ses-sha

sesame सेसमी n.--- तीळ, तिळाचे झाड (शास्त्रीय नाव : Sesamum indicum). Open sesame --- १. ‘तिळा तिळा दार उघड’ हे गुहेचे दार उघडण्याचे सांकेतिक वचन / मंत्र. २. अवघड गोष्ट साध्य करण्याची सोपी युक्ति / साधन.
session सेशन् n.--- चौकशीकरिता कोर्टाची बैठक.
set सेट् v.t.--- ठेवणे, रोवणे, सांधणे, गोठविणे, मांडणे, कोंदणे, बसविणे, नेमाने, किंमत देणे, पाजवणे. n.--- अस्त, शेवट, जम, रचना. set at --- कामास जुंपणे. set apart --- निराळे करणे. set aside --- रद्द करणे. set before --- दाखवणे. set down --- खाली ठेवणे. set off -ला उठाव आणणे, शोभा आणणे, -ला उत्कटता आणणे. -ला -च्या बदल्यांत (agianst) असल्याचे मापणे. चालू करणे, आरंभिणे, मांडणे. यात्रा इ. प्रारंभिणे. -चा विस्फोट करणे, उडवून देणे. set over --- वर नेमणे. set up --- उभारणे. Set upon --- -वर हल्ला चढविणे / तुटून पडणे.
seton सेटॉन् n.--- पोत, वात.
settee सेट्टी n.--- बांक, मंचक.
settle सेटल् v.t.--- निवाडा करणे, नियम करणे, स्थिरावणे, निवळणे, सोईस लावणे, घटणे, फेडणे, तोडणे.
settlement सेटल्मेन्ट् n.--- ठराव, स्थिरस्थावर, निवाडा.
seven सेव्हन् a. & n.--- सात. Seventh --- सातवा.
seventeen सेव्हन्टीन् a. & n.--- सतरा.
seventy सेव्हन्टि a. & n.--- सत्तर.
sever सेव्हर् v.t.--- तोडणे, वेगळा करणे.
several सेव्हरल् a.--- कित्येक, एकेक, वेगवेगळे. n.--- अनेक.
severally सेव्हरलि ad.--- पृथक् पृथक्.
severe सिव्हिअर् a.--- कडक, जालीम, उग्र, फार.
severity सिव्हिरिटि n.--- कडकपणा, तीव्रता, उग्रता.
sew सो v.t.--- शिवणे, शिवून बंद करणे, दोरा घालणे .
sewage सूइज् n.--- मैला, घाण, सांडपाणी.
sewer स्यूअर् n.--- नाला, गटार, सांडपाणी वाहून नेणारा नळ किंवा पाट, मोरी.
sewerage स्यूअरेज् n.--- सांडपाणी वगैरे वाहून नेण्याची व्यवस्था.
sex सेक्स् n.--- कामेच्छा, कामवेग. मैथुन, संभोग, कामक्रीडा.
sexton सेक्स्टन् n.--- घंटी वाजविणारा / थडगी खोदणारा चर्चचा अधिकारी.
sexual सेक्शुअल् / सेक्स्युअल् a.--- स्त्रीपुरुषभेदाचा, स्त्रीपुरुषसंबंधी, मैथुनसंबंधी.
sexuality सेक्स्युअॅलिटी / सेक्श्युअॅलिटी n.--- लैंगिक / कामविषयक शारीरिक / मानसिक घडण / अवस्था / वासना / भावना / वर्तन. लैंगिकता, कामुकता.
shabby शॅबि a.--- भिकार, पाजी, जुनापाना.
shack शॅक् n.--- कच्च्या बांधणीचे घर, झोपडी, खोपट, कुटी, झुग्गी.
shackle शॅकल् v.t.--- बेडी / मोडा घालणे, बंधन करणे. n.--- बेडी.
shade शेड् v.t.--- छाया करणे. n.--- छाया, सावली, काळोख, पडदा.
shadiness शेडिनेस् n.--- सावली, सावट, छायायुक्तता.
shadow शॅडो n.--- प्रतिबिंब, कवडसा, छाया, आश्रय. v.t.--- छाया करणे, रक्षण करणे, पाठलाग करणे, निस्तेज करणे.
