतीतील भावप्रधानता / भावप्रधान शैली
Lyrist लायरिस्ट् n.--- वीणा वाजविणारा.