Epi-Equ

Epicure एपिक्युअर् n.--- गोडघाशा / विलासी / चीनी / चोखंदळ / मर्मरसज्ञ व्यक्ति.
Epicurean एपिक्युरियन् a.--- चोखंदळ / मर्मज्ञ / रसज्ञ (विशेषतः खाण्यापिण्यातील).
Epidemic एपिडेमिक् a.--- सर्वसाधारण, सांथीचा. N.--- सांथीचा रोग, मरी, सांथ.
Epidemical एपिडेमिकल् a.--- = epidemic
Epidemically एपिडेमिकलि ad.--- सांथीप्रमाणे.
Epidemiography एपिडिमिआॅग्रफी n.--- सांथीच्या रोगावरील ग्रंथ (-रचना).
Epidemiology एपिडिमिआॅलॉजी n.--- सांथीच्या रोगाचे शास्त्र.
Epidermis एपिडर्मिस् n.--- बाहेरील कातडी, त्वचा.
Epigastric एपिगॅस्ट्रिक् a.--- ‘Epigastrium’- चा/शी संबंधित.
Epigastrium एपिगॅस्ट्रिअम् n.--- उदरप्रदेशांतील जठरावरचा भाग.
Epigram एपिग्रॅम् n.--- कवितेचा चुटका, विनोदी सुभाषित/म्हण.
Epigraph एपिग्रॅफ् n.--- स्मारकावर लिहिलेला लेख; कोरीव
Epigrapher एपिग्रॅफर् n.--- ‘Epigraphy’ चा तज्ज्ञ / अभ्यासक.
Epigraphist = Epigrapher
Epigraphy इपिग्रफी n.--- (प्राचीन) कोरीव लेखांचे शास्त्र, शिलालेखसमूह.
Epilepsy एपिलेप्सि n.--- घुरे, फेपरे, अपस्मार, अपस्मृति, आकडी, अवयवास झटके येणे, घेरी येणे आदि लक्षणाचा रोग.
Epileptic एपिलेप्टिक् a. and n.--- घुरे येणारा, फेपाऱ्या. (काम-क्रोधादि विकारांचे) झटके / आवेग येण्याची सवय / स्वभाव असलेला, अतिशय तापट / संतापी / बेताल वर्तनाचा.
Epilogue एपिलॉग् n.--- भाषणाचा उपसंहार, नाटकाच्या शेवटची मंगल कविता, भरतवाक्य.
Epiphany इपिफनी n.--- (दैवी पुरुषाचे) प्रकट होने. आविष्कार, साक्षात्कार.
Episode एपिसोड् n.--- अवांतर गोष्ट, उपकथा. एखाद्या घटनाक्रमांतील / दीर्घकथेतील एक प्रसंग, घटनाक्रममालिकेतील एक कडी / अध्याय.
Episodic एपिसोडिक् a.--- ‘Episode’-विषयक /-स्वरूपाचा. ठरीव / नियोजित घटनाक्रमाचा भागभूत / घटनाक्रमांत ओघाने येणारा.
Epistemology इपिस्टमॉलजी / एपिस्टमॉलजी n.--- ज्ञानग्रहणपद्धति / शास्त्र, ज्ञानशास्त्र, ज्ञानविद्या, ज्ञानमीमांसा (हिंदी).
Epistle एपिसल् / इपिसल् n.--- पत्र, संदेश, निरोप.
Epistolary एपिस्टोलेरि a.--- पत्राचा, पत्रोपत्रीचा, कागदोपत्रीचा, पत्रव्यवहारात्मक, पत्राचारस्वरूप.
Epitaph एपिटॅफ् n.--- थड्ग्यावरचा लेख.
Epithalamium एपिथालमिअम् n.--- विवाहगीत.
Epithelial एपिथीलियल् a.--- ‘epithelium’ चा / संबंधी / च्या स्वरूपाचा.
Epithelium एपिथीलियम् n.--- शरीरावयवाचा बाह्य पृष्ठभाग बनविणारा पदर / त्याचे द्रव्य (pl. Epithelia).
Epithet एपिथेट् n.--- गुणदर्शकशब्द, किताब, विशेषण.
Epitome एपिटोमि / इपिटमी n.--- सार, सारग्रंथ, सारांशग्रंथ, आदर्श नमुना (विशिष्ट गुणांचे) मूर्तरूप.
Epitomize इ(ए)पिटमाइझ् v.t.--- सारबद्ध करणे. सूत्ररूपाने सांगणे / मांडणे.
Epoch ईपॉक् n.--- शकारंभ, शकमूल, नवयुगारंभ, नवीन पर्वाच्क्क्षा आरंभ, पर्व, कालखंड, युग.
Epochal ईपॉकल् a.--- (नव-)युगप्रवर्तक, क्रांतिकारक.
Eponym एपोनिम् n.--- जिच्या नावावरून एखाद्या वस्तूचे / स्थानाचे / पद्धतीचे नांव पडले अशी व्यक्ति. (उदा. पहा: Gallup poll) अशी व्यक्ति जिचे नाव एखादी घटना, वस्तु, विषय, इ. चे वाचक बनले आहे.
Eponymous एपोनिमस् a.--- एखाद्या व्यक्तीच्या नावावरून ओळखला जाणारा / संज्ञा घेणारा. ‘Eponym’-विषयक /- स्वरूपाचा.
Equable ईक्वेबल् a.--- एकसारखा, समसमान.