sphere स्फीअर् n.--- गोल, वर्तुळ, इलाखा, आटोका, गोलपिंड.
spherical स्फेरिकल् a.--- वर्तुळाकार, ग्रहाचा, गोलपिंडाकार, कंदुकाकार, बिंबाकार.
spheroid स्फिरिआॅइड् a.--- अंडगोल, गोलकल्प, चपटा.
spice स्पाइस् n.--- लवंगा / मिरे वगैरे मसाला, लज्जत.
spic(k)-and-span स्पिक्-एन्-स्पॅन् a.--- अत्यंत स्वच्छ, चकचकीत, लखलखीत, लख्ख.
spicy स्पाय्सी a.--- खमंग, चटकदार, मजेदार, लज्जतदार, रोचक, मनोवेधक. दुर्वर्तनाकडे / अनैतिकतेकडे / अपवादात्मकतेकडे झुकणारा. = Lively (पहा).
spider स्पाइडर् n.--- कोळी, कातीण, सुटेरा.
spiel श्पील् / स्पील् n./v.--- शब्दावडंबर / माजवणे. वल्गना / करणे.
spike स्पाइक् v.t.--- खिळा वगैरे ठोकणे. -ला खिळा(/खिळे) ठोकणे. -ला खिळ्याने ठोकणे. -ला निकामी / निष्फल / स्तंभित करणे. (साधे पेय इ.) -मध्ये मादक द्रव्य मिसळणे. n.--- खिळा. Spike (one’s) guns --- (शत्रूच्या) शस्त्राला खिळे मारून निकामी करणे. (एखाद्याची) योजना हाणून पाडणे / बिघडविणे.
spikenard स्पाइक्नार्ड् n.--- एक वनस्पतिज सुगंधी द्रव्य.
spill स्पिल् v.i.--- सांडणे, लवंडाने, उलंडणे, हिसळणे. Spill the beans --- (सत्य, वस्तुस्थिति, गूढ) प्रकट करणे, उघड करणे.
spin स्पिन् v.t.--- सूत काढणे, चाकावर धरणे. n.--- सूत काढण्याची क्रिया. फिरण्याची क्रिया, चक्कर, शर्यत, सुतांत परिवर्तित करणे. फिरकी, विचार, स्थिति इ. ला दिलेली विशिष्ट दिशा / कलाटणी / अर्थच्छटा.
spin-off स्पिन्-ऑफ् n.--- (एखाद्या कारणातून) निघणारे (दुय्यम) कार्य / परिणाम.
spin-doctor स्पिन्-डॉक्टर् n.--- = spinmeister.
spienmeister अनुकूल प्रचार / प्रसिद्धि देणारा (व्यावसायिक). (White House spinmeisters were closely monitoring the ‘disgust factor’ which sould force Clinton out of office.)
spinach स्पिनिज् / स्पिनिच् n.--- पालक (पालेभाजी).
spine स्पाइन् n.--- काटा, पाठीचा कणा.
spinmeister
spinning wheel स्पिनिंग् व्हील् n.--- चरखा.
spinny स्पिनी n.--- राई.
spiny स्पाइनी a.--- काट्यासारखी, कांटेरी.
spiracle स्पिरॅकल् n.--- उछ्वास, उसासा.
spiral स्पायरल् a./n.--- एका केंद्राभोवती / आसाभोवती बाजूस / वर / खाली गुंडाळत, वाढत / घटत फिरत गेलेला (बिंदुपथ). अशा गुंडाळीच्या आकाराचा, असा वळसेदार, अशी गुंडाळी, असा वळसा. सतत वाढत जाणारी वाढ / घट. v.i.--- ‘Spiral’ समान वाढणे / घटणे. पहा : ‘Helix’, ‘Helical’.
spire स्पायर् n.--- नागमोड, सुळका, पात, निमुळता बुरूज/ मनोरा (विशेषतः एखाद्या चर्चच्या छपरावरील)
spirit स्पिरिट् n.--- आत्मा, भूत, प्रकृति, तत्व, सार, हिम्मत, दारू.
spirited स्पिरिटेड् p.p.a.--- हिम्मतवान, आवेशी.
spiritless स्पिरिट्लेस् a.--- पोचट, निःसत्व, फिका, अळणी.
spiritual स्पिरिच्युअल् a.--- पारमार्थिक, अध्यात्मिक.
spirituous स्पिरिच्युअस् a.--- अमली, जलाल, तीव्र.
spirt स्पर्ट् n.--- चिळकांडी, उत्क्षेप, निकराचा प्रयत्न / झेप, चिळकांडीच्या रूपाने उडणे; वेगाची झेप घेणे, निकराचा प्रयत्न करणे.
spit स्पिट् v.t.--- थुंकणे, मुळावर घालणे. n.--- पिंक, लाळ. जलाशयांत गेलेला जमिनीचा सुळका, भुजिव्हा.
spite स्पाइट् n.--- दावा, कपट, डाव, चुरस, डंश, द्वेष, आकस. v.t.--- दाव्याने त्रास देणे, (खोडसाळपणाने) छळणे. In spite of : (विशिष्ट स्थिती-) चे अस्तित्व असूनही (तीस न जुमानता). = ‘Not withstanding’.
spiteful स्पाइट्फुल् a.--- दावेकरी, अकशी, खुनशी. दुष्ट, द्वेषपूर्ण, दुर्भावनायुक्त. v.--- To cut off one’s nose to spite one’s face --- दुष्ट वा सूडबुद्धीच्या वागणुकीपायी स्वतःचे नुकसानही पतकरणे. आपले नाक कापून दुसऱ्यास अपशकुन करणे.
spittle स्पिटल् n.--- थुंकी, लाळ, पिंक. कीटकांच्या शरीरातून येणारा फेसाळ पाझर, (छोटे) खोरे / कुदळ. v.--- ‘Spittle’ ने खणणे.
spittoon स्पिटून् n.--- थुंकण्याचे भांडे, पिकदाणी.