cord-corr

cord कॉर्ड् v.t.--- दोरी बांधणे. n.---दोरी, चऱ्हाट, नाडा.
cordage कॉर्डेज् n.--- दोरखंड, दोराडी.
cordial कॉर्डिअल् a.--- हार्दिक, हृदयास उल्हास/उत्तेजन देणारा, मनःपूर्वक, प्रेमाचा. n.--- उत्तेजक औषधे.
cordiality कॉर्डिआलिटि n.--- निष्कपटपणा, प्रेम.
cordon कॉर्डन् n.--- कंगोरा, शिपायांची रांग/गराडा.
core कोअर् n./a.--- महत्वाचा (अंश/भाग/प्रकार), सखोल, गहन (अंश/भाग/प्रकार), गाभा, गर्भ, अंतराभाग, मगज.
coriander कॉरिअॅन्डर् n.--- कोथिंबीर, धणा.
cork कॉर्क् n.--- बूच, बुटणे, दट्टा. v.t.--- बूच बसविणे.
corkscrew कॉर्क्स्क्रू n.--- बूच काढण्याचे साधन.
corn-chandler कॉर्न्-चॅन्ड्लर् n.--- भुसारी, गल्लेकरी.
corn-cob कॉर्नकॉब् n.--- मका इ. चे कणीस.
cornea कॉर्निआ n.--- डोळ्याच्या बाहुलीवरचा पारदर्शक पडदा.
corner कॉर्नर् n.--- कोपरा, कोन.
cornet कॉर्नेट् n.--- शिंग.
cornice कॉर्निस् n.--- कंगोरा, कंगणी, भिंत इ. बांधकामाच्यावरच्या टोकास केलेली शोभेची कडा/थर.
cornucopia कॉर्न्यू(काँज्यु)कोपिया n.--- धान्यफलादिकान्नी भरून वाहणारे बकऱ्याचे शिंग/त्या आकाराचे भांडे. समृद्धि, वैपुल्य (चिन्ह).
corny कॉर्नी a.--- धुंद, झिंगलेला, नशा चढलेला.
corolla कॉरोला n.--- पुष्पदल, पुष्पाचे बाह्यगुंठन.
corollary कोरॉलरि n.--- उपसिद्धांत, आनुषंगिक गोष्ट.
coronary कॉरनरी a.--- हृदयाच्या प्रमुख रक्तवाहिन्याशी संबंधित. हृदयाचा, हृदयविषयक. Coronary thrombosis कॉरनरी थ्रोम्बॉसिस n.--- हृदयातील रक्तवाहिनीतील रक्तगुठळीमुळे होणारा ह्रुदयविकार.
coronation कॉरोनेशन् n.--- राज्याभिषेक, पट्टाभिषेक.
coroner कॉरोनर् n.--- अपमृत्यूची चौकशी करणारा अधिकारी.
coronet कॉरनेट् n.--- बडे लोकांचा मुगुट, शिरोभूषण, डोक्यावर घातलेली फुलांची किंवा मोत्यांची माळ, उमराव किंवा त्याच्या पत्नीचा छोटा मुकुट.
corporal कॉर्पोरल् n.--- फौजेतील नाईक/सैनिक. a.--- शरीरसंबंधी, शरीराचा, शारीरिक.
corporate कॉर्पोरेट् a.--- कायदेशीर बनलेली, सामुदायिक.
corporation कॉर्पोरेशन् n.--- अधिकृत मंडळ.
corporeal कॉर्पोरिअल् a.--- शारीरिक, दैहिक, आंगिक.
corps कॉर्/कोर् n.--- पळटण, तुकडी, संघ, मंडळ. (अ.व. ‘corps’)
corpse कॉर्प्स् n.--- प्रेत, मढे, मुडदा, शव.
corpulency कॉर्प्युलेन्सि n.--- ढमालेपणा, मेद, स्थूलपणा.
corpulent कॉर्प्युलेंट् a.--- अंगाने स्थूल, ढमाल.
corpus कॉ(र्)पस् n.--- देह, शरीर, रचना; वस्तूचा मुख्य भाग. pl. Corpora/Corpuses) विशिष्ट लेखकाच्या/विशिष्ट विषयावरील समग्र साहित्यसंग्रह. कोणत्याही गोष्टींचे प्रधानांग/मुख्यांश. मुलधन, मुद्दल, मुख्य/मूल भांडवल, विशिष्ट देहांगाची रचना.
corpus delicti कॉ(र्)पस् डेलिक्टाय् n.--- अपराधाचा सारभूत भाग, गुन्ह्याचा मथितार्थ.
corpuscle कॉर्पसल् n.--- सूक्ष्म कण/पेशी.
correct करेक्ट् v.t.--- शुद्ध करणे, शिक्षा करणे. a.--- शुद्ध, नीट, दुरुस्त, बरोबर.
correctness करेक्ट्नेस् n.--- ठीकपणा, दुरुस्तपणा.
corrector करेक्टर् n.--- सुधारणारा, शोधणारा.