shadowy शॅडोई a.--- छायेचा, छायायुक्त.
shady शेडि a.--- सावलीचा, छायेचा, छायामय; मालिन, कलंकित.
shaft शॅफ्ट् n.--- दांडा, मूठ, बाण, धुरी, शंकु.
shaggy शॅगि a.--- झिपऱ्या असलेला, झिपऱ्या, केसाळ. पुंजकेदार, पुंजयुक्त.
shahtoosh शाटूष् n.--- तिबेटांतील चिरु (Chiru) जातीच्या हरिणाच्या अंगावरील अतिशय तलम व उबदार लोकर.
shake शेक् v.t.--- हालवणे, धैर्य, खचवणे, कापणे, झाडणे, सटकणे, डुलणे. n.--- कॅम्प, आंदोलन, गिरकी, हिंदळा, धक्का, हिसका, झटका.
shall शॅल् v. (aux) --- भविष्यकाळ दाखविणारे साहाय्य क्रियापद.
Shallow शॅलो a.--- उथळ. Shallow brained --- उथळ बुद्धीचा.
shallowness शॅलोनेस् n.--- उथळपणा.
sham शॅम् v.t.--- ढोंग करणे. a.--- ढोंगाचे. n.--- ढोंग.
shambles शॅम्बल्स् n.--- खाटीक लोकांचा बाजार, कत्तलखाना.
shambolic शॅम्बॉलिक् a.--- पूर्ण गोंधळाचा / बट्टयाबोळाचा. (By directing her party to boycott this year’s (2010) elections in Myanmar, Aung san Suu Kyi has called the bluff of shambolic exercise.)
shame शेम् n.--- लाज, शरम, अपमान. v.t.--- लाजविणे.
shame faced शेम् - फेसेड् a.--- ;लाजाळू.
shameful शेम्फुल् a.--- लाजिरवाणे.
shameless शेम्लेस् a.--- निर्लज्ज.
shampoo शॅम्पू v.t.--- रगडणे, चेपणे. (जुना अर्थ). धुणे / -ला स्वच्छ करणे (विशे. केस, गालिचा, इ.). n.--- चंपी.
shanghai शँघाय् v.t.--- (गुंगी आणणाऱ्या औषधाने वा अन्यथा) बेशुद्ध / बेहोश करणे व नियंत्रणात ठेवणे.
shangri-la शँग्रिला n.--- (तिबेटी शब्द) दूर अज्ञात स्थळींचा परिपूर्ण जीवनाचा देश, ‘नंदनवन’, ‘स्वर्गभूमी’, ‘स्वर्ग.
shank शॅङ्क् n.--- पायाच्या हाडाची नळी, तंगडी.
shape शेप् v.t.--- बनवणे, आकार देणे. n.--- आकार, डौल.
shapeless शेप्लेस् a.--- बेडौल.
shapely शेप्ली ad.--- डौलदार, ठाकठीक.
shard शा(र्)ड् n.--- खापर, कवची.
share शेअर् v.t.--- चाटणे, विभागणे. n.--- वांटा, विभाग.
sharecropper शेअरक्रॉपर् n.--- पिकाचा एक भाग भाडं म्हणून देणारा भाडेकरू शेतकरी, खंडकरी.
share holder शेअर् होल्डर् n.--- हिस्सेदार, पातीदार, भागीदार.
shark शार्क् n.--- नक्र. v.i.--- भुरटी चोरी करणे, उपटणे.
sharp शार्प् a.--- चलाख, तिखट, चिमखडा, धूर्त, तीक्ष्ण, धारेचा, पाणीदार, चुणचुणीत. v.t.--- धार देणे.
sharpen शार्पन् v.t.--- धार लावणे.
sharper शार्पर् n.--- उचल्या.
sharpness शार्प्नेस् n.--- तेज, पाणी, हुषारी, कठोरपणा, कटुता.
shatter शॅटर् v.t.--- चुराडा करणे. n.--- तुकडा, चुरा.
shave शेव्ह् v.t.--- तासणे, हजामत करणे, मुंडणे.
shaving शेव्हिंग् n.--- ढलपा, हजामत, कीस.
shawl शॉल् n.--- शालजोडी. v.t.--- शालीने झांकणें.