Concave कॉन्केव्ह् a.--- अंतर्गोल, कमानदार.
Concavity कॉन्केव्हिटि n.--- अन्तर्गोलता, गोल पोकळी.
Conceal कन्सील् v.t.--- झाकणे, लपवून ठेवणे, छपवणे.
Concealment कन्सील्मेंट् n.--- गुप्तता, झांकणे, छपवणी.
Concede कन्सीड् v.t.--- कबूल करणे, सोडणे, देणे.
Conceit कन्सीट् n.--- कल्पना, भावना, अहंपणा, घमेंड.
Conceive कन्सीव्ह् v.t.--- समजणे, बोध होणे, कल्पिणे, मनात विचार/कल्पना आणणे/धारण करणे/उत्पन्न करणे. v.i.--- गर्भधारणा करणे, ध्यानात येणे.
Concentrate कान्सेन्ट्रेट् v.t.--- एकत्र करणे, एकाग्र करणे.
Concentrical कान्सेन्ट्रिकल् a.--- समकेंद्र, एककेंद्र.
Concept कॉन्सेप्ट् n.--- मनांत आणलेला/आलेला विचार. मनांत आलेली/केलेली कल्पना (विशे. विविध गोष्टींवरून नावारूपास आलेल्या सामान्य गोष्टीची), अशा कल्पनेचे/विचाराचे विशिष्ट नांव.
Conception कन्सेप्शन् n.--- गर्भधारणा, समज, कल्पना; मनांत विचार/कलपना करण्याची/आणण्याची/येण्याची प्रक्रिया. = concept.
Conceptual a.--- ‘concept’ च्या संबंधीचा/स्वरूपाचा.
Conceptualize v.t.--- - ला ‘concept’ चे रूप देणे, ;’concept’ मध्ये परिणत करणे, -चे (विशेष कल्पना/विचार म्हणून) नामाभिधान करणे.
Concern कन्सर्न् v.t.--- संबंध असणे, काळजी असणे. n.--- काळजी, संबंध, काम, खटला.
Concerning कन्सर्निंग् prep.--- संबंधी, विषयी.
Concert कॉन्सर्ट् v.t.--- एकविचाराने मसलत करणे, संगनमत करणे. n.--- एकविचार, एकोपा, मेळ, संयोग.
Concerto कॉन्सर्टो n.--- स्वररचना, वाद्यसंगीतरचना, संगीतकृति.
Concerted कन्सर्टेड् a.--- मिळून/एकमताने/संगनमताने केलेला/योजिलेला. संभूयकृत.
Concession कन्सेशन् n.--- कबुली देणे, सोडणे, सवलत, सूट, अनिच्छेने/निरुपायाने दाखविलेला आदर/राखलेला मान/घेतलेली दखल/दिलेली किंमत.
Conch कॉन्च् n.--- शंख.
Conchology कॉन्कॉलाजि n.--- शंखशास्त्र, शंखविद्या.
Concierge कॉन्सिअर्ज् n.--- वसतिगृह, विश्रामगृह इ. मधील रहिवाशांना मदत करणारा कामगार/द्वारपाल/चौकीदार.
Conciliate कन्सिलिएट् v.t.--- मिळवून देणे, अनुकूल करणे, मनधरणी करणे, वळवणे.
Conciliation कन्सिलिएशन् n.--- मनधरणी, आराधना.
Conciseness कन्साइझनेस् n.--- संक्षेप .
Conclave कॉन्क्लेव्ह् n.--- खासगी सभा, बैठक.
Conclude कन्क्ल्यूड् v.t.---समाप्त करणे, निश्चय करणे, तर्काने काढणे, अनुमान काढणे/करणे. v.i.--- आटोपणे, संपणे.
Concluding कन्क्ल्यूडिंग् a.--- अखेरचा, सरता.
Conclusion कन्क्ल्यूझन् n.--- अहेरी, अवसान, उपसंहार, अनुमान, सिद्धांत.
Concoct कॉन्कॉक्ट् v.t.--- पकवणे, संगनमत करणे, खोटे बनवणे.
Concoction कॉन्कॉक्शन् n.--- पचवणे, पाक, परिपाक.
Concomitance कंकॉमिटन्स् n.--- सह-अस्तित्व, साहचर्य.
Concomitant कॉन्कॉमिटन्ट् a./n.--- सहचारी, सहवृत्ति (गोष्ट).
Concord कॉन्कॉर्ड् n.--- एकी, एकोपा, मिलाफ, स्वरांचा मेळ, अन्वय.
Concordant कॉन्कॉर्डन्ट् a.--- सम, मिलाफ़ाचा.
Concourse कॉन्कोर्स् / कॉङ्को(र्)स् n.--- जमाव, मेळा, गर्दी. मोठा जनसमुदाय एकत्र येण्याची/मोठ्या गर्दीची जागा. (Each aspect of the airport security, including ‘perimeter area to the concourse’, neds to be checked.) (North Block is keen on implementing a concourse security plan.) (The incident at Moscow’s Domodevo airport brought the focus on the concourse area of the airport, namely, the departure and arrival terminals.)