Cascade कॅस्केड् n.--- पाण्याचा धबधबा, धोत. v.i.--- धबधब्यासारखे (पाठोपाठ) कोसळणे / कोसळत सांचणे, गतानुगततेने साचणे/पसरणे/विस्तारणे.
Case केस् n.--- गवसणी, घर, विभक्ति, खटला, हकीगत, पेटी, आजाऱ्याची प्रकृति, देहस्थिती, वस्तुस्थिती (‘As the case may be’ =अनेक शक्यतांपैकी जी/जशी स्थिति असेल त्यानुसार. यथास्थिति (हिंदी). v.t.--- घर-वेष्टन करणे, चे निरीक्षण/पाहणी/तपासणी करणे.
Casement केस्मेन्ट् n.--- झरोका, खिडकी, खिडकीची चौकट.
Cash कॅश् n.--- रोकड, रोख पैसा. v.t.--- वटाविणे.
Cashier कॅशिअर् n.--- खजिनदार. v.t.--- बडतर्फ करणे.
Casino कसीनो n.--- जुगार खेळण्याचा अड्डा, द्यूतशाला.
Cask कास्क् n.--- पीप.
Casket कास्केट् n.--- करंडा, डबा, डबी.
Casque कास्क् n.--- शिरस्त्राण.
Cassandra कसॅन्ड्रा n.--- वाईट भविष्य वर्तविणारा. उपेक्षित भविष्यवेत्ता.
Cassock कॅसक् n.--- ख्रिश्चन धर्मगुरूचा पायघोळ झगा.
Cast कास्ट् n.--- डौल, साचा, लकेरी, त्याग, नेत्रकटाक्ष, टप्पा, डाव, ओतणी. v.t.--- टाकणे, नजरेखाली घालणे, चीत करणे, दोषी ठरविणे, मत घेऊन निकाल करणे, झांकणे, साच्यात ओतणे. मनात घोळणे, डौलास येणे.
Castanets कॅस्टानेट्स् n.--- चिपळ्या, करताळ.
Castaway कॅस्टावे a.--- देवधर्माने टाकलेला, टाकाऊ.
Caste कास्ट् n.--- जात, वर्ण, जाति.
Caster कॅस्टर् n.--- ओतारी, ओतणारा.
Castigate कॅस्टिगेट् v.t.--- (फटके मारून) कडक शिक्षा करणे, तीव्र निर्भत्सना करणे.
Castigation कॅस्टिगेशन् n.--- शिक्षा, दंड, शासन.
Castle कासल् / कॅसल् n.--- किल्ला, कोट, गढी, दुर्ग.
Castle in the air कासल् / कॅसल् इन् दी एअर् n.--- मनोराज्य, मनोरथसृष्टी.
Castor कॅस्टर् n.--- एरंड्या, एक प्राणी, लहान चाक.
Castor oil कॅस्टर् आॅइल् n.--- एरंडेल.
Castrate कॅस्ट्रेट् v.t.--- -ला खच्ची करणे, अंड बडवणे, -चे जननेंद्रिय निकामी करणे.
Casual कॅझुअल् a.--- प्रासंगिक, दैवघटित, आकस्मिक, अनौपचारिक, तात्पुरता, हंगामी, कामचलाऊ, जुजबी. (अनियत :हिंदी).
Casualty कॅझुअल्टि n.--- अपघात, दुर्दैव.
Casuist कॅझुइस्ट् n.--- धर्माधर्म-प्रवक्ता.
Casuistry कॅझुइस्ट्री n.--- कार्याकार्यचिकित्सा. योग्यायोग्य विचारणा, शब्दच्छल, शाब्दिक खल. उडवाउडवी, पळवाट.
Cat कॅट् n.--- मांजर, मार्जार.
CAT - scan कॅट्-स्कॅन् (Computerised Axial Tomography Scan) n.--- A diagnostic device invented by Dr. Allen Cormac.
Catabolic कॅटबॉलिक् a.--- ‘Catabolism’ च्या स्वरूपाचा/संबंधीचा.
Catabolism कॅटबॉलिझम् n.--- शरीरांतील अनावश्यक/अशुद्ध द्रव्यांचा निचरा करण्याची नैसर्गिक प्रक्रिया (पहा : ‘Anabolism’). ‘Metabolism’ चे एक अंग.
Cataclysm कॅटक्लिझम् n.--- महापूर; प्रचंड (नैसर्गिक) विपत्ति, अनर्थ.
Cataclysmal a.--- ‘Cataclysm’ च्या स्वरूपाचा / संबंधी.
Cataclysmic a.--- ‘Cataclysm’ च्या स्वरूपाचा / संबंधी.
Catalize/Catalyse
Catalogue कॅटलाॅग् n.--- अनुक्रमाची यादी, वैकल्पिक वर्णबंध (स्पेलिंग). v.t.--- -ची पद्धतशीर यादी/अनुक्रमणी बनविणे.
Catalyse = Catalize कॅटलाइज् v.t.--- (रासायनिक प्रक्रिया इ.) -ला चेतविणे/गति देणे.
Catalysis कॅटलिसिस् n.--- ‘Catalysis’ ची प्रक्रिया, उत्प्रेरणा (हिंदी).
Catalyst कॅटलिस्ट् n.--- स्वतः परिणाम न पावता रासायनिक प्रक्रियेस जोर (चालना/उत्प्रेरणा) देणारा - ती सुकर करणारा - पदार्थ, प्रेरक तत्व, प्रेरणा, चेतना.
