Correlative कॉर्रॆलेटिव्ह् a.--- परस्पर संबंधाचा.
Correspond कॉरेस्पान्ड् v.i.--- पत्रव्यवहार ठेवणे, जम बसवणे.
Correspondence कॉरेस्पान्डन्स् n.--- पत्रव्यवहार, कागदपत्र.
Corridor कॉरिडॉ(र्) n.--- (इमारत इ. मध्ये) (दोन्ही बाजूची दालने इ. च्या) मधून जाणारी वाट/बोळ. एका देशाचा अन्य देशाच्या भूमीतून जाणारा चिंचोळा भूभाग. बाजूचा सज्जा.
Corrigendum कॉरिजेन्डम् n.--- शुद्धिपत्र (लेखनांतील/छपाईतील चुका शुद्धीसह दाखवणारी यादी). (अ.व. Corrigenda).
Corroborate कॉरॉबोरेट् v.t.--- बळकटी आणणे (पुराव्याला), आधार देणे, प्रत्यंतर देणे.
Corrode कॉरोड् v.t./v.i.--- खाणे, चरणे, गंजणे.
Corrosive कॉरोसिव्ह् a.--- चरत खात जाणारा.
Corrugate कॉरुगेट् v.t.--- सरकती पाडणे.
Corrugation कॉरुगेशन् n.--- सुरकुती.
Corrupt करप्ट् v.t.--- कुजविणे, बिघडविणे, लांच देणे. a.--- कुचका, बिघडलेला, भ्रमिष्ट.
Corrupter करप्टर् n.--- नास/भ्रष्ट करणारा.
Corruption करप्शन् n.--- कुजवणे, भ्रष्टपणा, अपभ्रंश, लंच, नासवणे, पू बनवणे.
Corsair कॉर्सेर् n.--- चांचा, चांचाचे गलबत.
Corse कॉर्स् n.--- मुडदा, प्रेत.
Corselet कॉर्सलेट् n.--- स्वसंरक्षणार्थ छातीवर बांधलेला लोखंडी पत्रा.
Cortege कॉर्टेझ् n.--- इतमाम, स्वारी.
Cortex कॉर्टेक्स् n.--- झाडाची बाहेरची साल.
Cortical कॉर्टिकल् a.--- सालीचा, सालीसंबंधी.
Cosy/Cozy कोझि a.--- शरीरविश्राम/उब इ. चे सुख अनुभवणारा/देणारा, सुखासीन, सुखद, स्वकीयसंगसुखाचा, संतुष्ट, समाधानी, सुखी, सुखरूप, आटोपशीर. n.--- चहा इ. गरम ठेवण्यासाठी चहाच्या भांड्यावर (किटली इ. वर) पांघरायचे कापडी आवरण.
Cosmetic कॉस्मेटिक् n.--- उटणे, अंगविलेपन.
Cosmogony कॉझ्मॉगॉनी n.--- विश्वोत्पत्ति -वर्णन/-शास्त्र.
Cosmography कॉझ्मॉग्रफी n.--- विश्वाचे (चित्रित) वर्णन, अशा वर्णन पद्धतीचे शास्त्र.
Cosmology कॉझ्मॉलजी n.--- अनुशासन-/नियम- बद्ध विश्वाचे शास्त्र. बाह्यसृष्टिविचार, ब्रह्मांडविचार/दर्शन, विश्व (ब्रह्मांड) ची निर्मिति, रचना, कालगणना याचे शास्त्र. दिक्काल विचार.
Cosmopolitan कॉझ्मपॉलिटन् a.--- सर्व-/विश्व-समावेशक, वैश्विक परिणामाचा, जागतिक स्वरूपाचा/गुणधर्माचा.
Cosmos कॉझ्मॉस् n.--- नियमांच्या शिस्तीत चाललेले विश्व; ब्रह्मांड (व्यवस्था), शिस्त, अनुशासन, सुव्यवस्था, सुसंवादाची व्यवस्था/पद्धति.
Cosset कॉसेट् n.--- विशेष काळजीने वाढविलेले कोकरू/पिल्लू; लाडावलेले जनावर/पिल्लू/पोर. v.--- लाडावणे, चोचले पुरवणे.
Cost कॉस्ट् n.---
Costive कॉस्टिव्ह् a.---
Costiveness कॉस्टिव्ह्नेस् n.--- बद्धकोष्ठता, मलावरोध.
Costly कॉस्ट्लि a.---
Costume कॉस्ट्ययूम् n.---
Cosy कोझी a.--- ‘To cosy up to’ v.--- -शी गोडीगुलाबीने वागणे/राहणे, -शी लाडीगोडी करणे.(cosying up to dictators in strategically located or resource-rich nations while advocating democracy to countries it targets comes naturally to the U.S.) (Headline: ‘Naveen cosying up to Congress’)
Cot कॉट् n.--- खाटले, पलंग, खोपटी, माचा, पर्णकुटी.