Laxative लॅक्सेटिव्ह् n.---
Lay ले a.--- धार्मिक संस्थेतील पुरोहित व्यतिरिक्त कामगार वर्गांतील. कोणत्याही विशेष व्यवसायाचे विशेष ज्ञान नसलेला. सर्वसाधारण / सामान्य जनतेतील. V.t.--- n.--- ‘Lay up’ : दुखापत, आजार, इ. मुळे असमर्थ करणे. परिश्रमाच्या कामातून मुक्त राखून (एकीकडे) ठेवणे. ‘Lay off’ : n.--- नोकरीवरून (तात्पुरते) काढून टाकण्याची कारवाई. बेकारीचा काळ. v.t.--- कामावरून (तात्पुरते) दूर करणे.
Layer (on) लेअर् v.t.--- -ला एकावर एक अंगावर चढविणे. n.--- थर, पडदा, पदर.
Layman लेमन् n.--- अनभिज्ञ/अडाणी गृहस्थ.
Laystall लेस्टॉल् n.--- उकिरडा, खातेरा.
Laziness लेझिनेस् n.--- आळस, सुस्ति, मांद्य.
Lazy लेझि a.--- आळशी, मंद, सुस्त.
LBW/lbw पहा: ‘Leg-before-wicket’.
Lea ली n.--- कुरण, गवताची जमीन.
Leach लीच् v.--- (विरघळलेले द्रव्य) (मिश्रणातून) वेगळे करणे.
Lead लेड् n.--- शिसे (मूलद्रव्य धातू), रासायनिक संक्षिप्त संज्ञा : Pb (Latin ‘Plumbum’ पासून).
Lead लीड् v.t.--- हात धरून नेणे, ओढणे, काढणे, पुढाकार घेणे, गुजारा करणे.
Leaden लेडन् a.--- शिशाचा.
Leader लीडर् n.--- पुढारी, नायक, म्होरक्या.
Leaf लीफ् v.i.--- पाने फुटणे. n.--- पान, वर्ख.
Leafage लीफेज् n.--- पाने, पाला, पालवी, पल्लवी.
Leafstalk लीीफ्स्टॉक् n.--- पानाचा देठ.
Leafy लीफी a.--- पर्णमय, गर्द, दाटपानाचा.
League लीग् n.--- अंतर मोजण्याचे सुमारे ३ मैल / ५ किलोमीटर भरणारे एक माप. गट, संघ, जूट. v.t.--- एकोपा / जूट करणे.
Leak लीक् v.i.--- पाझरणे, गळणे. n.--- पाझर, गळती.
Leakage लीकेज् n.--- पाझर, झर, गळीत.
Lean लीन् v.t. and v.i.--- कलणे, झोक असणे, लवणे, वाकणे, टेकणे. n.--- तांबडे मांस. a.--- पातळ, रोड.
Leanness लीन्नेस् n.--- रोडपणा, क्षीणता, रोडकेपणा.
Leap लीप् v.i.--- उडी मारणे, उडून जाणे. n.--- उडी.
Leapyear लीप्यियर् n.--- ३६६ दिवसांचे वर्ष.
Learn लर्न् v.t.--- शिकणे, समाजाने, अभ्यास करणे.
Learned लर्नेड् p.p.a.--- पढलेला, शिकलेला.
Least लीस्ट् a.--- सर्वांपेक्षा लहान, कनिष्ठ. ad.--- सर्वांहून थोडा. At least - निदान, काही झाले तरी. In the least - अल्पमात्र.
Leather लेदर् n.--- कमावलेले कातडे, सालपट, कातडी, चामडे.
Leave लीव्ह् v.t.--- सोडणे, टाकणे, राहू देणे, स्वाधीन करणे. n.--- सुट्टी, हुकूम, परवानगी. To leave --- सोपविणे. Leave out - गाळणे, वगळणे.
Leaved लीव्ह्ड् a.--- पानांचा, पाने असलेला.
Leaven लेव्हन् v.t.--- आंबवण घालणे, बदल घडवून आणणे. n.--- आंबवणे.
Leavings लीव्हिंग्ज् n.--- गदळ, उष्टे, उरलेसुरले.
Lecher लेचर् v.i.--- रांडबाजी/बाहेरख्याली करणे. n.--- रांडबाज, इष्कबाज, लंपट.
Lecherous लेचरस् a.--- कामी, स्त्रीलंपट, कामुक.
Lectern लेक्टर्न् n.--- भाषण / प्रवचन वाचण्याचे मेज.
Lection लेक्शन् n.--- पाठांतर, वाचन, पाठ, पाठभेद.
Lecture लेक्चर् v.t. and v.i.--- व्याखान देणे, कान उघाडणी करणे.
Lecturer लेक्चर् n.--- पाठ सांगणारा, वक्ता, शिक्षक, व्याखान देणारा.
Ledge लेज् n.--- कंगोरा, थर, ओळ, फड.
