Vet-Vig

Vetch व्हेच् n.--- हुलगा, कुळीथ (वेल / त्याची शेंग / त्याचे धान्य).
Veteran व्हेटरन् a.--- वापरलेला, जुना, वहिवाटलेला.
Veterinarian व्हेटरिनेरिअन् n.--- -चा पडताळा घेणे, पडताळणे.
Veterinary व्हेटरिनरि a.--- जनावरांच्या वैद्यकीचा.
Veto व्हीटो v.t.--- मनाई करणे. n.--- मनाई. (होऊ घातलेल्या) निर्णयास / कारवाईस नकारण्याचा / फेटाळण्याचा विशेषाधिकार.
Vex व्हेक्स् v.t.--- त्रासविणे, मनस्ताप देणे.
Vexation व्हेक्सेशन् n.--- मनस्ताप, त्रास.
Vexed a.--- तापदायक, त्रासदायक.
Viand व्हायण्ड् n.--- पदार्थ, पक्वान्न, मिष्टान्न, खाद्य.
Vibrancy व्हाय्ब्रन्सी n.--- कंपनाशीलता; चैतन्य.
Vibrate व्हाय्ब्रेट् v.i.--- लटलट कापणे, झोके खाणे.
Vibration व्हाय्ब्रेशन् n.--- कंप, झोका.
Vibratory व्हाय्ब्रेटरी a.--- ‘Vibration’ चा /-संबंधीचा.
Vicar विकर् n.--- ख्रिस्ती धर्माचा ग्रामोपाध्याय (पॅरिश या छोट्या ग्रामीण क्षेत्रावर धार्मिक अधिकार असलेला). (ईश्वर इ. चा) प्रतिनिधि, मुखत्यार.
Vice व्हाइस् (also ‘vise’) n.--- दोष, दुर्व्यसन, दुराचरण, दुर्गुण, अधर्म. वस्तु आवळून धरण्यासाठी चिमट्यासारखे यंत्रांग. prep.--- ऐवजी. ‘उपि / ‘प्रति’ अशा अर्थाचा उपसर्ग.
Vicenary व्हिसिनेरि a.--- विसाचा.
Viceroy व्हाइसरॉय् n.--- राजप्रतिनिधी.
Vicinity व्हिसिनिटि n.--- जवळचा / शेजारचा प्रदेश.
Vicious व्हिशस् a.--- दुर्गुणी, दुराचारी, अवगुणी. दुष्ट, खोडसाळ.
Vicissitude व्हिसिसिट्यूड् n.--- आळीपाळी, अनुक्रम, फेरफार. स्थित्यंतर, अवस्थांतर.
Victim व्हिक्टिम् n.--- बळी, यज्ञ-पशु. छळ / फसवणूक इ. चे लक्ष्य, भक्ष्य.
Victor व्हिक्टर् n.--- विजयी, जिंकणारा.
Victoria व्हिक्टोरिया n.--- चार चाकांची बसण्यासाठी उंच आसने असलेली सरकत्या छताची घोडागाडी. बगी.
Victorious व्हिक्टोरिअस् a.--- विजयी, जयप्रद.
Victory व्हिक्टरि n.--- जय, फत्ते, विजय.
Victual व्हिट्ल् n.--- जीवनावश्यक पदार्थ-समूह.
Victuals व्हिटल्स् n.--- अन्नपदार्थ. नित्योपयोगी पदार्थ / सामान.
Vide व्हाइडी v.t.--- पहा. (वाचकाचे अन्य संदर्भाकडे लक्ष वाढणारा शब्द).
View व्ह्यू v.t.--- पाहणे, विचार करणे. n.--- अवलोकन, उद्देश, विचार, देखावा, टप्पा, समज.
Vigil व्हिजिल् n.--- जागृति, जागरण.
Vigilance व्हिजिलन्स् n.--- सावधगिरी.
Vigilant व्हिजिलन्ट् a.--- जागा, सावध, हुशार.
Vigilante व्हिजिलाण्टे n.--- (अमेरिकेतील) व्हिजिलन्स कमिटीचा सदस्य, सतर्कता अधिकारी, गुप्तचर, हेर. गुन्हेगारी कायद्याची चिकित्सा करीत न बसता दडपून टाकण्याच्या तत्वाचा.
Vigilantism व्हिजिलाण्टिझम् n.--- कायद्याची (फार) फिकीर न करता दुष्टप्रवृत्तींचा कठोर शासन पुरस्कारणारी पद्धति / तत्वज्ञान.
Vignette व्हिनेट् n.--- शोभेसाठी काढलेले नक्षीकाम. (पुस्तकाच्या शेवटी घातलेला छोटा) नक्षीकामाचा ठसा; ढोबळपणे ओळख पटविणारे चित्र.
Vigour व्हिगर् n.--- कुवत, धमक, उत्साह, तेज, दम, उत्थान.
Vigorous व्हिगरस् a.--- जोमदार, धमक असलेला, दमदार.