Oval ओव्हल् a.--- अंड्याच्या आकाराचा, वाटोळा.
Ovary ओव्हरि n.--- स्त्री-/मादी- चा अंडाशय, लिंगाशय, फूल.
Ovate ओव्हेट् a.--- अंडाकृति, लंबगोलाकार.
Ovation ओव्हेशन् n.--- सामूहिक स्वागतोल्लास; सामूहिक वाहवा / गौरवोद्गार, जयजयकार.
Oven ओव्हन् n.--- भट्टी, तवा, उबाऱ्याची जागा.
Over ओव्हर् ad.--- वॉर, वरून. prep.--- वॉर, वरती. Over again --- पुन्हा एकदा. Over against --- समोर. Over and over again --- फिरफिरून, पुनःपुनः.
Overact ओव्हरॅक्ट् v.t.--- अतिशय करणे, अधिक करणे.
Overall ओव्हर्आॅल् ad.--- एकंदरीत, एकूण, ढोबळपणे. a.--- एकूण, वट्ट, सर्व गोष्टी विचारात घेऊन निश्चित केलेला (निर्णय, मूल्यांकन, दृष्टिकोण, इ.), सर्वंकण. n.--- सुरक्षिततेसाठी मुख्य पोषाखावर चढविण्याचा सैल अंगरखा.
Overawe ओव्हरॉ v.t.--- धाक / दाब बसविणे.
Overbalance ओव्हर्बॅलन्स् v.t.--- वजन अधिक होणे. a.--- उपराळा, वर्तावळा.
Overbear ओव्हर्बेअर् v.t.--- वर पगडा बसवणे, दडपणे, दामटणे, -वर दडपण आणणे.
Overboard ओव्हर्बोर्ड् ad.--- गलबतावरून पाण्यात. ‘To go overboard’--- अति-उत्साहाने वाहवत जाणे.
Overcast ओव्हर्कास्ट् v.t.--- आच्छादणे, काळे करणे.
Overcharge ओव्हर्चार्ज् v.t.--- अधिक दर सांगणे.
Overcloud ओव्हर्क्लाउड् v.t.--- ढगांनी आच्छादणे.
Overcome ओव्हर्कम् v.t.--- जिंकणे, जेरीस आणणे, -वॉर ताबा मिळविणे.
Overdraw ओव्हर्ड्रॉ v.t.--- अतिशयोक्ति करणे, पेढीवर असलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम पेढीवरून घेणे / काढणे.
Overdrive ओव्हर्ड्राइव्ह् n.--- यंत्रातील सामान्य सर्वाधिक वेगाहूनहि अधिक वेग देणारी (प्र-)युक्ति. ‘To get into overdrive’ --- अधिकतम शक्तीने झेपावणे.
Overfatigue ओव्हर्फटीग् n.--- अतिश्रम.
Overflow ओव्हर्फ्लो v.t.--- बुडवणे. v.i.--- वरून वाहने. n.--- ऊत, पूर, उसाण, रेलचेल, वाहून जाणे.
Overgrow ओव्हर्ग्रो v.i.--- फार वाढणे.
Overhaul ओव्हर्हॉल् v.t.--- चाळून शोधून पाहणे. n.--- तपासणी, दुरुस्ती.
Overhear ओव्हर्हिअर् v.t.--- कानी पडणे, सहज ऐकणे.
Overheat ओव्हर्हीट् v.t.--- अतिशय तापविणे.
Overjoy ओव्हर्जॉय् n.--- परमानंद, ब्रह्मानंद.
Overkill ओव्हरकिल् v.t.--- -(लक्षया-)स अति / अनावश्यक कडक / जालीम उपायांनी नष्ट करणे. n.--- अतिरेकी, अनावश्यक उपाययोजना.
Overland ओव्हर्लँड् a.--- खुष्कीचा, जमिनीचा.
Overlay ओव्हर्ले v.t.--- दडपणे, मढवून काढणे.
