tab-tal

tab टॅब् n.--- हिशेब, टिपण, नोंद. पट्टी, बंद, चिठ्ठी, ‘लेबल’. To keep a tab (on) --- -वर लक्ष्य / नजर ठेवणे.
tabefaction टॅबिफॅक्शन् n.--- रोडपणा, कृशता.
tabernacle टॅबर्नॅकल् n.--- तंबू, देऊळ, पवित्रालय.
tabes टेबीझ् n.--- क्षयरोग.
table टेबल् n.--- पाटी, चौरंग, मेज, टेबल, कोष्टक,तालिका, सारणी, भोजन, पंगत, पट, कुंडली, पत्रक, तक्ता. विशिष्ट कामासाठी योग्य उंचीचे सपाट-स्थिर-आधार-भूत उपकरण. घोडा, घडवंची. v.t.--- पत्रक करणे, -ला मेज, चौरंग इ. वर ठेवणे. table of contents - अनुक्रमणिका. table expense --- भोजनखर्च. table of metal --- पत्रा, ताम्रपट. table cloth --- मेजावरची चादर. table land --- डोंगरसपाटी, पठार. --- Table of contents --- अनुक्रमणिका.
tablet टॅब्लेेट् n.--- पाटी, पत्र, पत्रिका. (pl.) --- वडी.
tabloid टॅब्लॉइड् n.--- सारभूत / अर्कात्मक रसायन / औषध. संक्षिप्त साररूपाने माहिती देणारे वर्तमानपत्र.
tabor टेबर् n.--- मृदंग, ढोलके. v.i.--- मृदंग वाजविणे.
tabular टॅब्युलर् a.--- पडद्यांचा, पदारांचा, कोष्टकांनी केलेला, सपाट.
tacit टॅसिट् a.--- ध्वनित, परोक्षपणे सूचित, फलित.
tacitly टॅसिट्लि ad.--- निषेधाभावाने.
taciturn टॅसिटर्न् a.--- मौन धरणारा. चूप, गप्प, अवाक्, अबोल, अल्पभाषी.
taciturnity टॅसिटर्निटी n.--- मौन.
tack टॅक् n.--- (जहाज इ. ची) दिशा / मार्ग. (Seeing that the Bench was in favor of giving bail to Vinayak Sen, Advocate Lalit changed tack to ask the court to lay down certain conditions in the bail order.) v.t.--- टांके मारणे, जोडणे. n.--- टाका. (अन्य, वेगळा) मार्ग.
tackle टॅकल् n.--- सामान, सरंजाम, कप्पी. (जहाजाचे) सामान. v.i.--- जुडणे. v.t.--- दोरखंड लावणे / धरणे / पकडणे.
tacky टॅकी a.--- चिकट व ओलसर,घाण, गलिच्छ.
tact टॅक्ट् n.--- शिताफी, कसब, छाप, हातोटी.
tactic टॅक्टिक् n.--- व्यूहरचना. युक्ति. उपाययोजना.
tactics टॅक्टिक्स् n.--- (लष्करी) डावपेच. ‘Tactic’ काढण्याचे / योजिण्याचे शास्त्र / कौशल्य / कला.
tactile टॅक्टाइल् a.--- स्पर्शविषयक, स्पर्शगम्य.
tactual टॅक्ट्युअल् a.--- = Tactile.
tahr ठार् n.--- केरळात निलगिरी-परिसरातील एक रानटी अजविशेष.
tail टेल् n.--- शेपूट, शेंडी, शेंवट. Tail of comet --- धूमकेतूचे पुच्छ. Turn tail --- पळ काढणे.
tailor टेलर् n.--- शिंपी. v.i.--- शिंप्याचा धंदा करणे.
tailspin टेल्स्पिन् n.--- स्वतः भोवती गिरक्या घेत विमानाने खाली मारलेला सूर. वेगाने झालेला अधःपात. तोल सुटून भरकत जाण्याची स्थिति.
taint टेण्ट् n.--- दोष, बाधा, वास, कलंक. v.t.--- कलंक लावणे, खराब करणे. n.--- विशिष्ट घटने(बद्दल)चे /सलगपणे केलेले / (ध्वनिफीत, चित्रफीत इ.द्वारा) लेखन / चित्रण. = Takings.
take टेक् v.t.--- घेणे, पकडणे, जिंकणे, मोहणे, निवडणे, लागणे, जरूर असणे, आपणांवर घेणे, स्वीकारणे. Take away --- नागविणे. Take down --- टांचून ठेवणे. Take up --- पटकरणे, वर उचलणे. Take care of --- जपणे, सांभाळणे. Take effect --- गुण पडणे.
takings टेकिंग्स् n.--- मिळकत, प्राप्ति, लाभ.
taint टेण्ट् v.i.--- -ने बाधित / खराब / अपवित्र करणे. n.--- दूषणभूत कलंक, (दुष्ट) प्रभाव.
tale टेल् n.--- गणती, हिशेब, गोष्ट कथा.
talebearer टेल्बेअरर् n.--- चहाडखोर, चुगलखोर.
talent टॅलेन्ट् n.--- गुण, करामत, अक्कल.
talisman टॅलिस्मन् n.--- ताईत, कुवाडे, तोडगा.
talk टॉक् v.i.--- बोलणे, भाषण करणे. n.--- गोष्ट, गप्पा, भाषण, अफवा, वार्ता, ध्वनि.
talkative टॉकेटिव्ह् a.--- बडबड्या, वाचाळ, बोलका.
talker टॉकर् n.--- वक्ता, संभाषण करणारा.
tall टॉल् a.--- उंच उंच वाढलेला, उंच हाताचा.
tallow टॅलो n.--- चरबी, चरबीसदृश तेल. v.t.--- चरबी लावणे, लठ्ठ करणे.
tally टॅलि n.--- ताळा, उतारा, जोड. v.t.--- मिळविणे, जुळविणे. v.i.--- मिळणे, जुळणे.
talmud टॅलमड् / टलमुड् n.--- यहुदीजमातीचा मूळ धर्मग्रंथ.
talon टॅलन् n.--- नखयुक्त पंजा (पक्षी, पशु यांचा). टाचेमागचा पायाचा भाग. पत्त्यांच्या खेळांतील वाटून उरलेला पानांचा गठ्ठा.