fluctuate फ्लक्चुएट् v.i.--- हेलकावे खाणे, गुटमळणें.
fluctuation फ्लक्चुएशन् n.--- (आर्थिक व्यवहार इ. मधील) चढउतार, फेरफार, फेर-बदल.
flue फ्ल्यू n.--- धुराडे, v.t.--- चढउतार होणे, कमीजास्त होत राहणे.
fluency फ्ल्यूएन्सी n.--- वाणीचा/ जिभेचा चपळपणा, सरळपणा, बोलकेपणा.
fluent फ्ल्यूएण्ट् a.--- वाणीचा सरळ, चपळ, सुरळीत.
fluff फ्लफ् n.--- मऊ, लव - पर, बारीक तुकडे, कपटे इ. चा केर-कचरा, समूह / पुंज.
fluffy फ्लफी a.--- मऊ-लव-दार, मऊ-केसांचा.
fluid फ्ल्यूइड् n.--- पातळ पदार्थ. a.--- पातळ, प्रवाही.
fluke फ्लूक् n.--- योगायोगाने सफल/ यशस्वी/ लागू झालेला धक्का/वार/मार/फटका; अनपेक्षित यश/नशीब/अनुकूल परिणाम.
flummery फ्लमरि n.--- कांजी, आंबील, लापशी.
flummox फ्लमक्स् v.i.--- पूर्ण गोंधळवून टाकणे/ गडबडविणे; हतबुद्ध होणे, हात टेकणे.
flunky फ्लंकि n.--- हुजऱ्या, हांजीहांजी करणारा, (गणवेशातील) सेवक, मूर्ख कुडबुड्या माणूस.
fluoride फ्लूअराइड् n.--- ‘Fluorine’ चे संयुग.
fluorine फ्लूअरीन् / फ्लॉरीन् n.--- फिकट पिवळ्या वायुरूपांत असलेले एक विषारी मूलद्रव्य. (रासायनिक चिन्ह F)
flurry फ्लरि v.t.--- गडबड धांदल करणे. n.--- धांदल, गडबड, झटकारा, अल्पवृष्टी, घाई (गर्दी ), लगबग.
flush फ्लश् v.t. & v.i.--- तांबडा लाल करणे, भडाभड वाहणे, चढवणे. n.--- लोंढा, ऊत, वेग, उकळी, विकाराने आलेली तोंड भर /वरची लाली. a.--- टवटवीत, उदार, श्रीमंत, उधळ्या, सतेज, विपुल.
fluster फ्लस्टर् n.--- तप्तता, गडबड, गोंधळ, क्षोभ. v.i.--- क्षुब्ध होणे / करणे, हडबडणे / हडबडविणे, गोंधळून जाणे/ टाकणे.
flute फ्लूट् n.--- मुरली, पावा, खांचणी.
fluter फ्लूटर् n.--- पावा वाजविणारा.
flutter फ्लटर् v.t.--- धडपडणे, पंख झाडणे, घोटाळ्यात पडणे. v.t. & v.i.--- फडफड (वि)णे, फडक (वि)णे, थरार (वि)णे, भरकट(वि)णे, भरकटत राहणे, बागडणे, दिमाखात/ ऐटीत/ गर्वाने फिरणे. n.--- फडफड, गडबड, कोलाहल, गोंधळ, धांदल, खळबळ, ताडफळ, खळबळ.
flux फ्लक्स् n.--- वाहन, प्रवाह, सातत्याने चालणारा फेर बदल/ घडामोड/ विकार-/ परिणाम-/ -प्रक्रिया.
fly फ्लाय् v.i.--- उडणे, उड्डाण करणे, वायुमार्गाने जाणे; (विमान ) चालविणे; फडकणे, फडकविणे, वेगाने जाणे. Fly high v.i.--- मोठ्या प्राप्तीसाठी प्रयत्नात राहणे, fly low v.i.--- मोठेपणाची अपेक्षा.
foal फोल् v.i.--- प्रसवणे, विणे. n.--- शिंगरू, शिंगा. See: ‘ colt ‘, ‘filly’
foam फोम् v.i.--- फेसालणे. n.---फेंस, फेण.
fob फॉब् n.---खिशात ठेवायच्या घडाळ्याची साखळी. छोटा कप्पा/खिसा. उठावदार मोठे पदक. v.t.--- खऱ्यासारखी दिसणारी पण कमी मोलाची नकली वस्तू दाखवून फसविणे / ठकविणे.
fob off फॉब् ऑफ् (क्वचित् with सह) v.i.--- लबाडीने/ फसवून / (खोटी) सबब सांगून वाटेस लावणे/ दूर करणे.