Catalytic कॅटलिटिक् a.--- ‘Catalysis’ /’Catalyst’ - संबंधीचा/च्या स्वरूपाचा, उत्प्रेरक.
Catamaran कॅटमरॅन् n.--- ओंडके बांधून केलेला ताफा.
Catamenia कॅटामीनिया n.--- बायकांचा विटाळ, रज.
Catamite कॅटमाइट् n.--- अनैसर्गिक (समलिंगी इ.) संभोगात प्रेमपात्र म्हणून वापरली जाणारी आश्रित व्यक्ति. विट.
Catapult कॅटपल्ट् n.--- गलोल.
Cataract कॅटरॅक्ट् n.--- धबधबा मोतीबिंदू, धोत; खूप कलत्या उतारावर खळाळत वेगाने वाहणारा जलप्रवाह. पहा : ‘Rapid’.
Catarrh कटार् n.--- पडसे, कफप्रकोप.
Catastrophe कटॅस्ट्रफी n.--- दुष्परिणाम, शेवटचा परिणाम, उपसंहार, आकस्मिक विनाशकारी घटना, भीषण शोकांतिका.
Catastrophic(al) कॅटस्ट्रॉफिकल् a.--- आकस्मिक बिघातक स्वरूपाचा.
Catch कॅच् n.--- (गुप्त) अडचण/अडथळा, सापळा, (चेंडू इ. चा) झेल, शोधांत पकडलेली/सापडलेली गोष्ट/माल, आंकडा. v.t.--- धरणे, पकडणे, डावांत धरणे, उचलणे (चाल), लागणे (आग), रंजविणे, गुंतणे.
Catchment area कॅच्मेंट् एरिया n.--- पाणलोट क्षेत्र.
Catch on कॅच् आॅन् v.i.--- लोकप्रिय होणे. (to) v.t.--- समजणे, जाणणे.
Catch out कॅच् आउट् v.t.--- -ची चूक/अपराध पकडणे.
Catch up कॅच् अप् (on/with) -ला गाठणे, -ची उशिरा दाखल घेणे.
Catechism कॅटिकिझम् n.--- प्रश्नोत्तरावली (विशेषतः धर्मतत्वसार सांगणारी).
Catechu कॅटिशू n.--- कात.
Categorical कॅटेगॉरिकल् a.--- साफ, स्पष्ट.
Categorically कॅटेगॉरिकलि a.--- निक्षून.
Category कॅटिगरि n.--- पदार्थ, वर्ग, विल्हे.
Catena कटीना n.--- साखळी, मालिका, परंपरा.
Cater केटर् v.i.---(प्रसंगानुसार) अन्नसामग्री पुरवणे.
Cater to कॆटर् टू v.i.--- -च्या बाबत काम/व्यवस्था पाहणे/करणे. (उदा.: There are two exceptions to this rule, to cater to income a broken period of the previous year.)
Caterpillar कॅटर्पिलर् n.--- घुला, सुरवंट.
Catharist कॅथारिस्ट् n.--- अति सोंवळा.
Catharsis कथर्सिस् n.--- (शारीरिक/मानसिक) निचरा, झाडा, उत्सर्जन.
Cathartic कथर्टिक् a.--- ‘Catharsis’ संबंधीचा / - स्वरूपाचा.
Cathedral कॅथीड्रल् n.--- पाद्र्याचे देऊळ, बिशपाधिष्ठित चर्च.
Catholic कॅथॉलिक् a.--- सर्वांचा, उदारमनाचा, एका ख्रिस्ती पंथाचा.
Catkin कॅट्किन् n.--- एक प्रकारचे फूल.
Cattle कॅट्ल् n.---(अ. व.) गुरे ढोरे.
Catty कॅटी a.--- द्वेष्टा, कुत्सित, खोडसाळ, कुचका.
Caucus कॉकस् n.--- विशिष्ट हेतूने जमलेली बैठक/मंडळी, विशिष्ट उद्दिष्टाने जमलेला गट, टोळी.
Caudle कॉडल् n.--- सुंठवडा, बाळंतकाढा.
Caul कॉल् n.--- पोटातला पडदा, वार, शिराच्छादन
Cauldron कॉल्ड्रन् n.--- मोठा शिजविण्याचा हंडा.
Causal कॉझल् a.---प्रयोजक, साधक, कारक, दर्शक.
Causality कॉझॅलिटी n.--- कार्यकारण -भाव/-संबंध.
Cause काॅझ् n.--- v.t.---
Cause celebre कोझ् सेलेब्र n.--- कारण, हेतु, निमित्त, कर्ता, पक्ष, मोकदना, खटला, तरफ, काम, कुविख्यात खटला/प्रकरण, बभ्रा/गवगवा झालेली गोष्ट (न्यायालयीन). v.t.--- उत्पन्न करणे, कारण होणे,पक्ष घेणे.
Causeless काॅझलेस् a.--- निष्कारण, अकारण.
Causeaway कॉझ्वे n.--- धरण, बांध, सेतू, फरसबंध.
Caustic कॉस्टिक् n.--- मांस जाळणारे औषध. a.--- जालीम, तिखट, खवट, कटु, मांसदाहक.
Cauter कॉटर् n.--- डागणी.
Cauterize कॉटराइझ् v.t.--- डागणे, लासणे.
Cautery कॉटरी n.--- डाग, औषधाने केलेला दाह.
Caution कॉशन् n.--- सावधगिरी, ताकीदनामा. v.t.--- ताकीद देणे, हुषार/सावध करणे.
Cautious कॉशस् a.--- सावध, हुषार.