lice लाइस् n.--- ऊ, यूका.
licence लायसेन्स् v.t.--- परवाना / संवाद देणे. n.--- परवाना.
licentiate लायसेन्शिएट् n.--- सनदवाला, सनदी.
licentious लायसेन्शिअस् a.--- बेबंद, बेताल, अमर्याद, व्यभिचारी, दुराचारी, लुच्चा, फसव्या.
lick लिक् v.t.--- चाटणे, अवहेलना करणे, मारणे, (आपल्या / स्वतःच्या) जिभल्या चाटणे, खाण्यास उत्सुक असणे. (The Taliban is waiting, licking its tongue.)
lickspittle लिक्स्पिटल् n.--- थुंकी झेलणारा, थुंकझेल्या.
licorice लिकोरिस् n.--- ज्येष्ठमध, रतनगुंजप, मधुक.
lid लिड् n.--- झाकण, ढापण, झापण, पापणी.
lie लाय् v.i.--- (past participle: lain, present participle: lying) खोटे बोलणे, पडणे, निजणे, आडवे होणे. n.--- लबाडी, खोटी गोष्ट, अनृत, मिथ्यावचन, माया. lie by - विसावा घेणे. Lie down - अंग टाकणे. Lie in wait - दडणे, लपणे. Lie under - साहणे. Lie with - शिरावर पडणे. (Past tense : Lay. Past participle : Lain)
liege लीज् a.--- हुकमी, प्रजाधर्मी. n.--- खाविंद, खुदावंत, धनीसाहेब, महाराज, प्रभु.
liegeman लीज्मन् n.--- सेवक, प्रजा, कूळ, आश्रित.
lieutenant लूटेनन्ट् / लेफ्टेनन्ट् n.--- प्रतिनिधि, मुतालिक. n./a.--- (निर्दिष्ट) विशिष्ट पदावरील अधिकाऱ्याच्या वतीने / ऐवजी काम करणाऱ्या ‘कनिष्ठ’ / ‘उप’ अशा अर्थाचा शब्द. (उदा: Lieutenant Governor - उपराज्यपाल. Lieutenant General). सैन्यांतील (विशे. भूदल वा नौदल यांतील) एक कनिष्ठ पद / हुद्दा.
life लाइफ् n.--- प्राण, जिणे, आयुष्य, चरित्र, आख्यान, संसार, इहलोकवास, प्रपंच.
life-annuity लाइफ्अॅन्युइटि n.--- तहाहयात वर्षासन.
lifeless लाइफ्लेस् a.--- गतप्राण, निर्जीव, अचेतन.
lift लिफ्ट् v.t.--- वर उंच करणे, चढणे, वर करणे, उचलणे, वॉर घेणे.
ligament लिगॅमेन्ट् n.--- बंधन, पाश, संधिबंधन.
ligature लिगट्युअ(र्) / लिगच(र्) n.--- फास बंद, बंधन, पट्टी, (परि-)वेष्टन. v.--- फासणे / बंधनाने आवळणे / दाबणे. (लेखन, छपाई इ. मध्ये) जोड (-चिन्ह), जोडाक्षर (उदा. æ). (The autopsy report mentioned a post mortem ligature mark on the neck.)
light लाइट् v.t.--- उजेड देणे, प्रकाश देणे, लावणे, पेटवणे. n.--- दिवा, उजेड, प्रकाश, ज्ञान, दृष्टि. a.--- हलका, थोडा, चपळ, सोपा, छचोर, चटोर.
lighten लाइटन् v.t. and v.i.--- हलका करणे, उजेड करणे, चकचकणे, ज्ञान देणे, आनंदित करणे, पेटवणे.
lighthouse लाइट्हाउस् n.--- दीपगृह.
lightly लाइट्लि ad.--- हलके, हळू, जलद.
lightning लाइट्निंग् n.--- ढगांतील चमकून जाणारी वीज. अशा विजेचा चमचमाट. a.--- Lightning सारखा, अकस्मात घडलेला, एकाएकी प्रकटणारा, आकस्मिक.
like लाइक् v.t.--- आवडणे, पसंत करणे. a.--- सारखा, तुल्य, सदृश. ad.--- तसाच, बहुधा, कदाचित.
liken लाइकन् v.t.--- तुलना करणे, उपमा देणे.
likewise लाइक्वाइज् ad.--- तसाच, देखील, ही.
liking लायकिंग् n.--- कल, आवड, गोडी, चटक.
lilliput लिलिपुट् n.--- अतिशय लहान आकाराच्या प्राण्यांचा देश. (Swift- लिखित Gulliver’s Travels कादंबरीतील). ‘Lilliputian’ a.--- ‘Lilliput’-चा.
lilt n.--- गाणे, गोड गळ्याने गायलेले गीत, सूर, ताल, लय, लकेर, बोलण्यातील आवाजाचा चढउतार. v.t./v.i.--- तालासुरात / ठेक्यात म्हणणे, हेल काढून बोलणे, लकेर घेणे.
lily लिलि n.--- भुईकमळ.
limb लिम्ब् n.--- अवयव, अंग, फांदी, शाखा, गात्र.
limbo लिंबो n.--- ख्रिस्तीधर्माप्रमाणे ख्रिस्तागमनापूर्वी देह ठेवलेल्या तसेच आदीक्षित बालावस्थेत मृत झालेल्या जीवांचे नरकसीमेजवळील निवासस्थान. Limbo सारखे बंदिगृह, अधांतरी / टांगती कष्टावस्था, दुरवस्था.