Ledger लेजर् n.--- खातेवाही, खतावणी.
Lee ली n.--- वार्यासमोरची बाजू.
Lee-ward लीवर्ड् ad.--- वाऱ्यासमोर.
Leech लीच् n.--- जळू. v.t.--- औषध देणे.
Leek लीक् n.--- कांद्यासारखी लांबट बोन्डाची एक भाजी.
Leer लीअर् n.--- लबाड / कामुक / दुष्ट नेत्रकटाक्ष. v.t.--- वाकड्या डोळ्याने पाहणे, डोळे मारणे, कामुक/कावेबाज/सूचक दृष्टीने पाहणे.
Leeringly लीरिंग्लि ad.--- डोळे मोडून, डोळा मारीत.
Left लेफ्ट् p.p.a.--- सोडलेला, वर्जित, टाकलेला. Left side --- वामांग, डावी.
Leg लेग् n.--- तंगडी, लाथ, खूर, टांग, विजार वगैरेचा leg झाकणारा भाग; विशिष्ट प्रवासाचा / अवधीचा / अंतराचा एक भाग. (Parliament’s Budget session may be in two legs).
Leg-before - wicket (संक्षेप : L.B.W.) क्रिकेटच्या खेळात फलंदाजाचा पाय त्याजकडे फेकलेल्या चेंडूच्या व यष्टींच्या मध्ये पडून त्या पायावर चेंडू अडल्यास फलंदाज बाद/चीत घोषित होण्याची स्थिति. पदबाधा (हिंदी: पगबाधा), पदव्यवाय / पदव्यवधान अशा स्थितीत चीत / बाद झालेला (फलंदाज), पायचीत.
Leg-break लेग्-ब्रेक् n.--- भूमीवरील एका टप्प्यानंतर उसळून, ‘leg-side’ कडून वळून फिरणारी क्रिकेट-खेळांतील गोलंदाजाची चेंडूफेक (फलंदाज व गोलंदाज दक्षिणहस्ती असतांना).
Leg - side लेग्-साइड् n.--- खेळपट्टीच्या / धावपट्टीच्या लांबीमधून जाणाऱ्या मैदान-दुभाजक रेषेच्या, दक्षिणहस्ती फलंदाजाच्या पावलांच्या टाचांकडील बाजूचा, क्रिकेट मैदानाचा अर्धा भाग.
Legacy लेगसि n.--- मृत्युपत्रांत दिलेली देणगी.
Legal लीगल् a.--- कायदेशीर, कायद्याप्रमाणे, शास्त्रोक्त.
Legalese लीगलीझ् n.--- कायद्याची / कायद्याच्या कामाची / कायदेशीर कागदपत्रांची भाषा(-शैली) / विधिवाणी.
Legally लीगलि ad.--- कायदेशीर.
Legate लीगेट् n.--- परराष्ट्राकडे पाठवलेला वकील.
Legatee लिगॅटी n.--- मृत्युपत्राने झालेला वारस.
Legator लेगॅटर् n.--- मृत्युपत्र करणारा.
Legend लेजन्ड् n.--- कथा, आख्यायिका, बखर, महात्म्य, दंतकथा. नाण्यांवरील, चित्रामधील लेख / वचन, लिखित सुभाषित, शब्दांकन.
Legendary लेजंडरी a.--- आख्यायिका, दंतकथा, इ. चा विषय झालेला, अद्भुत कीर्तीचा, लोक-विख्यात. ‘Legend’ च्या स्वरूपाचा.
Legerdemain लेजर्डिमेन् n.--- हस्तलाघव.
Legible लेजिबल् a.--- वाचण्यायोग्य, सुवाच्य.
Legion लीजन् n.--- पायदळ, झुंड, सैन्य, फौज.
Legislate लेजिस्लेट् v.i.--- कायदे/कानू/नियम करणे.
Legislative लेजिस्लेटिव्ह् a.--- कायदे करणारा.
Legislator लेजिस्लेटर् n.--- कायदेकानू रचणारा, कायदेमंडळ, विधिमंडळ (हिंदी: विधायिका).
Legislature लेजिस्लेच(र्) n.--- कायदे करणारी मंडळी. कायदेमंडळ, विधिमंडळ (हिंदी: विधायिका).
Legitimacy लिजिटिमसी n.--- औरसता, वैधता, कायदेशीरपणा, नियमानुसारित.
Legitimate लिजिटिमेट् v.t.--- औरसपणा देणे. a.--- औरस, अस्सल, वाजवी, वास्तविक, कायदेशीर, कायद्यास अनुसरून.
Legitimation लिजिटिमेशन् n.--- औरसपणा ठरवणे.
Legume लेग्यूम् n.--- शेंग, बोन्ड, शेंगेतील धान्य, कडधान्य.
Leguminous लेग्यूमिनस् a.--- द्विदळ, डाळीचा, कडदणाचा.