Asquint अॅस्क्विंट् ad.--- तिरपे, काण्या डोळ्याने.
Ass अॅस् n.--- गाढव, मूर्ख, टोणका, गधडा.
Assail अॅसेल v.t.--- हल्ला करणे, घाला घालणे.
Assailant अॅसेलंट n.--- घाला घालणारा, मारेकरी.
Assassin अॅसॅसिन् n.--- मारेकरी, हल्ल्याने मारणारा.
Assassinate अॅसॅसिनेट् v.t.--- विश्वासघाताने मारणे.
Assault अॅसाॅल्ट् v.t.--- हल्ला करणे, घाला घालणे.
Assay अॅस्से v.t.--- परीक्षा/पारख करणे, कसोटी/कस लावणे. n.--- पारख, कसोटी, यत्न.
Assayer अॅसेअर् n.--- (धातूची) पारख करणारा.
Assemblage अॅसेम्ब्लेज् n.--- जमाव, एकवटपणा.
Assemble अॅसेम्बल् v.t.--- एकवटणे, गोळा/जमा करणे.
Assembly अॅसेम्ब्ली n.--- जमाव, समाज, सभा, मेळा.
Assembly - room अॅसेम्ब्ली-रूम् n.--- सभागृह.
Assent अॅसेन्ट् v.i.--- रुकार/अनुमत देणे.
Assert अॅसर्ट् v.t.--- खात्रीने म्हणणे, प्रतिपादणे.
Assertion अॅसर्शन् n.--- प्रतिज्ञा, खात्रीचे भाषण.
Assess असेस् v.t.------ पट्टी/कर बसवणे, प्राप्तीचा ठराव करणे, कर-/दंड-/वसुली इत्यादिसाठी दर/रक्कम/किंमत ठरविणे/निश्चित करणे, निर्धारित करणे, एखाद्या व्यक्ति /वस्तु बाबत अशी निश्चिती/ठराव करणे, -चे महत्व, किंमत, आकार, इत्यादि आजमावणे.
Assess to --- (विशिष्ट व्यक्ति-/वस्तु -वरच्या विशिष्ट करवसुली -) साठी (वरील प्रमाणे) दर इत्यादि ठरविणे. (उदाहरण: Income of the previous year is assessed to tax. Mr. ABC was never assesed to income tax.)
Assessment असेस्मेण्ट् n.--- “Assess” ची प्रक्रिया, मूल्यनिर्धारण, योग्यता-निश्चिति.
Assessor अॅसेसर् n.--- पट्टी/कर बसविणारा, जमाबंदी करणारा, न्यायाधीशाचा मदतनीस सभासद.
Assets अॅसेट्स् n.--- मालमत्ता, भांडवल, पुंजी, ऐवज.
Asseverate अॅसेव्हरेट् v.t.--- खरे स्मरून बोलणे, शपथेने बोलणे.
Asseveration अॅसेव्हरेशन् n.---सत्यवचन see baba notes.
Assign असाइन् v.t.--- नेमून देणे, विशेष कामाकरता नेमणे. n.--- (साधन-संपत्तीच्या व्यवहारासाठी नेमलेला वैधानिक / कायदेशीर प्रतिनिधी / मुखत्यार. = ‘Asignee’.
Assignable असाइनेबल् a.--- नेमून देण्याजोगा.
Assignation अॅसिग्नेशन् n.--- स्त्रीपुरुषांचा भेटण्याचा संकेत.
Assignee अॅसायनी n.--- नेमणूक/तैनात करणारा, मुखत्यार.
Assimilate अॅसिमिलेट् v.t.--- सारखा/समान करणे, जिरवणे, सामावणे, समाविष्ट होणे, -ला सामावून घेणे, आत्मसात करणे, आत्मसदृश करणे.
Assimilation अॅसिमिलेशन् n.--- एकरूप करणे, आत्मसात्करण /-भवन, सादृशीकरण, समानीकरण.
Assize अॅसाइझ् v.t.--- कायद्याने भाव ठरविणे, कराचा दर ठरविणे. n.--- न्यायसभा, अदालत, बाजारभाव.
Assizes अॅसाइझेस् n.--- खटल्याच्या चौकशीकरता तालुक्यात जे सेशन कोर्ट बसते ते.
Associate अॅसोसिएट् v.t.--- संगत करणे, संयोग करणे. a.--- बरोबरीचा सखा-/-सखी- भूत (उदा: Associate language = सखी भाषा).
Association अॅसोसिएशन् n.--- संयोग, जूट, सांगड, मंडळी.
Assort अॅसाॅर्ट् v.t.--- प्रत/वर्ग लावणे, निवडणे.
Assorted असाॅर्टेड् a.--- वैविध्यपूर्ण, विविधप्रकारचा/प्रकारचे परस्परसंवादी, जुळणारा/जुळणारे.
Assortment असाॅर्मेंट् n.--- प्रत, वर्ग, विल्हेवारी, वैवध्यपूर्ण गट.