lime लाइम् v.t.--- चिकटा लावणे, पाशांत धरणे. n.--- चुना, लिंबाचे झाड, लिंबू.
limekiln लाइम्किल्न् n.--- चुन्याची भट्टी.
limen लायमेन् n.--- लॅटिन भाषेत = threshold, उंबरठा. संवेदना / प्रेरणा यांच्या तीव्रतेचा आकलनास कमीत कमी आवश्यक असा स्तर.
limerick लिमरिक् n.--- विनोदी, चुटकेवजा कविता / श्लोक.
limestone लाइम्स्टोन् n.--- चुनखडा / चुनखडी.
limewater लाइम्वॉटर् n.--- चुन्याची निवळी.
liminal लिमिनल् a.--- ‘Limen’ च्या स्वरूपाचा.
limit लिमिट् v.t.--- मर्यादा करणे, धरबंद घालणे. n.--- हद्द, सीमा, मर्यादा, शीव, अवधि, अटक, प्रतिबंध, विशेष.
limitation लिमिटेशन् n.--- हद्द, मर्यादा, अवधि, आळा, मुदत.
limited लिमिटेड् a.--- मर्यादित, आकुंचित, अप्रशस्त.
limn लिम् v.t.--- चित्र / तसबीर काढणे, छबी उतरणे.
limner लिम्ननर् n.--- चितारी, चित्रकार.
limousine लिमुझिन् n.--- (सुसज्ज, आरामशीर) मोटरगाडी.
limp लिम्प् v.i.--- लंगडत जाणे. n.--- लंगडणे, फरफटणे. a.--- थिलथिलीत, मऊ, लवचिक.
limpid लिम्पिड् a.--- निवळ, स्वच्छ, शुद्ध.
limy लाइमि a.--- चुनखडीचा, चुन्यासारखा.
linchpin लिन्च्पिन् n.--- चाकाच्या आसांची खीळ.
lincture लिंक्चर् / लिंक्ट्युअ(र्) n.--- चाटण, अवलेह.
linctus लिङ्क्टस् n.--- = Lincture
line लाइन् n.--- रेघ, दोरी, ओळ, रांग, क्रम, परिपाठ, वंश, रेषा, धंदा. v.t.--- अस्तर लावणे, मढवणे, रेघा काढणे / आखणे.
lineage लीनिएज् n.--- वंश, घराणे, जात, गोत्र, वंशावळ, वंशजसंघ.
lineal लीनिअल् a.--- परंपरागत, रेघांचा, रेखारूप.
lineament लिनिआमेंट् n.--- रुपलक्षण, अंगलक्षण, रूपरेषा, ठेवण.
linen लिनन् n.--- घरगुती उपयोगाच्या कापडाच्या वस्तु (पलंगपोस, पडदे, अभ्रे, इ.). To wash one’s dirty linen in public = -च्या तंटे इ. खासगी गोष्टींचा बभ्रा करणे.
linendraper लिनन्ड्रेपर् n.---
liner लायनर् n.--- लढाऊ जहाज, एखाद्या कंपनीचे मालाचे अगर उतारूंचे गलबत.
linger लिंगर् v.i.--- उशीर लावणे, गमणे, रेंगाळणे.
lingerer लिंगरर् n.--- चेंगट, गमणारा.
lingerie लाँज्री n.--- स्त्रीचा पोषाख, बाईचे कपडे.
linget लिंगेट् n.--- धातूची कांडी / लगड.
lingle लिंगल् n.--- चांभाराचा धागा.
lingo लिंगो n.--- भाषा, बोली.
lingua लिंग्वा n.--- जीभ, जिभेसारखा अवयव; भाषा.
lingua franca लिंग्वा फ्रँका / लिंग्व फ्रँक n.--- (भिन्नभाषीयांची परस्परव्यवहाराची कामचलाऊ) बोली. (स्वभाषेव्यतिरिक्त) साधारण व्यावाहारिक भाषा.
lingual लिंग्वल् a.--- जिव्हेसंबंधींचा, जिव्हाविषयाचा, जिव्होत्पन्न (वर्ण), मूर्धन्य भाषिक, वाचिक.
linguist लिंग्विस्ट् n.--- अनेक भाषाभिज्ञ.
linguistic लिंग्विस्टिक् a.--- भाषाविषयक, भाषाशास्त्रविषयक.
linguistics लिंग्विस्टिक्स् n.--- मानव-भाषा-शास्त्र. पहा: ‘Philology’.
lining लाइनिंग् n.--- अस्तर, आतून मढवणे.
link लिंक् v.t.--- जोडणे, अडकवणे. n.--- काडी, संबंध, मशाल.
linkage लिंकेज् n.--- लागाबांधा, अनुबंध.
linkboy लिंक्बॉय् n.--- मशालजी, दिवट्या.
linseed लिन्सीड् n.--- जवस, आळशी, तागाचे बी.
linstock लिन्स्टॉक् n.--- तोडा, बत्ती.
lintel लिंटल् n.--- (दारावरची) कपाळपट्टी / तोरण. भिंतीतील दार, खिडकी आदि छिद्रांवरील भार पेलणारी व छाया करणारी बांधीव पट्टी / पट्ट. कपाळपट्टी.