focus फोकस् n.--- केंद्र, मध्य, किरण जमण्याचे स्थळ, एकाग्र-स्थिति. v.t.--- केंद्रस्थानी आणणे, एकाग्र करणे.
fodder फॉडर् n.--- वैरण, चारा. v.t. --- वैरण घालणे.
foe फो n.--- वैरी, शत्रू.
foetal फीटल् a.--- ‘Foetus’ चा / विषयक
foeticide फीटिसाइड् n.--- भ्रूण हत्या, गर्भस्थ (पूर्ण वाढलेल्या) बालकाची हत्या.
foetus फीटस् n.--- भ्रूण, (पूर्ण वाढलेला) गर्भ =Fetus माणसात ८/३ महिन्यापासूनचा.
fog फॉग् n.---धुके. Fog Bank फॉग् बँक् --- धुक्याचे पटल.
fogey फोगी see Foggy a.
foggy फॉगी a.--- धुक्याने भरलेला /युक्त, अंधुक, अस्पष्ट, झाकोळलेला. n.--- वृद्ध/वयातीत माणूस, जुनाट पारंपरिक मनुष्य, दुड्ढाचार्य, वृद्ध धेंड.
fogy फोगी see Foggy a.
foible फॉलिबल् n.---उणे, वर्म, व्यंग, कमीपणा उणीव, दोष.
foil फॉइल् v.t.--- मोडने, चालेनासा करणे. n.--- मोड, पराभव, वर्ख, पत्रा, कोंदण, चमक आणणारा/ शोभा वाढविणारा पदार्थ.
foist फॉइस्ट् v.t.--- खुपसणे, घुसडणे.
fold फोल्ड् v.t.--- घडी करणे, दुमडणे, दुमटणे, (हात) जोडणे, आलिंगिणे, आच्छादणे. n.--- घडी, चुणी, पदर, गिरी,गुण, पट, पापुद्रा, कोंडवाडा, मेंढवाडा.
foliage फोलिएज् n.--- पाने, पालवी, पल्लव, पाला.
folio फोलिओ n.--- दुबंदी कागद-पान.
folium फोलिअम् n.--- पर्ण, पत्र.
folk फोक् n.--- अलमदुनिया, लोक, जनसमूह, आमजनता.
folklore फोक्लोSर n.--- लोकसाहित्य, दंतकथा किंवा त्यांचा अभ्यास.
follow फॉलो v.t. & v.i.--- मागून जाणे, अनुसरणे, पाठीस लागणे, प्रमाण मानणे, निष्पन्न होणे.
follower फॉलोअर् n.--- अनुकरण करणारा, अनुयायी.
following फॉलोइंग् n.--- अनुगमन, अनुसरण.
follow up फॉलो अप् (पुढे चालू) v.t.---० च्या बाबत पुढे विचारणा/ पूरक वा आनुषंगिक कार्य/ पाठपुरावा चालू ठेवणे/करणे, अनुधावन करणे. (n./a.) (विशिष्ट कार्यपूर्तीनंतर चालू ठेवलेली पुढील विचारणा / पूरक वा आनुषंगिक काम/पाठपुरावा (- यांविषयक), अनुधावन.
folly फॉली n.--- मूर्खपणा, वेडेपणा, बेवकूबी.
foment फोमेंट् v.t.---शेकणे, शेक देणे, फूस देणे, गरम/औषधी द्रवाने भिजवून काढणे/ शेकणे, चेतविणे, उत्तेजन देणे (विशे. वाईट गोष्टींस ).
fomentation फोमेंटेशन् n.--- ओला/ औषधी शेक, उत्तेजन, चेतना, फूस.
fond फॉण्ड् a.--- शोकी, लपट, नादी, ममताळू, लडिवाळ, आसक्त, प्रेमयुक्त. To be fond of… ०ची आवड असणे. (आवडणे). a.--- आवडीचा, प्रिय (मत इ.)
fondle फॉण्डल् v.t.--- कुरवाळणे, गोंजारणे, लाड करणे.
fondness फॉण्ड्नेस् n.--- शोक, प्रीति, लळा, आवड.
fondling फॉण्ड्लिंग् n.--- लाड, लडिवाळपणा, लाडावलेला.
fons et origo फोन्झ् एट् ओरायगोो (=source and origin) मुळकारण, मूळ.
font फॉण्ट् n.--- झरा, कारंजे. उगम, स्रोत (=Fount) ( ख्रिश्चन धर्म संस्कारार्थ वापरायचें ) तीर्थपात्र, दिव्याचे तैलपात्र. मुद्रण-/टंकन -तंत्रातील मुद्रण-/टंकन- चिन्हांचा, विशिष्ट रूप व आकार यांवर आधारित, प्रकार. अशा एका विशिष्ट प्रकारच्या चिन्हांचा संच (=Fount)