Assuage अॅस्वेज् v.t.--- हलका/शांत करणे, शांतवन करणे.
Assume अॅस्यूम् v.t.--- आपणांकडे घेणे, अगिकार करणे,वेष धारण करणे, खोटा ग्रह करणे. गृहीत धरणे.
Assuming अॅस्यूमिंग् a.--- आढ्यतेखोर, कुर्रेबाज.
Assumption अॅसम्पशन् n.--- अंगिकार, मिथ्याग्रह, मानलेली गोष्ट.
Assurance अॅशुअरन्स् n.--- अभयवचन, भाक, प्रतिज्ञा, उमेद.
Assure अॅशुअर् v.t.--- खचित करणे, खात्री करणे, धैर्य/भरवसा देणे.
Assured अॅशुअर्ड् a.--- खात्री झालेला, निःशंक.
Assuredly अॅशुअर्डली ad.--- निश्चयपूर्वक.
Asterik अॅस्टेरिक् n.--- फुली, चौफुली, तारकेसारखी खूण(*)
Asterism अॅस्टरिझम् n.--- नक्षत्रगण, नक्षत्र.
Asthma अॅस्म / अॅज्म n.--- दमा, श्वास, धाप, फुप्फुसांतील आत्यंतिक अम्लानिर्मितीने फुप्फुसांतील वायुमार्ग अवरुद्ध होऊन स्वशोच्श्वासात अडथळा येणे, छातीत/घशात घरघर होणे, घुसमटून जीव घाबरा होणे इ. लक्षणांचा रोग, श्वासरोग,दमा .
Asthmatic अॅस्मॅटिक् a.--- “Asthma’ -चा / -विषयक. n.--- दमाग्रस्त रोगी.
Astigmatic अस्टिग्मटिक् a.--- ‘Astigmatism’ संबंधीचा. (हिंदी: अबिंदुक).
Astigmatism अस्टिग्मटिझम् n.--- प्रकाशकिरणांच्या योग्य केंद्रीभवनात अडथळा आणणारा डोळ्याच्या रचनेतील/घडणीतील किंव्हा भिंगांतील दोष. (हिंदी: अबिन्दुकता).
Astonish अॅस्टाॅनिश् v.t.--- चकित करणे, चक्क करणे.
Astonished अॅस्टाॅनिश्ड् a.--- चक्क, थंड, दंग.
Astonishment अॅस्टाॅनिश्मेन्ट् n.--- अचंबा, आश्चर्य.
Astound अॅस्टाउन्ड् v.t.--- चकित/विस्मित करणे.
Astraddle अॅस्ट्रेडल् ad.--- दोहों बाजूंस पाय फाकून.
Astraphobia अॅस्ट्रोफोबिया n.--- विजेच्या झगझगाटाचे / कडकडाटाचे विकृत भय.
Astray अॅस्ट्रे ad.--- वाट चुकून, आड वाटेने.
Astrict अॅस्ट्रिक्ट् v.t.--- आवळून टाकणे, संकुचित करणे.
Astringency अॅस्ट्रिन्जन्सि n.--- तुरठपणा, राप.
Astringent अस्ट्रिन्जन्ट् a.--- तुरट, स्तम्भक.
Astrolabe अॅस्ट्राॅलेब् n.--- सूर्यादि ग्रहांची उंची घेण्याचे यंत्र.
Astrologer अॅस्ट्राॅलाॅजर् n.--- ज्योतिषी, प्रश्नज्योतिषी.
Astrological अॅस्ट्राॅलाॅजिकल् a.--- ज्योतिषसंबंधी.
Astrology अॅस्ट्राॅलाॅजि n.--- फलज्योतिष.
Astronaut अॅस्ट्रनाॅट् n.--- अवकाशयात्री, पृथ्वीच्या वातावरणापलीकडे संचार करणारा.
Astronomer अॅस्ट्राॅनाॅमर् n.--- खगोलवेत्ता, ज्योतिषी, खगोलशास्त्रज्ञ.
Astronomic / Astronomical अॅस्ट्रनाॅमिक् / अॅस्ट्रनाॅमिकल् a.--- खगोलविद्येसंबंधी.
Astronomy अॅस्ट्राॅनमी n.--- खगोलविद्या, ज्योतिषशास्त्र.
Astrophysical अॅस्ट्रोफिजिकल् a.--- ‘Astrophysics’ चा/संबंधीचा.
Astrophysicist अॅस्ट्रोफिझिसिस्ट् n.--- ‘Astrophysics’ चा अभ्यासक/ज्ञाता.
Astrophysics अॅस्ट्रोफिजिक्स् n.--- खागोलांच्या घटकद्रव्यांचा अभ्यास करणारी ज्योतिर्विद्येची एक शाखा.
Astute अस्ट्यूट् a.--- शहाणा, अक्कलवान, धूर्त, व्यवहारचतुर, चलाख.
Astutely अस्ट्यूटलि ad.--- शहाणपणे, धूर्तपणे.
Asunder अॅसन्डर् ad.--- निराळा, वेगळा, पृथक.