Overleap ओव्हर्लीप् v.t.--- पार जाणे.
Overload ओव्हर्लोड् v.t.--- अति ओझे लादणे. n.--- फार ओझे.
Overlook ओव्हर्लुक् v.t.--- कानाडोळा करणे, पोटात घालणे.
Overly ओव्हर्लि ad--- फार, जादा, अतिशय, मोठ्या प्रमाणात, आत्यंतिक(पणे).
Overmuch ओव्हर्मच् ad.--- अतिशय. a.--- फाजील.
Overnice ओव्हर्नाइस् a.--- फाजील, खंतखोर.
Overpersuade ओव्हर्पर्स्वेड् v.t.--- बळेच समजावणे.
Overplus ओव्हर्प्लस् n.--- शिल्लक, उरवण.
Overpower ओव्हर्पॉवर् v.t.--- पाडाव करणे, धूळघाण करणे, चीत करणे. n.--- बलाढ्य शक्ति.
Overrate ओव्हर्रेट् v.t.--- फाजील किंमत मानणे, अवास्तव महत्व देणे.
Overreach ओव्हर्रीच् v.t.--- तोंडाला पाने पुसणे. Overreach (oneself) अतिलाभा(लोभा-)पायी (आपलेच) नुकसान करून घेणे / आपलेच काम बिघडविणे.
Overrule ओव्हर्रूल् v.t.--- अम्मल चालवणे.
Overrun ओव्हर्रन् v.t.--- व्यापणे, पादाक्रान्त करणे. -च्या पलिकडे जाणे. n.--- अतिक्रम, मर्यादाभंग, उल्लंघन.
Oversee ओव्हर्सी v.t.--- देखरेख करणे, सूत्र हलवणे.
Overseer ओव्हर्सीअर् n.--- देखरेख करणारा.
Overset ओव्हर्सेट् v.t.--- उपडा करणे, उलथणे.
Oversight ओव्हर्साइट् n.--- नजरचूक, उपेक्षा, देखरेख, पर्यवेक्षण, अधीक्षण.
Oversleep ओव्हर्स्लीप् v.t.--- अतिशय झोप घेणे.
Overspread ओव्हर्स्प्रेड् v.t.--- वयापून टाकणे.
Overstate ओव्हर्स्टेट् v.t.--- अतिशयोक्ति करणे, तिखटमीठ लावून सांगणे.
Overstock ओव्हर्स्टॉक् v.t.--- भरपूर बेगमी करणे.
Overt ओव्हर्ट् a.--- उघड, राजरोस, व्यक्त, उघडा.
Overtake ओव्हर्टेक् v.t.--- आटपणे, मिळवणे.
Overtax ओव्हर्टॅक्स् v.t.--- फार ताणणे.
Overthrow ओव्हर्थ्रो v.t.--- पाडाव करणे. n.--- पराभव.
Overtime ओव्हर्टाइम् n.--- ठरलेल्या समयमर्यादेहून अधिक वेळ. अशा वेळांत केलेल्या (अधिक) कामाचा भत्ता (पैशाच्या रूपांत दिलेला मोबदला). अतिकालिक भत्ता.
Overture ओव्हर्चर् n.--- पूर्वरंग, प्रस्तावना, सूचना. समझोता / करार घडवून आणण्यासाठी घेतलेला पुढाकार.
Overturn ओव्हर्टर्न् v.t.--- पालथे करणे, भंग करणे, कलंडविणे, उलटणे, उलटविणे, (निर्णय) फिरविणे (बदलणे).
Overvalue ओव्हर्व्हॅल्यु v.t.--- फाजील किंमत समजणे.
Overween ओव्हर्वीन् v.i.--- पत्राशी / फुशारकी मारणे.
Overwhelm ओव्हर्व्हेल्म् v.t.--- दडपणे, ग्रासणे, लोळविणे, जमिनीस मिळविणे.
Overwise ओव्हर्वाइझ् a.--- अति शहाणा.